*    सैन्य रुग्णालय, नगर येथे वॉर्ड साहाय्यिकांच्या ४ जागा-

महिला अर्जदार शालान्त परीक्षा उत्तीर्ण असाव्यात. त्यांनी आरोग्यविषयक प्रशिक्षण घेतलेले असावे अथवा त्यांना रुग्णालयात दाई म्हणून काम करण्याचा अनुभव असायला हवा. वयोगट १८ ते २५ वर्षे. अर्जाच्या नमुन्यासाठी प्रमुख वृत्तपत्रात प्रकाशित झालेली सैन्य रुग्णालय, अहमदनगरची जाहिरात पाहावी.

विहित नमुन्यातील संपूर्णपणे भरलेले व आवश्यक तो तपशील आणि कागदपत्रांसह असणारे अर्ज कमांडंट, मिलिटरी हॉस्पिटल, अहमदनगर- ४१४००२ या पत्त्यावर पाठविण्याची शेवटची तारीख २२ फेब्रुवारी २०१७.

*    केंद्र सरकारच्या कामगार व रोजगार मंत्रालयात उपप्रादेशिक सेवा योजन अधिकाऱ्यांच्या ८ जागा-

अर्जदार समाज कल्याण, कामगार कल्याण, समाजकार्य, अर्थशास्त्र, मानसशास्त्र वा वाणिज्य यांसारख्या विषयांतील पदव्युत्तर पात्रताधारक असावेत व त्यांना संबंधित विषयांतील कामाचा ३ वर्षांचा अनुभव असायला हवा.

अर्जाच्या नमुन्यासाठी एम्प्लॉयमेंट न्यूजच्या २४ ते ३० डिसेंबर २०१६ च्या अंकात प्रकाशित झालेली केंद्रीय कामगार व रोजगार मंत्रालयाची जाहिरात पाहावी.

विहित नमुन्यातील संपूर्णपणे भरलेले अर्ज अंडर सेक्रेटरी टू गव्हर्नमेंट ऑफ इंडिया, डायरेक्टोरेट जनरल ऑफ एम्प्लॉयमेंट, मिनिस्ट्री ऑफ लेबर अ‍ॅण्ड एम्प्लॉयमेंट, श्रमशक्ती भवन, रफी मार्ग, नवी दिल्ली- ११०००१ या पत्त्यावर पाठविण्याची शेवटची तारीख २२ फेब्रुवारी २०१७.

*    इंडियन आर्मीमध्ये एसएससी (टेक.) पुरुष आणि महिलांसाठी कोस्रेस/ऑफिसर्स ट्रेिनग अ‍ॅकॅडमी (ओटीए), चेन्नई येथे ऑक्टोबर २०१७ पासून सुरू होणार.

प्रवेश क्षमता –

(१) सिव्हिल इंजिनीअर – पुरुष (४२ पदे), महिला (५ पदे)

(२) मेकॅनिकल इंजिनीअर – पुरुष (१२), महिला (४)

(३) इलेक्ट्रिकल इंजिनीअर – पुरुष (१८ पदे), महिला (४ पदे)

(४) कॉम्प्युटर सायन्स इंजिनीअर/एम.एस्सी. (कॉम्प्युटर सायन्स) – पुरुष (२७ पदे), महिला (४ पदे)

(५) इलेक्ट्रॉनिक्स अ‍ॅण्ड टेली कम्युनिकेशन – पुरुष (२६ पदे), महिला – (३ पदे)

(६) इलेक्ट्रॉनिक्स (पॉवर) (१३ पदे) इ. एकूण पदे पुरुष – १७५, महिला – २० पदे.

पात्रता – संबंधित विषयातील इंजिनीअरिंगमधील पदवी. पदवीच्या अंतिम वर्षांतील विद्यार्थी पात्र आहेत. शारीरिक मापदंड – उंची – पुरुष – १५७.५ सें.मी., महिला – १५२ सें.मी., वजन – ४२ किलो.

वयोमर्यादा – २० ते २७ वष्रे (उमेदवाराचा जन्म २ ऑक्टोबर १९९९ ते १ ऑक्टोबर १९९७ दरम्यानचा असावा. ४९ आठवडय़ांच्या प्रशिक्षण दरम्यान लेफ्टनंट पदासाठीचे पूर्ण वेतन (रु. ७०,०००/-) देय असेल. दरमहा स्टायपेंड रु. २१,०००/- दिले जाईल. ऑनलाईन अर्ज ६६६. ्न्रल्ल्रल्ल्िरंल्लं१े८.ल्ल्रू.्रल्ल  या संकेतस्थळावर दि.२२ फेब्रुवारी २०७ (१०.०० वाजेपर्यंत) करावेत.

