नॅशनल सेंटर फॉर ऑरगॅनिक फार्मिगमध्ये कनिष्ठ संशोधक अधिकाऱ्यांच्या २ जागा-

अधिक माहिती व तपशिलासाठी एम्प्लॉयमेंट न्यूजच्या ९ ते १५ सप्टेंबर २०१७ च्या अंकात प्रकाशित झालेली केंद्रीय लोकसेवा आयोगाची जाहिरात पहावी अथवा आयोगाच्या http://www.upsconline.nic.in अथवा http://www.upsc.gov.in   या संकेतस्थळांना भेट द्यावी. संगणकीय पद्धतीने वरील संकेतस्थळावर अर्ज करण्याची शेवटची तारीख २८ सप्टेंबर.

नॅशनल इन्शुरन्स अकादमी, पुणे येथे करार तत्वावर होस्टेल वॉर्डन कम सुपरवाइझर म्हणून संधी-

अधिक माहिती व तपशीलासाठी प्रमुख वृत्तपत्रात प्रकाशित झालेली नॅशनल इन्शुरन्स अकादमी, पुणेची जाहिराच पहावी अथवा  www.niapune.org.in या संकेतस्थळाला भेट द्यावी. तपशीलवार भरलेले अर्ज ऑफिस ऑफ डायरेक्टर, नॅशनल इन्शुरन्स अकादमी, बालेवाडी, बाणेर रोड, पुणे ४११०४५ या पत्त्यावर पाठविण्याची शेवटची तारीख २८ सप्टेंबर.

सिक्युरिटी अ‍ॅण्ड एक्स्जेंज बोर्ड ऑफ इंडिया, सेबीमध्ये मुंबई येथे संगणक अधिकारी म्हणून संधी-

अधिक माहिती व तपशिलासाठी एम्प्लॉयमेंट न्यूजच्या ९ ते १५ सप्टेंबर २०१७ च्या अंकात प्रकाशित झालेली सिक्युरिटी अ‍ॅण्ड एक्स्जेंज बोर्ड ऑफ इंडिया जाहिरात पहावी अथवा सेबीच्या  http://www.sebi.gov.in/ या संकेतस्थळाला भेट द्यावी. संगणकीय पद्धतीने वरील संकेतस्थळावर अर्ज करण्याची शेवटची तारीख २९ सप्टेंबर.

सीप्झ, मुंबई येथे असिस्टंट डेव्हलपमेंट कमिशनरच्या ३ जागा-

अधिक माहिती व तपशिलासाठी एम्प्लॉयमेंट न्यूजच्या १२ ते १८ ऑगस्ट  २०१७ च्या अंकात प्रकाशित झालेली उद्योग व वाणिज्य मंत्रालयाची जाहिरात पहावी अथवा मंत्रालयाच्या www.seepz.gov.in या संकेतस्थळाला भेट द्यावी. पात्रताधारक उमेदवारांनी संपूर्णपणे भरलेले अर्ज डेप्युटी डेव्हलपमेंट कमिशनर, ऑफिस ऑफ दि. डेव्हलपमेंट कमीशनर सीप्झ, स्पेशल इकॉनॉमिक झोन, अंधेरी (पूर्व), मुंबई- ४०००९६ या पत्त्यावर पाठविण्याची शेवटची तारीख ३० सप्टेंबर २०१७.

सेंट्रल बिल्डिंग रिसर्च इन्स्टिटय़ूट, रुरकी येथे संशोधकांच्या १७ जागा-

अर्जदार सिव्हिल इंजिनीअरिंगमधील एमई/ एमटेक पात्रताधारक अथवा पीएचडी असावेत व त्यांचा शैक्षणिक आलेख चांगला असायला हवा. वयोगट ३२ ते ३७ वर्षे. अधिक माहिती व तपशिलासाठी एम्प्लॉयमेंट न्यूजच्या ९ ते १५ सप्टेंबर २०१७ च्या अंकात प्रकाशित झालेली सेंट्रल बिल्डिंग रिसर्च इन्स्टिटय़ूट, रुडकीची जाहिरात पहावी अथवा इन्स्टिटय़ूटच्या http://cbri.res.in/ या संकेतस्थळाला भेट द्यावी. संपूर्णपणे भरलेले अर्ज अ‍ॅडमिनिस्ट्रेशन ऑफिसर, सेंट्रल बिल्डिंग, रिसर्च इन्स्टिटय़ूट, रुडकी २४७६६७ या पत्त्यावर पाठविण्याची शेवटची तारीख ३ ऑक्टोबर २०१७.

नॅशनल टेक्स्टाईल कॉर्पोरेशन लिमिटेडमध्ये मॅनेजमेंट ट्रेनीच्या ३० जागा-

अर्जदार टेक्स्टाईल टेक्नॉलॉजीमधील पदवीधर असावेत व त्यांचा शैक्षणिक आलेख चांगला असायला हवा. अधिक माहिती व तपशिलासाठी एम्प्लॉयमेंट न्यूजच्या ९ ते १५ ऑगस्ट  २०१७ च्या अंकात प्रकाशित झालेली नॅशनल टेक्स्टाईल कॉर्पोरेशनची जाहिरात पहावी अथवा एनटीसीच्या www.ntcltd.org या संकेतस्थळाला भेट द्यावी. संपूर्णपणे भरलेले अर्ज नॅशनल टेक्स्टाईल कॉर्पोरेशन लि., कोर-४, स्कोप कॉम्प्लेक्स, ७, लोधी रोड, नवी दिल्ली- ११०००३ या पत्त्यावर पाठविण्याची शेवटची तारीख ३० सप्टेंबर.

नॅशनल हाय-वे इन्फ्रास्ट्रक्चर डेव्हलपमेंट कॉर्पोरेशनमध्ये कार्यालयीन सहाय्यकांच्या ७ जागा-

अधिक माहिती व तपशिलासाठी एम्प्लॉयमेंट न्यूजच्या ९ ते १५ सप्टेंबर २०१७ च्या अंकात प्रकाशित झालेली नॅशनल हाय-वे इन्फ्रास्ट्रक्चर डेव्हलपमेंट कॉर्पोरेशनची जाहिरात पहावी अथवा कॉर्पोरेशनच्या http://nhidcl.com/ या संकेतस्थळाला भेट द्यावी. संगणकीय पद्धतीने वरील संकेतस्थळावर अर्ज करण्याची शेवटची तारीख ३ ऑक्टोबर.

मुंबई पोर्ट रेल कॉर्पोरेशन अंतर्गत मुंबई येथे प्रोजेक्ट साइट इंजिनीअर्स सिव्हिलच्या ३ जागा-

अधिक माहिती व तपशीलासाठी प्रमुख वृत्तपत्रात प्रकाशित झालेली मुंबई पोर्ट रेल कॉर्पोरेशनची जाहिरात पहावी अथवा कॉर्पोरेशनच्या www.ipa.nic.in या संकेतस्थळाला भेट द्यावी. तपशीलवार अर्ज मुंबई पोर्ट रेल कॉर्पोरेशन लिमिटेड, ४ था मजला, नरिमन भवन, मुंबई पोर्ट ट्रस्ट बिल्डिंग, एमपी रोड, माझगाव (पूर्व), मुंबई- ४०००१० या पत्त्यावर पाठविण्याची शेवटची तारीख ३० सप्टेंबर २०१७.