• इंडिया पोस्ट पेमेंट बँक लिमिटेड (भारत सरकारच्या पोस्ट खात्याचा अंगिकृत व्यवसाय) मध्ये असिस्टंट मॅनेजर (टेरीटरी)ज्युनियर मॅनेजमेंट ग्रेड स्केल ची भरती

(सामान्य३२७, इमाव१७६, अजा९८, अज४९एकूण  पदे ६५०

Even after eight months engineering students are still waiting for mark sheets
मुंबई : आठ महिन्यांनंतरही अभियांत्रिकीचे विद्यार्थी गुणपत्रिकेच्या प्रतीक्षेत
The Capital Markets Regulatory Authority imposed a fine of Rs 12 crore on Rabindra Bharti Educational Institute in an interim order
वित्तरंजन: हजार टक्क्यांच्या परताव्याचे आमिष
Palghar, teachers election training,
पालघर : निवडणूक प्रशिक्षणाकरिता शिक्षकांची तारांबळ, मुल्यांकन चाचणी व निवडणूक प्रशिक्षण एकाच वेळेत
exam, exam paper
परीक्षेच्या वेळापत्रकात बदल; आता २ ते ४ एप्रिलऐवजी ४ ते ६ एप्रिल दरम्यान परीक्षा

पात्रता – (दि.१ नोव्हेंबर २०१६ रोजी) पदवी उत्तीर्ण.

वयोमर्यादा – दि. १ नोव्हेंबर २०१६ रोजी २० ते ३० वष्रे (इमाव – २०-३३ वष्रे, अजा/अज – २० ते ३५ वष्रे) वेतन – रु. ६५,०००/- सीटीसी प्रतिमाह.

प्रोबेशन – दोन वर्षांच्या प्रोबेशन कालावधी दरम्यान प्रशिक्षण दिले जाईल.

निवड पद्धती – (१) पूर्व परीक्षा, (२) मुख्य परीक्षा, (३) मुलाखत.

अंतिम निवड मुलाखत आणि मुख्य परीक्षेतील कामगिरीवर आधारित. परीक्षा शुल्क – रु.७००/- (अजा/अज/विकलांग यांना रु. १५०/-). अर्ज ऑनलाइन पद्धतीने  http://indiapost.gov.in या संकेतस्थळावर दि. २५ ऑक्टोबर २०१६ पर्यंत करावेत.

 

  • स्टाफ सिलेक्शन कमिशन ज्युनियर इंजिनीयर (सिव्हिल/मेकॅनिकल/इलेक्ट्रिकल .) एक्झामिनेशन२०१६ दि. ते डिसेंबर २०१६ रोजी होणार आहे.

यातून केंद्र सरकारच्या विविध खात्यांमध्ये भरती होणार आहे.

पात्रता – दि.१ ऑगस्ट २०१६ रोजी संबंधित विषयातील पदवी/पदविका उत्तीर्ण.

वयोमर्यादा – दि. १ ऑगस्ट २०१६ रोजी (अ) पोस्ट डिपार्टमेंटसाठी १८ ते २७ वष्रे. (ब) एमईएस/सेंट्रल वॉटर रिसर्च स्टेशन इ.साठी ३० वष्रे. (क) सीपीडब्ल्यूडी/सेंट्रल वॉटर कमिशनसाठी ३२ वष्रे.

परीक्षा शुल्क – रु. १००/- (अजा/अज/विकलांग/ मा.स./महिला यांना फी माफ)

परीक्षा केंद्र – पश्चिम विभागासाठी – मुंबई, नागपूर, पणजी आणि अहमदाबाद. ऑनलाइन पद्धतीने अर्ज http://ssconline.nic.in या संकेतस्थळावर दि. ३ नोव्हेंबर २०१६ पर्यंत करावेत.

 

  • एनएलसी इंडिया लिमिटेडमध्ये असिस्टंट एक्झिक्युटिव्ह मॅनेजर ()च्या एकूण १० पदांची भरती (सामान्य, इमाव, अजा) एनएलसी इंडिया लिमिटेड म्हणजे पूर्वीची नेवेली लिग्नाईट कॉर्पोरेशन लिमिटेड (जाहिरात क्र. ११/२०१६)

पात्रता – रसायनशास्त्रातील पदव्युत्तर पदवी – एमएस्सी (केमिस्ट्री/अ‍ॅनालिटिकल केमिस्ट्री/ऑरगॅनिक केमिस्ट्री/ ऑरगॅनिक केमिस्ट्री/फिजिकल केमिस्ट्री) अधिक चार वर्षांचा पॉवर प्लांट/प्रोसेस इंडस्ट्रीमधील अ‍ॅनालिटिकल/प्लांट ऑपरेशनमधील अनुभव.

उच्चतम वयोमर्यादा – (दि. १ ऑक्टोबर २०१६ रोजी)३०वष्रे (इमाव – ३३ वष्रे, अजा – ३५ वष्रे). देशातील/परदेशातील एनएलसीच्या प्रोजेक्ट्सवर काम करावे लागेल.

निवड पद्धती – मुलाखतीच्या आधारे निवड.

ऑनलाइन पद्धतीने www.nlcindia.com या संकेतस्थळावर दि. २५ ऑक्टोबर २०१६ पर्यंत अर्ज करावेत. ऑनलाइन अर्ज केल्यानंतर त्याच्या दोन िपट्रआऊट्स काढाव्यात. एक प्रत स्वत:कडे ठेवून दुसरी प्रत ‘दी जनरल मॅनेजर (एचआर), रिक्रुटमेंट सेल, ह्य़ुमन रिसोर्स डिपार्टमेंट, कॉर्पोरेट ऑफिस, एनएलसी इंडिया लिमिटेड, ब्लॉक नं. १, नेवेल्ली – ६०७ ८०१, तामिळनाडू’ या पत्त्यावर पाठवावी.

 

  • दि न्यू इंडिया एन्श्योरन्स कंपनी लिमिटेडमध्ये ॅडमिनिस्ट्रेटिव्ह ऑफिसर (जनरलिस्ट) च्या ३०० पदांची भरती.

(अजा४३, अज१५, इमाव८४, जन१५८) ही रिक्त पदे मुंबई, मुंबई उपनगर, रत्नागिरी, रायगड, सिंधुदुर्ग या जिल्ह्य़ांतील आणि गोवा गुजरात राज्यांतील आहेत.

पात्रता – दि. १ ऑक्टोबर २०१६ रोजी किमान ६०% गुणांसह पदवी उत्तीर्ण. (अजा/अज/विकलांग यांना ५५%गुण)

वयोमर्यादा – दि. १ ऑक्टोबर २०१६ रोजी २१ ते ३० वष्रे (अजा/अज – २१ ते ३५ वष्रे, इमाव – २१ ते ३३ वष्रे).

फेज – १ ऑनलाइन परीक्षा दि. १७ डिसेंबर २०१६ रोजी होईल.

फेज -२  ऑनलाइन परीक्षा जानेवारी २०१७ मध्ये होईल. प्रोबेशन कालावधी १ वर्ष.

ऑनलाइन पद्धतीने अर्ज  http://newindia.co.in या संकेतस्थळावर दि. १ नोव्हेंबर २०१६ पर्यंत करावेत.