इन्स्टिटय़ूट ऑफ हॉटेल मॅनेजमेंट, केटिरग टेक्नॉलॉजी अ‍ॅण्ड अ‍ॅप्लाइड न्यूट्रिशन, वीर सावरकर मार्ग, दादर (प.), मुंबई- ४०० ०२८ येथे एलडीसीच्या ४ पदांची भरती.

(यूआर ३, इमाव १)

पात्रता – १२ वी उत्तीर्ण आणि इंग्रजी टायिपग स्पीड ४० श.प्र.मि.

वयोमर्यादा – २८ वष्रेपर्यंत (इमाव – ३१ वष्रे, अजा/ अज – ३३ वष्रेपर्यंत).

वेतन – रु. २७,६९०/-.

निवड पद्धती – लेखी परीक्षा आणि मुलाखत.

शुल्क – रु. ५००/- डीडी. ‘इन्स्टिटय़ूट ऑफ हॉटेल मॅनेजमेंट’ यांच्या नावे मुंबई येथे देय असावा. www.ihmctan.edu या संकेतस्थळावरून अर्जाचा नमुना डाऊनलोड करावा. पूर्ण भरलेले अर्ज स्वत:चा पत्ता लिहिलेल्या दोन लिफाफ्यांसह वरील पत्त्यावर प्रिन्सिपल यांना दि. २३ ऑक्टोबर २०१७ पर्यंत पोहोचतील असे पाठवावेत.

युनियन बँक ऑफ इंडिया, ‘क्रेडिट ऑफिसरच्या २०० पदांची भरती. (अजा – ४९, अज – २४, इमाव – ६५, यूआर – ६२) (८ पदे विकलांगांसाठी राखीव)

पात्रता – पदवी (कोणत्याही शाखेतील) किमान ६०% गुणांसह उत्तीर्ण.

(अजा/ अजसाठी ५५% गुण)  २ वर्षांचा अनुभव आवश्यक.

एम.बी.ए. (फायनान्स)/ सी.ए./ सी.एफ.ए./ आयसीडब्ल्यूए/ सीएआयआरबी पात्रताधारकांना प्राधान्य.

वयोमर्यादा – दि. ४ ऑक्टोबर २०१७ रोजी २३ ते ३२ वष्रे. प्रोबेशन कालावधी २ वष्रे असेल.

निवड पद्धती – ऑनलाइन परीक्षा रिझिनग आणि इंग्रजी भाषा (प्रत्येकी ५० प्रश्न २५ गुणांसाठी), क्वांटिटेटिव्ह अ‍ॅप्टिटय़ूड ५० प्रश्न ५० गुण आणि प्रोफेशनल नॉलेज ५० प्रश्न १०० गुण  एकूण २०० गुण.

कालावधी – १२० मिनिटे ग्रुप डिस्कशन/ मुलाखत – ५० गुण.

परीक्षा केंद्र – मुंबई, दिल्ली, बंगळूरु इ. ऑनलाइन अर्ज www.unionbankofindia.co.in वर दि. २१ ऑक्टोबर २०१७ पर्यंत करावेत.

जनकल्याण सहकारी बँक लिमिटेड, मुंबई – मॅनेजमेंट ट्रेनी (क्रेडिट/ रिकव्हरी/ अकाऊंट्स आणि ऑपरेशन्स/ ऑडिट खात्यांमध्ये) आणि इन्फम्रेशन टेक्नॉलॉजी खात्यामध्ये नेटवर्क इंजिनीअर्स पदांची भरती.

(१) मॅनेजमेंट ट्रेनी – पात्रता – बी.कॉम. पदवी प्रथम श्रेणीत उत्तीर्ण. एम.बी.ए. (फायनान्स) सीए (इंटर)/ सीए/ सीएफए/ एलएलबी कोअर बँकिंगमधील २ वर्षांचा अनुभव)

वयोमर्यादा – ३० वर्षांपर्यंत.

(२) नेटवर्क इंजिनीअर – पात्रता – बी.ई./ डिप्लोमा इन कॉम्प्युटर, सीसीएनए ३ वर्षांचा अनुभव.