*    डायरेक्टोरेट ऑफ पिंट्रिंग गव्हर्नमेंट ऑफ इंडिया प्रेस, नवी दिल्ली, मिनिस्ट्री ऑफ अर्बन डेव्हलपमेंट, फरिदाबाद (हरियाणा) ‘बुक बाइंडर’ च्या १७ ट्रेड अप्रेंटीस पदांची भरती.

दोन वष्रे कालावधीचे प्रशिक्षण – १ एप्रिल २०१७ पासून. पात्रता – ८वी उत्तीर्ण. वयोमर्यादा – दि. १ एप्रिल २०१७ रोजी १४ वर्षांपेक्षा कमी नसावे. अर्जाचा नमुना डाऊनलोड करण्यासाठी http://www.dop.nic.in या संकेतस्थळाला भेट द्यावी. अर्ज स्वीकारण्याची शेवटची तारीख २४ फेब्रुवारी २०१७.

*    कायदा पदवीधरांसाठी (इंडियन आर्मीमध्ये) जज्ज अ‍ॅडव्होकेट जनरल ब्रँच (जेएजी) मध्ये शॉर्ट सíव्हस कमिशन.

रिक्त पदे पुरुष – १०, महिला – ४. पात्रता – किमान ५५टक्के गुणांसह कायदा विषयातील पदवी बार काऊन्सिल. रजिस्ट्रेशनसाठी पात्र.

वयोमर्यादा – २१ ते २७ वष्रे (उमेदवाराचा जन्म दि. २ जुल १९९० ते १ जुल १९९६ दरम्यानचा असावा.) शारीरिक मापदंड – उंची – पुरुष – १५७.५सें.मी., महिला – १५२ सें.मी., महिला – वजन – ४२ किलो. प्रशिक्षण – ११ महिने. ऑफिसर्स ट्रेिनग अ‍ॅकॅडमी, चेन्नई येथे प्रशिक्षणादरम्यान दरमहा स्टायपेंड – रु. २१,०००/-, वेतन – रु. ८०,०००/- दरमहा सीटीसी. आर्मी ग्रुप इन्शुरन्स रु. ७५ लाख. ऑनलाइन अर्ज http://www.joinindianarmy. nic.in  या संकेतस्थळावर दि. २२ फेब्रुवारी २०१७ (१०.००) पर्यंत करावेत.

    राष्ट्रीय संरक्षण प्रबोधिनी , खडकवासला- पुणे येथे कनिष्ठ कारकुनांच्या ७ जागा- 

अधिक माहिती व तपशिलासाठी प्रमुख वृत्तपत्रात प्रकाशित झालेली राष्ट्रीय संरक्षण प्रबोधिनी, खडकवासलाची जाहिरात पाहावी अथवा एनडीएच्या http://ndacivrect.gov.in/ या संकेतस्थळाला भेट द्यावी.

संगणकीय पद्धतीने वरील संकेतस्थळावर अर्ज करण्याची शेवटची तारीख २३ फेब्रुवारी २०१७.

*    कोल इंडियाच्या विविध विभागांमध्ये मॅनेजमेंट ट्रेनी म्हणून संधी-

अधिक माहिती व तपशिलासाठी प्रमुख वृत्तपत्रात प्रकाशित झालेली कोल इंडिया लिमिटेडची जाहिरात पाहावी अथवा कोल इंडियाच्या http://www.coalindia.in या संकेतस्थळाला भेट द्यावी.

संगणकीय पद्धतीने वरील संकेतस्थळावर अर्ज करण्याची सुधारित अंतिम तारीख २४ फेब्रुवारी २०१७.

*    केंद्र सरकारअंतर्गत संरक्षण मंत्रालय, खडकी- पुणे येथे अग्निशमन जवानांच्या ४ जागा- अर्जदार शालान्त परीक्षा उत्तीर्ण,

अग्निशमन व प्रथमोपचार विषयातील

प्रशिक्षित व शारीरिकदृष्टय़ा सक्षम असायला हवेत. वयोमर्यादा २५ वर्षे.

अर्जाच्या नमुन्यासाठी प्रमुख वृत्तपत्रात प्रकाशित झालेली संरक्षण मंत्रालय, खडकी- पुणेची जाहिरात पाहावी.

विहित नमुन्यातील संपूर्णपणे भरलेले व आवश्यक तो तपशील आणि कागदपत्रांसह असणारे अर्ज ऑफिसर कमांडिंग, एफएलओ डेपो, एएससी- खडकी, खडकी रेल्वे स्टेशनच्या मागे, पुणे-औंध रोड, खडकी, पुणे- ४११०२० या पत्त्यावर पाठविण्याची शेवटची तारीख २५ फेब्रुवारी २०१७