रेल्वे प्रोटेक्शन फोर्स (रेल्वे मंत्रालय, भारत सरकार), रेल्वे प्रोटेक्शन फोर्स (आरपीएफ) आणि रेल्वे प्रोटेक्शन स्पेशल फोर्स (आरपीएसएफ) मध्ये एकूण १९,९५२ ‘कॉन्स्टेबल’ पदांची भरती करणार आहे.

(भरती सूचना ०१/२०१७) (अजा – ३,३,१७, अज – ३,३,६३, इमाव – ४,३७१, खुला – ८,९०१) (१० % जागा माजी सनिकांसाठी राखीव) (१० % जागा महिला उमेदवारांमधून भरणार.)

पात्रता – १०वी उत्तीर्ण अथवा समकक्ष,

वयोमर्यादा – दि. १ जुलै २०१७ रोजी १८ ते २५ वर्षे. (उमेदवाराचा जन्म दि. १ जुलै १९९२ ते १ जुलै १९९९ दरम्यानचा असावा.) (कमाल वयोमर्यादेत सूट. इमाव – ३ वर्षे, अजा/अज –  ५वर्षे, माजी सैनिक – डिफेन्समधील सेवाकाल ३ वर्षे)

शारीरिक मापदंड – पुरुष – उंची – १६५ सेंमी., छाती – ८० ते ८५ सेंमी. (अजा/अज – उंची १६० सेंमी., छाती – ७६.२ ते ८१.२ सेंमी.). महिला – उंची १५७ सेंमी. (अजा/अज – १५२ सेंमी.)

निवड पद्धती – लेखी परीक्षा, शारीरिक क्षमता चाचणी, शारीरिक मोजमाप, मुलाखत, बोनस गुण यातील कामगिरीवर आधारित. अंतिम निवड कागदपत्र पडताळणीनंतर केली जाईल.

(अ) लेखी परीक्षा – १२० प्रश्न/बहुपर्यायी वस्तुनिष्ठ स्वरूपाचे. कालावधी – ९० मिनिटे.

सामान्य बुद्धिमत्ता – ३५ प्रश्न.

अंकगणित – ३५ प्रश्न आणि

सामान्य ज्ञान (जाणीव) – ५० प्रश्न.

एकुण प्रश्न १२० एकूण गुण १२०. प्रत्येक चुकीच्या उत्तराला ०.२५ गुण वजा केले जातील. न सोडविलेल्या प्रश्नांना कोणतेही गुण दिले अथवा वजा केले जाणार नाहीत. लेखी परीक्षेसाठी पोस्टाने कॉल लेटर पाठविले जाईल. दक्षिण रेल्वे चेन्नईअंतर्गत येणाऱ्या उमेदवारांसाठी (महाराष्ट्रातील उमेदवार दक्षिण रेल्वेअंतर्गत मोडतात.) प्रश्नपत्रिका मराठी, हिंदी, इंग्रजी, तामिळ, तेलगू, कन्नड, कोंकणी, उर्दू, मल्याळम् इ. पैकी एका भाषेत छापलेले असतील. उमेदवारांनी आपल्याला हवी असलेली भाषा अर्ज भरताना निवडणे आवश्यक.

(ब) शारीरिक क्षमता चाचणी (पीईटी) आणि शारीरिक मोजमाप. पीईटीमध्ये पुरुषांसाठी

(१) १,६०० मीटर ५ मिनिटे ४५ सेकंदांत धावणे.

(२) उंची उडी – ३ फूट ९ इंच, लांब उडी – १४ फूट आणि महिलांसाठी – ८०० मीटर ३ मिनिटे ४० सेकंदांत धावणे. उंच उडी – ३ फूट, लांब उडी – ९ फूट यांचा समावेश असेल. प्रत्येक कॅटॅगरीसाठी असलेल्या रिक्त पदांच्या ३ पट उमेदवारांना पीईटी/शारीरिक मोजमापासाठी बोलाविले जाईल. प्रथम १,६०० मीटर/ ८०० मीटर टेस्ट सुरूवातीला घेतली जाईल. त्यात उत्तीर्ण झालेल्यांच्या इतर टेस्ट होतील. उमेदवारांना पीईटीचे ठिकाण, वेळ इ. कळविण्यात येईल. माजी सनिकांसाठी पीईटी नाही. पीईटी/शारीरिक मोजमापात उत्तीर्ण उमेदवारांना मुलाखत आणि कागदपत्र तपासणीसाठी बोलाविले जाईल. तेव्हा सर्व मूळ कागदपत्र (शैक्षणिक पात्रता, वय, जातीचा दाखला, इमाव उमेदसारांनी अ‍ॅनेक्स्चर-डी दाखला, डोमिसाइल, एनसीसी प्रमाणपत्र, खेळांच्या स्पर्धेतील प्रमाणपत्रे इ.) घेऊन हजर व्हावे.

