चंद्रपूर शहर महानगरपालिकेत कनिष्ठ अभियंता- स्थापत्य ३ जागा-

उमेदवारांनी स्थापत्य अभियांत्रिकी विषयातील पदवी अथवा पदविका उत्तीर्ण केलेली असावी.

अनुभवी उमेदवारांना प्राधान्य. मराठी भाषेचे पुरेसे ज्ञान आवश्यक. अधिक माहिती व तपशिलासाठी प्रमुख वृत्तपत्रांत प्रकाशित झालेली चंद्रपूर शहर महानगरपालिकेची जाहिरात पाहावी

अथवा महानगरपालिकेच्या www.cmcchandrapur.com या संकेतस्थळांना भेट द्यावी. संगणकीय पद्धतीने वरील संकेतस्थळावर अर्ज करण्याची शेवटची तारीख २० जानेवारी २०१७.

 

महाराष्ट्र विद्युत नियामक आयोगातर्फे विद्युत लोकपाल, नागपूर पदासाठी संधी

अधिक माहिती व तपशिलासाठी महाराष्ट्र विद्युत नियामक आयोगाच्या दूरध्वनी क्र. ०२२-२२१६३९७६ वर संपर्क साधावा अथवा नियामक आयोगाच्या www.merc.gov.in अथवा www.mercindia.org.in या संकेतस्थळांना भेट द्यावी. संपूर्णपणे भरलेले तपशीलवार अर्ज सचिव महाराष्ट्र विद्युत नियामक आयोग, केंद्र क्र. १, १३ वा मजला, जागतिक व्यापार केंद्र, कफ परेड, कुलाबा, मुंबई- ४००००५ या पत्त्यावर पाठविण्याची शेवटची तारीख २० जानेवारी २०१७.

 

टाटा मूलभूत संशोधन संस्था, मुंबई येथे प्रशासन साहाय्यक म्हणून संधी-

वयोमर्यादा ३६ वर्षे. अधिक माहिती व तपशिलासाठी एम्प्लॉयमेंट न्यूजच्या ३१ डिसेंबर २०१६ ते ६ जानेवारी २०१७ च्या अंकात प्रकाशित झालेली टाटा मूलभूत संशोधन संस्था, मुंबईची जाहिरात पाहावी अथवा टीआयएफआरच्या http://www.tifr.res.in/ या संकेतस्थळाला भेट द्यावी. संगणकीय पद्धतीने वरील संकेतस्थळावर अर्ज करण्याची शेवटची तारीख २१ जानेवारी २०१७.

 

इंडियन रेअर अथ्र्स लिमिटेडला मुंबई येथे एक्झिक्युटिव्ह असिस्टंटचे पद-

अधिक माहिती व तपशिलासाठी इंडियन रेअर अथ्र्स लिमिटेडच्या दूरध्वनी क्र. ०२२- २४२११६३० वर संपर्क साधावा अथवा कंपनीच्या www.irel.co.in या संकेतस्थळाला भेट द्यावी. संगणकीय पद्धतीने वरील संकेतस्थळावर अर्ज करण्याची शेवटची तारीख २३ जानेवारी २०१७.

 

अ‍ॅग्रिकल्चर सायन्टिस्ट रिक्रुटमेंट बोर्डाअंतर्गत सेंट्रल कोस्टल अ‍ॅग्रिकल्चर रिसर्च इन्स्टिटय़ूट, ओल्ड गोवा येथे सीनिअर सायन्टिस्ट म्हणून संधी-

वयोमर्यादा ४७ वर्षे. अधिक माहिती व तपशिलासाठी इंडियन काउन्सिल ऑफ अ‍ॅग्रिकल्चरल रिसर्चच्या http://www.icar.org.in अथवा http://www.asrb.org.in या संकेतस्थळांना भेट द्यावी. विहित नमुन्यातील संपूर्णपणे भरलेले व आवश्यक तो तपशील आणि कागदपत्रांसह असणारे अर्ज सेक्रेटरी, अ‍ॅग्रिकल्चरल सायंटिस्ट्स रिक्रुटमेंट बोर्ड, कृषी अनुसंधान भवन-१, नवी दिल्ली- ११००१२ या पत्त्यावर पाठविण्याची शेवटची तारीख २४ जानेवारी २०१७.

 

केंद्र सरकारच्या कामगार व रोजगार मंत्रालयात उपप्रादेशिक सेवायोजन अधिकाऱ्यांच्या ८ जागा-

उमेदवारांनी समाज कल्याण, कामगार कल्याण, समाजशास्त्र, अर्थशास्त्र, सांख्यिकी, वाणिज्य, मानसशास्त्र अथवा शिक्षणशास्त्र यांसारख्या विषयांत पदव्युत्तर पदवी घेतलेली असावी व त्यांना संबंधित कामाचा ३ वर्षांचा अनुभव असायला हवा. अर्जाच्या नमुन्यासाठी एम्प्लॉयमेंट न्यूजच्या २४ ते ३० डिसेंबर २०१६ च्या अंकात प्रकाशित झालेली केंद्र सरकारच्या कामगार व रोजगार मंत्रालयाची जाहिरात पाहावी. विहित नमुन्यातील संपूर्णपणे भरलेले व आवश्यक तो तपशील आणि कागदपत्रांसह असणारे अर्ज अंडर सेक्रेटरी टू गव्हर्नमेंट ऑफ इंडिया, डायरेक्टोरेट जनरल ऑफ एम्प्लॉयमेंट, मिनिस्ट्री ऑफ लेबर अ‍ॅण्ड एम्प्लॉयमेंट, श्रमशक्ती भवन, रफी मार्ग, नवी दिल्ली- ११०००१ या पत्त्यावर पाठविण्याची शेवटची तारीख २२ जानेवारी २०१७.

 

कॉलेज ऑफ इंजिनीअरिंग, पुणे अंतर्गत डिपार्टमेंट ऑफ प्रॉडक्शन इंजिनीअरिंग अ‍ॅण्ड इंडस्ट्रियल मॅनेजमेंटमध्ये पूर्णकालीन/ अंशकालीन व्याख्याते म्हणून संधी-

अधिक माहिती व तपशिलासाठी प्रमुख

वृत्तपत्रांत प्रकाशित झालेली कॉलेज ऑफ इंजिनीअरिंगची जाहिरात पाहावी अथवा सीओईपीच्या www.coep.org.in किंवा http://pgderp.coep.org.in या संकेतस्थळांना भेट द्यावी. संपूर्णपणे भरलेले अर्ज डायरेक्टर, कॉलेज ऑफ इंजिनीअरिंग, पुणे शिवाजी नगर, पुणे- ४११००५ या पत्त्यावर पाठविण्याची शेवटची तारीख २१ जानेवारी २०१७.

 

भारतीय फिल्म अ‍ॅण्ड टेलिव्हिजन संस्था, पुणे येथे करारतत्त्वावर असिस्टंट आयटी मॅनेजर म्हणून थेट मुलाखतीची संधी-

अधिक माहितीसाठी प्रमुख वृत्तपत्रांत प्रकाशित झालेली भारतीय फिल्म अ‍ॅण्ड टेलिव्हिजन इन्स्टिटय़ूटची जाहिरात पाहावी. तपशीलवार अर्ज व आवश्यक ते कागदपत्र आणि डिमांड ड्राफ्टसह रजिस्ट्रार, भारतीय फिल्म व टेलिव्हिजन संस्था, लॉ कॉलेज रोड, पुणे- ४११००४ या पत्त्यावर २० जानेवारी २०१७ रोजी सकाळी ९ वा. संपर्क साधावा.