भारतीय नौसेनेत इंजिनीअर्सना एक्झिक्युटिव्ह/टेक्निकल ब्रँचमध्ये अधिकारी होण्यासाठी जून, २०१८ पासून सुरू होणाऱ्या कोस्रेससाठी प्रवेश. एक्झिक्युटिव्ह ब्रँच. (अ) जनरल सíव्हस/हैड्रोग्राफी कॅडर, (ब) एनएआयसी. टेक्निकल ब्रँच - (क) इंजिनीअरिंग ब्रँच (जनरल सíव्हस), (ड) इलेक्ट्रिकल ब्रँच (जनरल सíव्हस), (ई) नेव्हल आíकटेक्चर. पात्रता - जनरल सíव्हस/हैड्रोग्राफी कॅडर - कोणत्याही शाखेतील अभियांत्रिकी पदवी. इतर पदांसाठी - इलेक्ट्रिकल/इलेक्ट्रॉनिक्स/ इलेक्ट्रॉनिक्स टेलि कम्युनिकेशन/इन्स्ट्रुमेंटेशन/ मेकॅनिकल/मेटॅलर्जी/ केमिकल/कॉम्प्युटर सायन्स/ आयटी/सिव्हिल/नेव्हल आíकटेक्चर/मरिन इ. विषयांतील अभियांत्रिकी पदवी. अंतिम वर्षांचे उमेदवार अर्ज करण्यास पात्र आहेत. पदवीला किमान सरासरी ६०% गुण आवश्यक. वयोमर्यादा - उमेदवाराचा जन्म दि. २ जुल १९९३ ते १ जानेवारी १९९९ दरम्यानचा असावा. उंची - पुरुष - किमान १५७ सें.मी., महिला - १५२ सें.मी. एकापेक्षा जास्त ब्रँच/कॅडरसाठी पात्र असलेल्या उमेदवारांनी अर्जात आपला पसंतिक्रम द्यावा. निवड पद्धती - उमेदवारांना सíव्हस सिलेक्शन बोर्डाच्या मुलाखतीसाठी गुणवत्ता आणि पसंतिक्रमानुसार निवडले जाईल. एसएसबी मुलाखत नोव्हेंबर, २०१७ ते मार्च, २०job opportunities१८ दरम्यान बंगलोर/भोपाळ/कोइम्बतूर/विशाखापट्टणम् येथे घेतली जाईल ज्याची सूचना उमेदवारांनी दिलेल्या ई-मेलवर किंवा एसएमएसद्वारे दिली जाईल. मुलाखतीसाठी जाण्या-येण्याचे एसी ३ टायरचे रेल्वे भाडे दिले जाईल. ट्रेिनग - निवडलेल्या उमेदवारांना सब-लेफ्टनंट पदावर नेव्हल ओरिएंटेशन कोर्स (२२/४४ आठवडे कालावधी) साठी नेव्हल अॅकॅडमी इझिमाला, केरळ येथे पाठविले जाईल. ट्रेिनगदरम्यान पूर्ण वेतन/भत्ते दिले जातील. दरमहा वेतन रु. ७१,६४०/- अधिक इतर भत्ते. ऑनलाइन अर्ज www.joinindiannavy.gov.in वर दि. २५ ऑगस्ट २०१७ पर्यंत आवश्यक प्रमाणपत्रांसह (स्कॅन करून अॅटॅच करावीत.) करावेत. इंटेलिजन्स ब्युरो (गृहमंत्रालय, भारत सरकार)मध्ये ‘असिस्टंट सेंट्रल इंटेलिजन्स ऑफिसर ग्रेड-२/ एक्झिक्युटिव्ह’च्या एकूण १,३०० पदांची भरती. (यूआर - ९५१, इमाव - १८४, अजा - १०९, अज - ५६) माजी सनिकांसाठी १०% जागा राखीव. पात्रता - कोणत्याही शाखेतील पदवी. वयोमर्यादा - दि. २९ सप्टेंबर २०१७ रोजी १८ ते २७ वष्रे (इमाव - ३० वष्रे, अजा/अज - ३२ वष्रे, परित्यक्ता/विधवा महिलांसाठी ३५ वष्रे, अजा/अजच्या अशा महिलांसाठी ४० वष्रे). लेखी परीक्षा - टायर-१ वस्तुनिष्ठ बहुपर्यायी १०० गुणांसाठी - वेळ ६० मिनिटे. (अ) जनरल अवेअरनेस, (ब) क्वांटिटेटिव्ह अॅप्टिटय़ूड, (क) लॉजिकल/अॅनालिटिकल अॅबिलिटी, (ड) इंग्लिश लँग्वेज. टायर-२ - वर्णनात्मक (डिस्क्रिप्टिव्ह) स्वरूपाची (अ) निबंध लेखन (३० गुण), (ब) इंग्लिश कॉम्प्रिहेन्शन आणि एस्से रायटिंग (२० गुण). एकूण ५० गुण, वेळ ६० मिनिटे. महाराष्ट्रातील परीक्षा केंद्र - मुंबई आणि नागपूर. परीक्षा शुल्क - रु. १००/- (महिला/अजा/अज यांना फी माफ). ऑनलाइन अर्ज www.mha.nic.in या संकेतस्थळावर दि. २ सप्टेंबर २०१७, २३.५९ वाजेपर्यंत करावेत.