दक्षिणपश्चिम रेल्वेमध्ये हुबळी येथे स्काउट आणि गाइड्ससाठी जागा

उमेदवारांनी शालान्त परीक्षा उत्तीर्ण करून औद्योगिक प्रशिक्षण संस्थेची पात्रता पूर्ण केलेली असावी. व त्याशिवाय त्यांनी स्काउट व गाइड्समध्ये उल्लेखनीय कामगिरी बजावलेली असावी. अर्जाचा नमुना व तपशिलासाठी एम्प्लॉयमेंट न्यूजच्या ११ ते १७ फेब्रुवारी २०१७ च्या अंकात प्रकाशित झालेली दक्षिण-पश्चिम रेल्वेची जाहिरात पाहावी अथवा दप रेल्वेच्या  www.rrchubli.in या  संकेतस्थळाला भेट द्यावी. विहित नमुन्यातील संपूर्णपणे भरलेले व आवश्यक तो तपशील आणि कागदपत्रांसह असणारे अर्ज दि असिस्टंट पर्सोनेल ऑफिसर (हेड क्वार्टर्स), साउथ वेस्टर्न रेल्वे, जनरल मॅनेजर्स बिल्डिंग, गडाग रोड, हुबळी- ५८००२० या पत्त्यावर पाठविण्याची शेवटची तारीख ६ मार्च २०१७.

चेन्नई पेट्रोलियम कॉर्पोरेशनमध्ये ज्युनिअर इंजिनीअरिंग असिस्टंटच्या ९४ जागा

अधिक माहिती व तपशिलासाठी एम्प्लॉयमेंट न्यूजच्या ११ ते १७ फेब्रुवारी २०१७ च्या अंकात प्रकाशित झालेली चेन्नई पेट्रोलियम कॉर्पोरेशनची जाहिरात पाहावी अथवा कॉर्पोरेशनच्या www.cpcl.co.in या संकेतस्थळाला भेट द्यावी. संपूर्णपणे भरलेले व आवश्यक त्या कागदपत्रांसह असणारे अर्ज साध्या टपालाने दि अ‍ॅडव्हर्टायझर (युनिट- चेन्नई पेट्रोलियम कॉर्पोरेशन लि., पोस्ट बॅग नं. ९९, जीपीओ- कोलकाता- ७००००१ या पत्त्यावर पाठविण्याची शेवटची तारीख ४ मार्च २०१७.

कॅन्टोनमेंट बोर्ड, देहूरोड येथे ज्युनिअर इंजिनीअरसाठी संधी

अधिक माहिती व तपशिलासाठी एम्प्लॉयमेंट न्यूजच्या ११ ते १७ फेब्रुवारी २०१७ च्या अंकातील कॅन्टोनमेंट बोर्ड- देहू रोडची जाहिरात पाहावी अथवा दूरध्वनी क्र. ०२०- २७६७१२२२ वर संपर्क साधावा. तपशीलवार अर्ज चीफ एक्झिक्युटिव्ह ऑफिसर, कॅन्टोनमेंट बोर्ड ऑफिस, देहू रोड रेल्वे स्थानकाजवळ, देहू रोड, पुणे- ४१२ १०१ या पत्त्यावर पाठविण्याची शेवटची तारीख ६ मार्च २०१७.

महाराष्ट्र विज्ञान वर्धिनीच्या आघारकर संशोधन संस्थापुणे अंतर्गत  ता. बारामती येथे माळीसाहाय्यक म्हणून संधी

अर्जदार शालान्त परीक्षा उत्तीर्ण असावेत व त्यांनी संबंधित कामातील अनुभव आणि कौशल्य प्राप्त केलेले असावे. अधिक माहिती व तपशिलासाठी आघारकर संशोधन संस्था, पुणेच्या www.aripune.org या संकेतस्थळाला भेट द्यावी. तपशीलवार अर्ज महाराष्ट्र विज्ञान वर्धिनीची आघारकर संशोधन संस्था, मो. ग. आगरकर मार्ग, पुणे- ४११००४ या पत्त्यावर पाठविण्याची शेवटची तारीख७ मार्च २०१७.