इन्स्टिटय़ूट ऑफ बँकिंग पर्सोनेल सिलेक्शन (आयबीपीएस) अंतर्गत येणाऱ्या २० शेडय़ुल्ड बँकांमध्ये प्रोबेशनरी ऑफिसर/मॅनेजमेंट ट्रेनी पदांची भरती.

उपलब्ध डेटा पाहता १० सहयोगी बँकांमध्ये ३,२४७ पदांची भरती आहे. (यूआर – १,७२३, इमाव – ८०६, अजा – ४८२, अज – २३७) (विकलांग एचआय- ५१, ओसी – ५३, व्हीआय – ३८ )

वेळोवेळी रिक्त पदांचा तपशील आयबीपीएसच्या संकेतस्थळावर अपडेट केला जाईल. महाराष्ट्रात एकूण १७ परीक्षा केंद्रांवर परीक्षा घेण्यात येईल.

पात्रता – दि. ६ ऑगस्ट २०१७ रोजी पदवी उत्तीर्ण. वयोमर्यादा – दि. १ जुल २०१७ रोजी २० ते ३० वष्रे (उच्चतम वयोमर्यादा शिथिलक्षम अजा/अज – ५वष्रे, इमाव -३ वष्रे, विकलांग -१० वष्रे). अजा/अज/ अल्पसंख्याक उमेदवारांना प्रि एक्झामिनेशन ट्रेिनग विनामूल्य देण्यात येईल. (महाराष्ट्रातील केंद्रे – मुंबई, नागपूर, पुणे, पणजी (गोवा)) तसे त्यांनी ऑनलाइन अर्ज भरताना नमूद करावे.

परीक्षा शुल्क – रु. ६००/- (अजा/अज/ विकलांग यांना रु. १००/-).

निवड पद्धती – (१) ऑनलाइन प्रीलिम एक्झाम – इंग्रजी भाषा ३० प्रश्न/गुण क्वांटिटेटिव्ह अ‍ॅप्टिटय़ूूड – ३५ प्रश्न/गुण, रिझिनग अ‍ॅबिलिटी – ३५ प्रश्न/गुण अशा एकूण १०० गुणांसाठी कालावधी ६० मिनिटे.

(२) मुख्य परीक्षेसाठी पूर्व परीक्षेव्यतिरिक्त जनरल अवेअरनेस (बँकांच्या संदर्भावर अधिक भर) आणि कॉम्प्युटर नॉलेज या विषयांचीदेखील परीक्षा होईल.

एकूण २०० गुण प्रत्येक सेक्शनला कालावधी ठरलेला आहे. एकूण कालावधी १४०मिनिटे.

(३) मुलाखत. आयबीपीएस परीक्षा पद्धतीत बदल करण्याचा हक्क राखून ठेवत आहे. याची माहिती वेबसाइटवर दिली जाईल. ऑनलाइन अर्ज www.ibps.in या संकेतस्थळावर CWE/PO/MT िलकवर दि. ६ ऑगस्ट ते २६ऑगस्ट २०१७ पर्यंत भरता येईल.