* भारत पेट्रोलियम कॉर्पोरेशन लिमिटेड यांच्या मुंबई रिफायनरीमध्ये टेक्निशियन अप्रेंटिसच्या (डिप्लोमा) एकूण ८५ पदांची भरती.

पात्रता – केमिकल, मेकॅनिकल, इलेक्ट्रिकल, इन्स्ट्रमेंटेशन, फायर अँड सेफ्टी, मेडिकल लॅबोरेटरी टेक्नॉलॉजी आणि सिव्हील या विषयांतील अभियांत्रिकी पदविका किमान ६०% गुणांसह उत्तीर्ण. (अजा/अज – किमान ५०% गुण)

निवड पद्धती – जून-जुलमध्ये ट्रेड टेस्ट घेण्यात येईल वैद्यकीय तपासणी. प्रति महिना स्टायपेंड रु. १५,०००/- विहित नमुन्यातील अर्ज (लोकसत्ताच्या दि. १८ मे २०१७ च्या अंकात नमुना दिला आहे.) ‘डीजीएम (अ‍ॅडमिन/टी अँड डी) एमआर, बीपीसीएल, मुंबई रिफायनरी, माहूल,

मुंबई – ४०० ०७४’ या पत्त्यावर दि. १० जून २०१७ पर्यंत पोहोचतील असे पाठवावेत.

*  महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत सरळ सेवा भरती.

(१) सरकारी कामगार अधिकारी, महाराष्ट्र कामगार सेवा गट ‘ब’ (एकूण ८ पदे).

(२) साहाय्यक कामगार आयुक्त, कामगार सेवा, गट ‘अ’ (एकूण ११ पदे).

पात्रता – लेबर वेल्फेअर/इंडस्ट्रियल

रिलेशन्स आणि पर्सोनेल मॅनेजमेंटमधील पदव्युत्तर पदवी अथवा पदविका किंवा आर्ट्स, कॉमर्स, सायन्स, इकोनॉमिक्स,

लॉ, अ‍ॅग्रिकल्चर, स्टॅटिस्टिक्स सोशल वर्क, सोशल सायन्स किंवा गणित या विषयांतील पदवी.

साहाय्यक कामगार आयुक्त गट ‘अ’ पदांसाठी लेबर ऑफिसर/वेल्फेअर ऑफिसर पदावर १ वर्षांचा कामाचा अनुभव आवश्यक.

परीक्षा शुल्क – रु. ५२३/-

(मागासवर्गीय रु. ३२३/-). सरकारी कामगार आयुक्त गट-ब पदासाठी परीक्षा शुल्क –

रु. ३७३/- (मागासवर्गीय रु. २७३/-).

वयोमर्यादा – दि. १ सप्टेंबर २०१७ रोजी

३८ वष्रे. (मागासवर्गीय ४३ वष्रे) ऑनलाइन अर्ज   <https://mahampsc.mahaonline.gov.in/&gt; या संकेतस्थळावर दि. ७ जून २०१७ पर्यंत करावेत.

*  महाराष्ट्र लोकसेवा आयोग, राज्य शासनाच्या विक्रीकर विभागातील एकूण २९६ ‘कर साहाय्यक’ पदांच्या भरती

‘कर साहाय्यक पूर्व परीक्षा – २०१७’ दि. २० ऑगस्ट २०१७ रोजी घेणार आहे.

(अजा – ४२, अज – २४, विजा (अ) – १०, भज (ब) -५, भज (क) – १३, भज (ड) – ५, इमाव – ६३, विमाप्र – ७, खुला – १२७)

पात्रता – पदवी उत्तीर्ण मराठी टंकलेखनाचा वेग ३० शप्रमि आणि इंग्रजी टंकलेखनाचा वेग ४० शप्रमि या अर्हतेचे शासकीय वाणिज्य परीक्षा मंडळाचे प्रमाणपत्र. (पदवी परीक्षेस बसलेले उमेदवार पात्र आहेत.)

वयोमर्यादा -१ ऑगस्ट २०१७  रोजी १८-३८ वष्रे (मागासवर्गीय – १८ ते ४३ वष्रे).

परीक्षेचे टप्पे – (१) पूर्व परीक्षा – १०० गुण, (२) मुख्य परीक्षा – ४०० गुण.

परीक्षा शुल्क – रु. ३७३/-

(मागासवर्गीय रु. २७३/-). विस्तृत जाहिरात http://www.mpsc.gov.in  या संकेतस्थळावर उपलब्ध.

पूर्व परीक्षेत पात्र ठरलेल्या उमेदवारांची मुख्य परीक्षा ३१ डिसेंबर २०१७ रोजी आयोजित केली जाईल.  ऑनलाईन अर्ज  <https://mahampsc.mahaonline.

gov.in/>  या संकेतस्थळावर दि. ६ जून २०१७ पर्यंत करावेत.