(क) मुलाखती मध्ये उमेदवारांची सामान्य बुद्धिमत्ता, सामान्य जागरुकता, सावधानता, व्यक्तिमत्त्व आणि रेल्वे प्रोटेक्शन फोर्समधील भरतीसाठी अनुकूलता तपासली जाईल.

बोनस गुण –

(१) एनसीसी ‘बी’ प्रमाणपत्र – १ गुण. ‘सी’ प्रमाणपत्र – २ गुण.

(२) खेळ स्पर्धा – सहभाग

आंतरविद्यापीठ स्तर १ गुण,

आंतरराज्य स्तर – २  गुण,

आंतरराष्ट्रीय स्तर – ३ गुण आणि राष्ट्रीय स्पर्धेत मेडलसाठी – ३ गुण.

(३) पुरुष – उंची – १७८ सेंमी. किंवा त्यापेक्षा जास्त आणि महिला – उंची – १६५ सेंमी. किंवा त्यापेक्षा जास्त असल्यास – ३ गुण. सर्व मिळून जास्तीत जास्त एकूण ५ बोनस गुण दिले जातील.

वैद्यकिय तपासणी – अंतिम निवडीपूर्वी उमेदवारांना वैद्यकीय तपासणीला सामोरे जावे लागेल.

ट्रेनिंग – उमेदवारांना आरपीएफ किंवा आरपीएसएफ ट्रेनिंग सेंटरमध्ये कठोर प्रशिक्षण घ्यावे लागेल. प्रशिक्षणादरम्यान स्टायपेंड दिले जाईल. प्रशिक्षणाच्या शेवट अंतिम परीक्षेत उत्तीर्ण होणे आवश्यक.

परीक्षा शुल्क – रु. ४०/- (क्रॉस्ड इंडियन पोस्टल ऑर्डर किंवा क्रॉस्ड बँक ड्राफ्ट द्वारा  ैThe Financial Advisor and Chief Accounts Officer Southern Railway’ येथे पेयेबल) (महिला/अजा/अज/अल्पसंख्याक/ईबीसी (कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न रु. ५०,०००/- पेक्षा कमी असावे)/माजी सैनिक यांना फी माफ.) विहित नमुन्यातील अर्ज http://www.indianrailways.gov.in या संकेतस्थळावरून ए-४ आकाराच्या पेपरवर डाऊनलोड केलेले किंवा एम्प्लॉयमेंट न्यूजच्या दि.

९ सप्टेंबर २०१७च्या अंकातील) स्वहस्ताक्षरात हिंदी किंवा इंग्रजी भाषेत भरलेले (ज्यावर पुरुष उमेदवारांनी निशाणी डावा अंगठा आणि महिलांनी निशाणी उजवा अंगठा लावावा. (खाडाखोड केलेले अर्ज बाद ठरविले जातील.) अर्जावर ३.५ सेंमी. ७ ४.५ सेंमी. आकाराचा रंगीत फोटो चिकटवावा आणि एक फोटो ज्यांच्या मागे उमेदवाराचे नाव लिहिलेला जोडावा.) पूर्ण भरलेले अर्ज आवश्यक त्या प्रमाणपत्रांच्या प्रतींसह (स्वयंसाक्षांकित)The Chief Security Commissioner, Southern Railway, Post Box No. 545, Park Town Head Post Office, Park Town, Chennai – 600 003’’ या पत्त्यावर दि. १४ ऑक्टोबर २०१७ पर्यंत पोहोचतील असे पोस्टाने पाठवावेत.

अर्जाच्या लिफाफ्यावर Application for the Post of Constable in RPF including RPSF असे ठळक अक्षरात लिहावे.  स्वत:चा पत्ता लिहिलेले दोन लिफाफे (२८ सेंमी. ७ १२ सेंमी.) ज्यावर प्रत्येकी रु. ५/- चे पोस्टल स्टॅम्प चिकटविलेले असावेत. (अर्जासोबत जोडावेत.)