वयोमर्यादा – ३५ वष्रेपर्यंत.

विस्तृत माहिती www.jksbl.com या संकेतस्थळावर उपलब्ध. उमेदवारांनी ई-मेलद्वारा आपला रिझ्युमे hr@jksbl.com वर दि. १९ ऑक्टोबर २०१७ पर्यंत पाठवावा.

भारतीय विमान वाहतूक प्राधिकरणात ज्युनिअर असिस्टंट (फायर सव्‍‌र्हिसेस)च्या ६० जागा-

अर्जदार दहावी उत्तीर्ण व त्यानंतर पदविका पात्रताधारक असावेत अथवा त्यांनी १२ वीची परीक्षा कमीत कमी ५०% गुणांसह उत्तीर्ण केलेली असावी व त्यांच्याकडे अवजड वाहन चालविण्याचा वैध परवाना असायला हवा. वयोमर्यादा ३० वर्षे.

अधिक माहिती व तपशिलासाठी एम्प्लॉयमेंट न्यूजच्या २३ ते २९ सप्टेंबर २०१७ च्या अंकात प्रकाशित झालेली भारतीय विमान वाहतूक प्राधिकरणाची जाहिरात पाहावी अथवा प्राधिकरणाच्या http://www.airportsindia.org.in या संकेतस्थळाला भेट द्यावी. त्यावरील  ूं१ी१२ या लिंकवर अधिक माहिती मिळेल. संगणकीय पद्धतीने वरील संकेतस्थळावर अर्ज करण्याची शेवटची तारीख १४ ऑक्टोबर २०१७.

फार्मसी काऊंसिल ऑफ इंडियामध्ये तांत्रिक साहाय्यकांच्या चार जागा-

अर्जदार फार्मसी विषयातील पदव्युत्तर पात्रताधारक असावेत. त्यांची फार्मसी काऊंसिलकडे नोंदणी झालेली असावी व त्यांना संबंधित कामाचा दोन वर्षांचा अनुभव असायला हवा. संगणकाचे ज्ञान आवश्यक. वयोमर्यादा ३५ वर्षे. अर्जाचा नमुना व तपशिलासाठी एम्प्लॉयमेंट न्यूजच्या २३ ते २९ सप्टेंबर २०१७ च्या अंकातील फार्मसी काऊंसिल ऑफ इंडियाची जाहिरात पाहावी. विहित नमुन्यातील संपूर्णपणे भरलेले अर्ज रजिस्ट्रार कम सेक्रेटरी, फार्मसी काऊंसिल ऑफ इंडिया, कंबाइन्ड काउंसिल बिल्डिंग, कोटला रोड, एैवान- ए- गालिब मार्ग, नवी दिल्ली ११०००२ या पत्त्यावर पाठविण्याची शेवटची तारीख १७ ऑक्टोबर २०१७.

महाराष्ट्र कृषी उद्योग व विकास महामंडळ- मुंबई येथे महाव्यवस्थापक (फायनान्स व अकाउंट्स) म्हणून संधी-

अधिक माहिती व तपशिलासाठी प्रमुख वृत्तपत्रात प्रकाशित झालेली महाराष्ट्र कृषी उद्योग व विकास महामंडळ- मुंबईची जाहिरात पाहावी अथवा महामंडळाच्या www.maidcmumbai.com या संकेतस्थळाला भेट द्यावी. संपूर्णपणे भरलेले अर्ज डेप्युटी जनरल मॅनेजर (अ‍ॅडमिनिस्ट्रेशन) महाराष्ट्र अ‍ॅग्रो- इंडस्ट्रीज डेव्हल्पमेंट कॉर्पोरेशन लि. कृषी उद्योग भवन, दिनकरराव देसाई मार्ग, आरे मिल्क कॉलनी, गोरेगाव (पूर्व), मुंबई- ४०००६५ या पत्त्यावर पाठविण्याची शेवटची तारीख १६ ऑक्टोबर २०१७.