अलाहाबाद बँकेत सीए – वित्तीय विश्लेषकांच्या जागा
या भरतीअंतर्गत ५० जागा भरण्यात येतील. उमेदवार सीए, आयसीडब्ल्यूए अथवा एमबीए फायनान्स यांसारखी पात्रता चांगल्या शैक्षणिक आलेखासह उत्तीर्ण केलेले असावेत. त्यांना संबंधित कामाचा दोन वर्षांचा अनुभव असावा. वयोमर्यादा- ३५ वर्षे. अधिक माहितीसाठी ‘एम्प्लॉयमेंट न्यूज’च्या ७ ते १३ मे २०१६ च्या अंकातील जाहिरात पाहावी अथवा अलाहाबाद बँकेच्या http://www.allahabadbank.in या संकेतस्थळाला भेट द्यावी. संगणकीय पद्धतीने वरील संकेतस्थळावर ३० मे २०१६ पर्यंत अर्ज करावा.

राष्ट्रीय फलोत्पादन मंडळात फलोत्पादन अधिकाऱ्यांच्या जागा
याअंतर्गत ८ जागा भरण्यात येणार आहेत. अधिक माहितीसाठी ‘एम्प्लॉयमेंट न्यूज’च्या ३० एप्रिल –
६ मे २०१६ च्या अंकातील जाहिरात पाहावी अथवा http://www.nhb.gov.in संकेतस्थळाला भेट द्यावी.
अर्ज मॅनेजिंग डायरेक्टर, नॅशनल हॉर्टिकल्चरल बोर्ड, प्लॉट नं. ८५, सेक्टर- १८, इन्स्टिटय़ूशनल एरिया, गुडगाव, हरियाणा- १२२०१५ या पत्त्यावर ३० मे २०१६ पर्यंत पाठवावेत.

संरक्षण मंत्रालयात साहाय्यक सुरक्षा अधिकाऱ्यांच्या ३ जागा
उमेदवार पदवीधर असावेत. त्यांना सुरक्षा व अग्निशमन संदर्भातील कामांचा ३ वर्षांचा अनुभव असावा. अधिक माहितीसाठी ‘एम्प्लॉयमेंट न्यूज’च्या २ ते ८ एप्रिल २०१६ च्या अंकात प्रकाशित झालेली संरक्षण मंत्रालयाची जाहिरात पाहावी.
अर्ज अ‍ॅडिशनल डायरेक्टोरेट जनरल ऑफ मॅनपॉवर, एमपी ४ (सिव्हिल) एजिज ब्रॅण्ड इंटिग्रेटेड हेडक्वॉर्टर्स ऑफ मिनिस्ट्री ऑफ डिफेन्स (आर्मी), वेस्ट ब्लॉक- ३, आर. के. पुरम्, नवी दिल्ली- ११००६६. या पत्त्यावर २ जून २०१६ पर्यंत पाठवावेत.

मुंबई मेट्रो रेल कॉर्पोरेशनमध्ये सहाय्यक व्यवस्थापकांच्या जागा
मनुष्यबळ विकास आणि प्रशासकीय विभागात सहाय्यक व्यवस्थापकांच्या २ जागा भरण्यात
येणार आहेत.
अधिक माहितीसाठी http://www.mmrcl.com या संकेतस्थळाला भेट द्यावी. संगणकीय पद्धतीने वरील संकेतस्थळावर ३१ मे २०१६ पर्यंत अर्ज करावा.

सेंट्रल सॉल्ट अ‍ॅण्ड मरिन केमिकल्स रीसर्च इन्स्टिटय़ूट, भावनगर येथे संशोधक/ वरिष्ठ संशोधकाच्या जागा
या पदभरतीअंतर्गत ६ जागा भरण्यात येणार आहेत. वयोगट- ३२ ते ३८ वर्षे. अधिक माहितीसाठी ‘एम्प्लॉयमेंट न्यूज’च्या २३ ते
२९ एप्रिल २०१६ च्या अंकातील जाहिरात पाहावी अथवा http://www.csmcri.org या संकेतस्थळाला भेट द्यावी. संगणकीय पद्धतीने वरील संकेतस्थळावर ३१ मे २०१६ पर्यंत अर्ज करावा.

