इंडियन इंडियन इन्स्टिटय़ूट ऑफ टेक्नॉलॉजी (आयआयटी)मध्ये ज्युनियर मेकॅनिक/ज्युनियर लॅबोरेटरी असिस्टंट/ज्युनियर टेक्निशियन एकूण १३ पदांची भरती.

(जाहिरात क्र. Rect/Admn-II/२०१७/६)

पात्रता – इलेक्ट्रिकल /सिव्हिल/मेकॅनिकल/इलेक्ट्रॉनिक्स/कॉम्प्युटर/प्रोडक्शन इ.मधील अभियांत्रिकी पदविका २ वष्रे संबंधित कामाचा अनुभव किंवा इलेक्ट्रॉनिक्स मेकॅनिक/मशिनिस्ट/वेल्डर/फिटर/मेकॅनिकल/मेझन (गवंडी) इ. ट्रेड्समधील आयटीआय ५वष्रे संबंधित कामाचा अनुभव.

ज्युनियर मेकॅनिक (टेलिफोन एक्स्चेंज) (२ पदे). पात्रता – बी.एस्सी. (आयटी/कॉम्प्युटर सायन्स/इलेक्ट्रॉनिक्स).

असिस्टंट सिक्युरिटी इन्स्पेक्टर (४ पदे). पात्रता – पदवी उत्तीर्ण, ३ वर्षांचा सिक्युरिटी कामाचा अनुभव, एलएमव्ही मोटर वाहन आणि मोटरसायकल चालविण्याचा परवाना.

वरील सर्व पदांवर सुरुवातीला ३ वर्षांच्या कंत्राटी पद्धतीवर भरती केले जाईल. त्यांचा कायम स्वरूपाच्या नोकरीसाठी कामातील प्रगतीनुसार विचार केला जाईल.

वयोमर्यादा – २७ वष्रे.

परीक्षा शुल्क – रु. ५०/-

(महिला/अजा/अज/विकलांग यांना फी माफ).

ऑनलाइन अर्ज  http://www.iitb.ac.in/en/careers/staff-recruitment या संकेतस्थळावर  दि. ७ ऑगस्ट २०१७पर्यंत करावेत.

फायर ऑफिसर/फायरमन होऊ इच्छिणाऱ्या होतकरू तरुणांना सुवर्णसंधी.

डायरेक्टोरेट ऑफ महाराष्ट्र फायर सíव्हस, महाराष्ट्र शासनतर्फे महाराष्ट्र फायर सíव्हस अकॅडमी, विद्यानगरी, हंस बुग्रा मार्ग, सांताक्रूज (पूर्व), मुंबई – ४०० ०९८ येथे

(१) सब ऑफिसर आणि फायर प्रिव्हेंशन

ऑफिसर्स कोर्स -२०१८ आणि

(२) फायरमन ट्रेिनग कोर्स – २०१८ साठी प्रवेश.

(१) फायर ऑफिसर्स कोर्स –  ५२ आठवडे कालावधीचा निवासी अभ्यासक्रम आहे.

पात्रता – किमान ५०% गुणांसह कोणत्याही शाखेतील पदवी (मागासवर्गीयांसाठी गुणांची अट ४५% ). वयोमर्यादा – १८ ते २५वष्रे (अजा/अज/एनटी/व्हीजेएनटी/एसबीसी – १८ ते ३० वष्रे, इमाव – १८ ते २८ वष्रे).

अर्जाचे शुल्क – रु. १,०००/- (मागासवर्गीयांसाठी – रु. ५००/-)

पात्र उमेदवारांचे शारीरिक मोजमाप घेतले जाईल. त्यातून निवडलेल्यांची १०० गुणांची लेखी परीक्षा घेतली जाईल. त्यासाठी कालावधी – एक तास असेल. परीक्षेमध्ये इंग्रजी आणि मराठी – ५० गुणांसाठी, सामान्यज्ञान, अ‍ॅप्टिटय़ूड टेस्ट, लॉजिकल रिझिनग – ५० गुणासाठी असेल.

कोर्स फी – रु. ७२,८००/-.

(२) फायरमन ट्रिनिंग कोर्स – सहा महिने कालावधीचा निवासी कोर्स.

पात्रता – किमान ५०% गुणांसह प्रथम प्रयत्नात १०वी उत्तीर्ण (मागासवर्गीयांसाठी गुणांची अट किमान ४५%)  १० वीला मराठी विषय अनिवार्य असावा.

वयोमर्यादा – १८ ते २३ वष्रे (अजा/अज/एनटी/व्हीजेएनटी/एसबीसी – १८ ते २८ वष्रे, इमाव – १८ ते २६ वष्रे)

अर्जाचे शुल्क – रु. ६००/- (मागासवर्गीयांसाठी रु. ३००/-)

कोर्स फी – रु.३१,०००/- ते ४१,०००/-दोन्ही पदांसाठी शारीरिक मापदंड – उंची – १६५ सें.मी. (किमान), छाती – ८१ ते ८६ सें.मी., वजन – किमान ५० कि. निवड पद्धती – पात्र उमेदवारांचे शारीरिक मोजमाप घेतले जाईल.

(१) उंचीच्या प्रमाणात वजनानुसार गुण दिले जातील.

उदा. १६५ सें.मी. उंची, वजन ५० कि. (१८-२१ वष्रे), ५२ कि. (२२-२५ वष्रे), ५४ (२६-२९ वष्रे), ५६ कि. (३० ते ३३ वष्रे). किमान ५ गुण एकूण १० गुण. (२) छाती फुगविणे – किमान ५ सें.मी. १ गुण. पुढील प्रत्येक अधिकच्या १ सें.मी.साठी प्रत्येकी १ गुण.

(३) एलएमव्ही ड्रायिव्हग लायसन्स – २ गुण; अवजड वाहन परवाना – ३ गुण; एनसीसी – ‘ए’ प्रमाणपत्र – १ गुण, ‘बी’ प्रमाणपत्र – २ गुण, ‘सी’ प्रमाणपत्र – ३ गुण; सिव्हिल डिफेन्स कोर्स – २ गुण, होमगार्ड ट्रेिनग – ३ गुण.

(४) स्पोर्ट्स सर्टििफकेट – आंतरशालेय – २ गुण, आंतरजिल्हा – ३ गुण, आंतरराज्य – ४ गुण, नॅशनल लेव्हल – ५ गुण.

लेखी परीक्षा – १०० गुणांची वस्तुनिष्ठ बहुपर्यायी – इंग्रजी आणि मराठी भाषेचे प्राथमिक ज्ञान – २५ गुण, फिजिक्स/केमिस्ट्री – २५ गुण, प्राथमिक गणित – २५ गुण, सामान्यज्ञान, अ‍ॅप्टिटय़ूड टेस्ट, लॉजिकल रिझिनग – २५ गुण. गुणवत्ता यादी लेखी परीक्षेतील गुण आणि इतर गुणांच्या आधारे बनविली जाईल.

ऑनलाइन अर्ज  http://www.mahafireservice.gov.in/ आणि  http://mfs2017.mhpravesh.in/ या संकेतस्थळावर दि. १५ ऑगस्ट २०१७पर्यंत करावेत.