टाटा मूलभूत संशोधन संस्थेअंतर्गत नॅशनल सेंटर फॉर रेडिओ- अ‍ॅस्ट्रॉफिजिक्स पुणे येथे अंशकालीन वैद्यकीय अधिकारी म्हणून संधी-

अर्जदार एमबीबीएस पात्रताधारक असावेत व त्यांना वैद्यकीय सेवाविषयक कामाचा ३ ते ५ वर्षांचा अनुभव असायला हवा. अधिक माहिती व तपशिलासाठी नॅशनल सेंटर फॉर रेडिओ अ‍ॅस्ट्रॉफिजिक्स, नारायणगाव, ता. जुन्नर (जि. पुणे) येथील दूरध्वनी क्र. ०२०- २५७१९००० अथवा ०२०- २५७१९२२३ वर संपर्क साधावा अथवा सेंटरच्या www.ncra.tifr.res.in  अथवा www.gmrt.ncra.tifr.res.in  या संकेतस्थळांना भेट द्यावी. संपूर्णपणे भरलेले अर्ज नॅशनल सेंटर फॉर रेडिओ अ‍ॅस्ट्रोफिजिक्स, टाटा इंस्टिटय़ूट ऑफ फंडामेंटल रिसर्च, पोस्ट बॅग ३, गणेशखिंड, पुणे विद्यापीठ परिसर, पुणे ४११००७ या पत्त्यावर साध्या टपालाने पाठविण्याची शेवटची तारीख ३१ मार्च २०१७.