पॉवर ग्रिड कॉर्पोरेशन- अकाऊन्टस् विभागात सहाय्यक अधिकाऱ्यांची पदभरती
याअंतर्गत सहाय्यक अधिकाऱ्यांच्या ३१ जागा भरण्यात येणार आहेत. उमेदवारांनी सीए/ आयसीडब्ल्यूए यांसारखी पात्रता उत्तीर्ण केलेली असावी तसेच त्यांना संगणकीय ज्ञान असावे.
अधिक माहितीसाठी ‘एम्प्लॉयमेंट न्यूज’च्या
३० एप्रिल – ६ मे २०१६ च्या अंकातील जाहिरात पाहावी अथवा http://www.powergridindia.com या संकेतस्थळाला भेट द्यावी. संगणकीय पद्धतीने वरील संकेतस्थळावर ३१ मे २०१६ पर्यंत अर्ज करावा.
साहाय्यक निबंधक भागीदारी संस्था- सामान्य राज्य सेवा गट- ब मध्ये भरती
महाराष्ट्र लोकसेवा आयोगातर्फे याअंतर्गत ५ जागा भरण्यात येणार आहेत. अधिक माहितीकरता आयोगाच्या http://www.upsc.gov.in अथवा mahaupsc.mahaonline.gov.in या संकेतस्थळांना भेट द्यावी. संगणकीय पद्धतीने वरील संकेतस्थळांवर ३१ मे २०१६ पर्यंत अर्ज करावा.

‘डीआरडीओ’मध्ये ज्युनिअर रिसर्च फेलोशिपच्या १० जागा
उमेदवार संगणक विज्ञान, इलेक्ट्रॉनिक्स, इलेक्ट्रॉनिक्स अ‍ॅण्ड कम्युनिकेशन इंजिनीअरिंगमधील पदवीधर अथवा गणितातील पदव्युत्तर पात्रताधारक असावेत. त्यांचा शैक्षणिक आलेख उत्तम असावा. ते एनईटी/ जीएटीई यांसारखे प्रवेश पात्रताधारक असावेत. वयोमर्यादा २८ वर्षे.
अधिक तपशिलासाठी ‘एम्प्लॉयमेंट न्यूज’च्या
३० एप्रिल – ६ मे २०१६ च्या अंकात प्रकाशित झालेली ‘डीआरडीओ’ची जाहिरात पाहावी.

सैन्यदलाच्या शिक्षण विभागात १० जागा
उमेदवार एमए वा एम.एस्सी. पात्रताधारक असावेत. वयोमर्यादा २७ वर्षे. अधिक माहितीसाठी ‘एम्प्लॉयमेंट न्यूज’च्या ३० एप्रिल – ६ मे २०१६ च्या अंकात प्रकाशित झालेली सैन्यदलाची जाहिरात पाहावी अथवा सैन्यदलाच्या http://www.joinindianarmy.nic.in या संकेतस्थळाला भेट द्यावी. संगणकीय पद्धतीने वरील संकेतस्थळावर ८ जून २०१६ पर्यंत अर्ज करावा.

फूड कॉर्पोरेशन ऑफ इंडियामध्ये सुरक्षारक्षकांच्या ८ जागा
अर्जदार माध्यमिक पात्रता पूर्ण केलेले व शारीरिकदृष्टय़ा सक्षम असावेत. वयोमर्यादा ३५ वर्षे.
अधिक माहितीसाठी ‘एम्प्लॉयमेंट न्यूज’च्या १४ ते २० मे २०१६ च्या अंकातील फूड कॉर्पोरेशनची जाहिरात पाहावी अथवा एफसीआयच्या fcijobsportal.com या संकेतस्थळाला भेट द्यावी. संगणकीय पद्धतीने वरील संकेतस्थळावर
३ जून २०१६ पर्यंत अर्ज करावेत.

नुमालीगड रिफायनरीमध्ये प्रशिक्षार्थी इंजिनीअर्सच्या २१ जागा
उमेदवार केमिकल, मेकॅनिकल व इन्स्ट्रुमेन्टेशन इंजिनीअरिंगमधील पदवीधर असावेत.
अधिक तपशिलासाठी ‘एम्प्लॉयमेंट न्यूज’च्या १४ ते २० मे २०१६ च्या अंकातील जाहिरात पाहावी. अथवा http://www.nrl.co.in या संकेतस्थळाला भेट द्यावी. संगणकीय पद्धतीने वरील संकेतस्थळावर ६ जून २०१६ पर्यंत अर्ज करावेत.

द. वा. आंबुलकर