तामिळनाडू र्मकटाईल बँकेच्या महाराष्ट्रातील शाखांमध्ये कारकुनांसाठी संधी

अर्जदारांनी पदवी परीक्षा ५५% गुणांसह उत्तीर्ण केलेली असावी. वयोमर्यादा २४ वर्षे. अधिक माहिती व तपशिलासाठी तामिळनाडू र्मकटाइल बँकेच्या http://www.tmb.in  या संकेतस्थळाला भेट द्यावी. संगणकीय पद्धतीने वरील संकेतस्थळावर अर्ज करण्याची शेवटची तारीख २२ फेब्रुवारी २०१७.

भारतीय नौदलात इंजिनीअर्ससाठी ‘एक्झिक्युटिव्ह ब्रँच’ आणि ‘टेक्निकल ब्रँच’ जानेवारी २०१८ कोर्ससाठी प्रवेश.

पात्रता –

(१) एक्झिक्युटिव्ह ब्रँच (जनरल सíव्हस/हायड्रोग्राफी कॅडर) – बी.ई. (कोणत्याही शाखेतील).

(२) टेक्निकल ब्रँच

(अ) इंजिनीअरिंग ब्रँच (जनरल सर्व्हिस) – मरिन/मेकॅनिकल/प्रॉडक्शन/ इलेक्ट्रिकल/ इलेक्ट्रॉनिक्स/ टेलिकम्युनिकेशन/ कॉम्प्युटर सायन्स/ इन्स्ट्रुमेंटेशन इ.मध्ये बी.ई.

(ब) इलेक्ट्रिकल ब्रँच (जनरल सíव्हस) – इलेक्ट्रिकल/ इलेक्ट्रॉनिक्स/ टेलिकम्युनिकेशन/ कॉम्प्युटर सायन्स इ.मध्ये बी.ई. बी.ई.ला किमान ६०% गुण मिळविणे आवश्यक.

वयोमर्यादा – उमेदवाराचा जन्म २ जानेवारी १९९३ ते १ जुल १९९८ दरम्यानचा असावा. बी.ई.च्या अंतिम वर्षांचे विद्यार्थी (७ व्या सेमिस्टपर्यंत किमान ६०% गुण असलेले) या कोर्ससाठी पात्र आहेत.

उंची – किमान १५७ सें.मी. वेतन – दरमहा रु. ७२,४४४/- ते ८१,७००/-. ट्रेिनग – २२+४४ आठवडे. ट्रेिनगदरम्यान प्रशिक्षणार्थीना पूर्ण वेतन मिळेल. ऑनलाइन अर्ज http://www.joinindiannavy.gov.in या संकेतस्थळावर दि. २४ फेब्रुवारी २०१७ पर्यंत करावेत.

नॅशनल डिफेन्स अ‍ॅकॅडमी, खडकवासला, पुणे येथे

(१) लोवर डिव्हिजन क्लर्क (७ पदे = यूआर ३, अज २, इमाव २)

मल्टी टािस्कग स्टाफ (एमटीएस) (५० पदे = यूआर ३१, इमाव १९), कुक, पेंटर इ. पदांची भरती.

(२) लोवर डिव्हिजन क्लर्क – १२ वी उत्तीर्ण. (स्किल टेस्ट – ३० श.प्र. मि. इंग्रजी टायिपग टेस्ट कॉम्प्युटरवर द्यावी लागेल.) वयोमर्यादा – १८ ते २७ वष्रे.

(३) एमटीएस दहावी उत्तीर्ण. वयोमर्यादा – १८ ते २५ वष्रे. ऑनलाइन अर्ज http://www.ndacivrect.gov.in या संकेतस्थळावर दि. २४  फेब्रुवारी २०१७ पर्यंत करावेत.