सीमा सुरक्षादलात असिस्टंट सब इन्स्पेक्टर (स्टेनोग्राफर्सच्या) ३६ जागा-

अर्जदार बारावी उत्तीर्ण व लघुलेखनाची ८० शब्द प्रतिमिनिट व इंग्रजी टंकलेखनाची ३५ शब्द प्रतिमिनिट तर हिंदी टंकलेखनाची ३० शब्द प्रतिमिनिट पात्रताधारक आणि शारीरिकदृष्टय़ा सक्षम असायला हवेत. वयोमर्यादा २५ वर्षे. अधिक माहिती व तपशिलासाठी एम्प्लॉयमेंट न्यूजच्या ३ ते ९ डिसेंबर २०१६ या अंकात प्रकाशित झालेली सीमा सुरक्षा दलाची जाहिरात पहावी अथवा दलाच्या ६६६.ु२ऋ.ल्ल्रू.्रल्ल या संकेतस्थळाला भेट द्यावी. संगणकीय पद्धतीने वरील संकेतस्थळावर अर्ज करण्याची शेवटची तारीख १८ जानेवारी २०१७.

गेल इंडियामध्ये शारीरिकदृष्टय़ा दिव्यांग उमेदवारांसाठी १२ जागा-

अधिक माहिती व तपशिलासाठी एम्प्लॉयमेंट न्यूजच्या ३१ डिसेंबर २०१६ ते ६ जानेवारी २०१७ च्या अंकात प्रकाशित झालेली गेल इंडिया लिमिटेडची जाहिरात पाहावी अथवा ‘गेल’च्या http://www.gailonline.com careers या संकेतस्थळाला भेट द्यावी. संगणकीय पद्धतीने वरील संकेतस्थळावर अर्ज करण्याची शेवटची तारीख १९ जानेवारी २०१७.

भारत सरकार, गृह मंत्रालयांतर्गत येणाऱ्या सशस्त्र सीमा दलात (१) सबइन्स्पेक्टर (कम्युनिकेशन) (एसआय) (१६ पदे), (२) असिस्टंट सबइन्स्पेक्टर (कम्युनिकेशन) (एएसआय) (११० पदे) आणि (३्) हेड कॉन्स्टेबल (कम्युनिकेशन) (एचसी) (७४६ पदे) अशा एकूण ८७२ पदांची भरती.

पात्रता – (१) एसआय- इलेक्ट्रॉनिक्स किंवा टेलिकम्युनिकेशन किंवा विज्ञान (पीसीएम) मधील पदवी. (२) एएसआय – इलेक्ट्रॉनिक्स किंवा टेलिकम्युनिकेशनमधील पदविका किंवा पीसीएम विषयांसह १२वी उत्तीर्ण. (३) एचसी – दहावी  इलेक्ट्रॉनिक्स ट्रेडमधील आयटीआय किंवा पीसीएम विषयांसह १२वी उत्तीर्ण.

वयोमर्यादा – एसआय आणि एएसआयसाठी १८ ते २५ वष्रे. एचसीसाठी १८ ते २३ वष्रे कमाल वयोमर्यादा. इमावसाठी ३ वर्षांनी, अजा/ अजसाठी ५ वर्षांनी शिथिलक्षम.

मूळ वेतन प्रतिमाह – एसआय – रु. ३५,४००/-, एएसआय – रु. २९,२००/-, एचसी – रु. २५,५००/- अधिक इतर भत्ते. विहित नमुन्यातील अर्ज (एम्प्लॉयमेंट न्यूजच्या दि. ३१ डिसेंबर २०१६च्या अंकात दिल्याप्रमाणे). आवश्यक त्या कागदपत्रांसह जाहिरातीत दिलेल्या पत्त्यावर दि. ३० जानेवारी २०१७पर्यंत पोहोचतील असे पाठवावेत.

सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठात विविध अध्यासन प्राध्यापक पदांसाठी नियुक्ती-

अधिक माहितीसाठी सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठा unipune.ac.in  या संकेतस्थळाला भेट द्यावी. त्यावरील पुढील लिंकवर याविषयी जास्तीची माहिती मिळेल.(link to circulars Administration- teaching circulars) अर्ज जमा करण्याची शेवटची तारीख १८ जानेवारी २०१७.

नॅशनल इन्व्हेस्टिगेशन एजन्सी (एनआयए), (गृह मंत्रालय, भारत सरकार) मध्ये प्रतिनियुक्तीवर (डेप्युटेशन) मुंबई, दिल्ली, हैद्राबाद इ. ठिकाण इन्स्पेक्टर, सबइन्स्पेक्टर, असिस्टंट सबइन्स्पेक्टर पदांची भरती.

पात्रता – (१) केंद्र किंवा राज्य सरकारमध्ये समतुल्य पदांवर नियुक्ती असावी. (२) पदवी उत्तीर्ण. (३) दोन वर्षांचा क्रिमिनल केसेस तपासकामाचा अनुभव असावा. शिवाय (१) इन्स्पेक्टर पदासाठी पे बँड २ मध्ये ग्रेड पे रु. ४,२००/- च्या पदावर ५ वर्षांचा अनुभव असलेले, (२) सबइन्स्पेक्टर पदासाठी – पे बँड-२ मध्ये ग्रेड-पे रु. २,८००/- च्या पदावर ६ वर्षांचा अनुभव असलेले,  (३) असिस्टंट सबइन्स्पेक्टर पदासाठी – पे बँड-२ मध्ये ग्रेड-पे रु. २,४००/- च्या पदावर ६ वर्षांचा अनुभव असलेले उमेदवारसुद्धा पात्र आहेत. प्रतिनियुक्ती भत्ता म्हणून मूळ पगाराच्या २५ टक्के अधिक त्यावर महागाई भत्ता एवढे वेतन मिळेल. जाहिरात, अर्जाचा नमुना http://www.nia.gov.in <http://www.nia.gov.in/&gt;  या संकेतस्थळावर उपलब्ध आहे. विहित नमुन्यातील अर्ज आवश्यक त्या कागदपत्रांसह दिलेल्या पत्त्यावर दि. ३० जानेवारी २०१७ पर्यंत पोहोचतील असे पाठवावेत.