मुंबई, मुंबई उपनगरे, ठाणे, पालघर, रायगड आणि नाशिक जिल्ह्य़ांतील रहिवासी उमेदवारांसाठी सन्य भरती मेळावा

हा मेळावा १ ते ११ नोव्हेंबर २०१७ दरम्यान मुंब्रा येथे आयोजित करण्यात येणार आहे. ‘माननीय श्री. अब्दुल कलाम आझाद स्पोर्ट्स स्टेडियम, कौसा व्हॅली, मुंब्रा, जि. ठाणे’ येथे हा मेळावा होईल. यावेळी पुढील पदांसाठी भरती प्रक्रिया होईल.

(ए) सोल्जर जनरल  डय़ुटी (जीडी)

पात्रता – १० वी किमान ४५% गुणांसह उत्तीर्ण. (प्रत्येक विषयात किमान ३३% गुण आवश्यक.) (उच्च शिक्षित उमेदवारांना गुणांची अट नाही.)

वयोमर्यादा – साडेसतरा ते २१वष्रे.

(बी) सोल्जर टेक्निकल,

(सी) सोल्जर टेक्निकल (एव्हिएशन आणि अ‍ॅम्युनिशन एक्झामिनर)

(बी) आणि (सी) पदांसाठी पात्रता – १२ वी विज्ञान (पीसीएम आणि इंग्रजी विषयांसह) किमान ५०% गुण सरासरी आवश्यक. प्रत्येक विषयात किमान ४०% गुण. ‘सी’ पदांसाठी मेकॅनिकल/इलेक्ट्रिकल/ऑटोमोबाईल/कॉम्प्युटर सायन्स/इलेक्ट्रॉनिक्स/इन्स्ट्रुमेंटेशन इंजिनीअरिंग पदविकाधारकसुद्धा पात्र आहेत.

(डी) सोल्जर क्लर्क/स्टोअर किपर टेक्निकल – १२ वी (आर्ट्स/कॉमर्स/सायन्स) किमान ६०% गुण सरासरी (प्रत्येक विषयात किमान ५०% गुण आवश्यक इंग्रजी/गणित/अकाऊंट्स/बुक किपिंग यापकी एक विषय १० वी किंवा १२ वीला) किंवा बी.एस्सी. (मॅथ्स आणि इंग्लिश) यांना १०वी/१२वीच्या गुणांची अट शिथिल

(ई) सोल्जर टेक्निकल (नìसग असिस्टंट).

पात्रता – १२ वी (विज्ञान, पीसीबी इंग्लिश विषयासह किमान ५०% गुणांसह प्रत्येक विषयात किमान ४०% गुण आवश्यक किंवा बी.एस्सी./बी.झेड., बायोसायन्स, इंग्रजी विषयासह उत्तीर्ण असल्यास १२ वीला गुणांची अट शिथिल.

(एफ ) सोल्जर टेक्निकल ड्रेसर,

(जी) सोल्जर ट्रेड्समन – १०वी/आयटीआय उत्तीर्ण. (साईस (एब्म), मेस कीपर आणि हाऊस किपरसाठी ८वी उत्तीर्ण पात्र आहेत.)

(एच) हवालदार एज्युकेशन – (एईसी).

पात्रता – ग्रुप-एक्स – बी.ए./बी.एस्सी./ बी.सी.ए./बी.एस्सी.(आय.टी.)बी.एड.

ग्रुप-वायसाठी बी.एड. पदवीची अट शिथिल आहे.

ऑनलाइन रजिस्ट्रेशन www.joinindianarmy.nic.in या संकेतस्थळावर दि. १६ ऑक्टोबर, २०१७ पर्यंत करावेत. अ‍ॅडमिट कार्ड दि. १७ ऑक्टोबर, २०१७ नंतर डाऊनलोड करून घ्यावेत.

भारतीय नौसेनेत जुल, २०१८ पासून सुरू होणाऱ्या ऑफिसर्स कोर्ससाठी प्रवेश. (ए) पीसी (एज्युकेशन) ब्रँच.

एम्.एस्सी. (फिजिक्स/न्युक्लियर फिजिक्स) (बी.एस्सी.ला मॅथ्स विषय आवश्यक) – ४ पदे.

एम्.एस्सी. (मॅथ्स/ऑपरेशन रिसर्च) – ४ पदे.  (बी.एस्सी.ला फिजिक्स विषय आवश्यक)

एम्.ए. (इंग्लिश) – २ पदे.

एम.ए. (हिस्ट्री) – २ पदे.

बी.ई. (इलेक्ट्रॉनिक्स आणि कम्युनिकेशन/इलेक्ट्रिकल

आणि इलेक्ट्रॉनिक्स इ.) – ५ पदे.

बी.ई. मेकॅनिकल इंजिनीअरिंग.

(बी) एस.एस.सी. (लॉजिस्टिक्स) – ६ पदे. बी.ई. (कोणत्याही शाखेतील)/बी.आर्च./ एम.बी.ए./बी.एस्सी./बी.कॉम./बी.एस्सी. (आयटी) (फायनान्स/लॉजिस्टिक्स/सप्लाय चेन मॅनेजमेंट/मटेरियल्स मॅनेजमेंटमधील पदविका) किंवा एम.सी.ए./एम.एस्सी. (आय्.टी.)

(सी) एस.एस्सी. एक्स (आयटी) –

बी.ई./ एम्.एस्सी. – कॉम्प्युटर सायन्स/आयटी, बी.एस्सी. (आयटी), बी.सी.ए. इ. – १५ पदे.

एस.एस्सी. (लॉ कॅडर) – २ पदे कायदा पदवी.

सर्व पदांसाठी पात्रता परीक्षेत गुणांची अट किमान ६०% (फक्त लॉसाठी गुणांची अट ५५%).

उंची – पुरुष – १५७ सें.मी., महिला – १५२ सें.मी.

एज्युकेशन आणि लॉ कॅडरमध्ये फक्त अविवाहित पुरुषांसाठी जागा उपलब्ध. इतर कॅडरसाठी अविवाहित पुरुष आणि महिलादेखील पात्र आहेत. निवडलेल्या उमेदवारांना सब-लेफ्टनंट पदावर तनात करून प्रशिक्षणासाठी पाठविण्यात येईल.

ऑनलाइन अर्ज www.joinindiannavy.gov.in या संकेतस्थळावर दि. २० ऑक्टोबर २०१७ पर्यंत करावेत.