फुड कॉर्पोरेशन ऑफ इंडिया (भारतीय खाद्य निगम) (जाहिरात क्र. ०१/२०१७-एफसीआय वर्ग-४) तर्फे महाराष्ट्र क्षेत्रामध्ये गोवा आणि महाराष्ट्र राज्यांमधील एफसीआयच्या कार्यालयांमध्ये आणि गोदामांमध्ये पहारेकरी पदासाठी भरती.

एकूण रिक्त पदे – १८७ (अजा – १८, अज – १६, इमाव – ५०, यूआर – १०३) (विकलांग ओएच – १ पद, एचएच – ४ पदे राखीव) (माजी सनिकांसाठी ४५ पदे राखीव).

पात्रता – किमान ८ वी इयत्ता उत्तीर्ण.

वयोमर्यादा – दि. १ जुल २०१७ रोजी १८ ते २५ वष्रे (अजा/अज – ३० वष्रे, इमाव – २८ वष्रे, विकलांग – ३५/३८/४० वष्रे).

निवड पद्धती – टप्पा-१ – लेखी परीक्षा – ऑफ लाइन (वस्तुनिष्ठ प्रकारचे बहुपर्यायी प्रश्न).

वेळ – १२० मिनिटे. एकूण प्रश्न – १२० (प्रत्येकी १ गुण, उणे गुण नाहीत.)

लेखी परीक्षा – पाठय़क्रम – क्वांटिटेटीव्ह अ‍ॅप्टिटय़ूड (मात्रात्मक योग्यता), रिझिनग (युक्तिवाद), सामान्य जागरूकता, सामान्य इंग्रजी (८ वी इयत्ता पातळी) (प्रश्नपत्रिका मराठी/कोकणी, िहदी, इंग्रजी भाषेतील) अर्ज करते वेळी उमेदवाराने लेखी परीक्षेसाठी भाषा निवडायची आहे. टप्पा-२ – शारीरिक सहनशक्ती चाचणी (फक्त पात्रता उद्देशासाठी)

(१) धावणे – पुरुष – १०० मीटर – ५ मिनिटे २० सेकंद, महिला – ८०० मीटर – ५ मिनिटे.

(२) लांब उडी – पुरुष – ३ मी. ८५ सें.मी., महिला – ३ मी.

(३) उंच उडी – पुरुष – १ मी. ३० सें.मी., महिला – १ मी.

अर्ज शुल्क – रु. ३००/-अजा/अज/विकलांग/माजी सनिक व महिला उमेदवारांना अर्ज शुल्क माफ आहे.)

ऑनलाइन अर्ज www.fcijobportalmah.com या संकेतस्थळावर दि. ५ ऑगस्ट २०१७ ते ५ सप्टेंबर २०१७ पर्यंत करावेत.

भारतीय वायुसेना, नवी दिल्ली येथे सुपरिटेंडंट (स्टोअर्स) आणि स्टोअर किपरच्या एकूण ९५ पदांची भरती.

(१) सुपरिटेंडंट -५५ पदे (यूआर – ४०, इमाव – १०, अजा – ५).

पात्रता – पदवी उत्तीर्ण संबंधित कामाचा अनुभव.

(२) स्टोअर किपर – ४० पदे (यूआर – ३२, इमाव – ५, अजा – ३). (१ जागा पीएच/एचएच विकलांगांसाठी राखीव).

पात्रता – १२ वी उत्तीर्ण संबंधित कामाचा अनुभव.

वयोमर्यादा – दोन्ही पदांसाठी १८ ते २५ वष्रे (इमाव – २८ वष्रे, अजा/अज-३० वष्रे). विस्तृत जाहिरात एम्प्लॉयमेंट न्यूजच्या दि. १२ ऑगस्ट २०१७ च्या अंकात पहावी. विहित नमुन्यातील अर्ज आवश्यक त्या कागदपत्रांसह ‘डायरेक्टर पीसी (एच्एसी) एअर हेडक्वार्टर्स, ‘जे’ ब्लॉक, नवी दिल्ली’ या पत्त्यावर दि. ११ सप्टेंबर २०१७ पर्यंत पोहोचतील असे पाठवावेत. अर्जाच्या लिफाफ्यावर कोणत्या पदासाठी अर्ज केला आहे आणि कॅटेगरी लिहून पाठवावी.