*  ठाणे महापालिकेच्या आरोग्य विभागात दिव्यांग उमेदवारांसाठी फिल्डवर्करच्या ५ जागा-

अधिक माहिती व तपशिलासाठी प्रमुख वृत्तपत्रात प्रकाशित झालेली ठाणे महापालिकेची जाहिरात पाहावी. http://www.thanecity.gov.in या संकेतस्थळाला भेट द्यावी अथवा ठाणे महापालिकेची recruitment@thanecity.gov.in या ई-मेलवर संपर्क साधावा. तपशीलवार अर्ज वरील ई-मेलवर पाठविण्याची शेवटची तारीख ५ ऑक्टोबर.

Nashik, Teams inspection, auction,
नाशिक : खासगी जागेवर कृषिमाल लिलावामुळे तपासणीसाठी पथके नियुक्त
flamingo, Solar lights, Navi Mumbai ,
फ्लेमिंगो क्षेत्रात सौरदिवे! पर्यावरणवाद्यांच्या तक्रारींनंतर नवी मुंबई महापालिकेची धावाधाव
navi mumbai, cctv camera, navi mumbai cctv camera
निम्म्या नवी मुंबई शहरावर सीसीटीव्हिंची नजर नाहीच
question mark on quality of work done by municipality synthetic track was laid in five days
पिंपरी : पालिकेच्या कामाच्या दर्जाविषयी प्रश्नचिन्ह, पाच दिवसांत उखडला सिंथेटिक ट्रॅक

*  भारत पेट्रोलियम कॉर्पोरेशनमध्ये प्रशिक्षणार्थी इंजिनीअर्ससाठी संधी-

अर्जदार मेकॅनिकल इंजिनीअरिंगमधील पदवीधर असावेत. त्यांचा शैक्षणिक आलेख चांगला असावा व ते जीएटीई २०१८ प्रवेश पात्रताधारक असावेत. अधिक माहिती व तपशिलासाठी प्रमुख वृत्तपत्रात प्रकाशित झालेली भारत पेट्रोलियम कॉर्पोरेशनची जाहिरात पाहावी अथवा बीपीसीएलच्या http://bharatpetroleum.com या संकेतस्थळाला भेट द्यावी. संगणकीय पद्धतीने वरील संकेतस्थळावर अर्ज करण्याची शेवटची तारीख ५ ऑक्टोबर २०१७.

*  एनटीपीसी लिमिटेडमध्ये प्रशिक्षणार्थी इंजिनीअर्ससाठी संधी-

उमेदवारांनी इलेक्ट्रिकल, मेकॅनिकल, इंस्ट्रमेंटेशन, इलेक्ट्रॉनिक्स वा मायनिंग इंजिनीअरिंगमधील पदवीधर असावेत. त्यांचा शैक्षणिक आलेख चांगला असावा व त्यांनी जीएटीई २०१८ ही प्रवेश पात्रता परीक्षा दिलेली असावी. अधिक माहिती व तपशिलासाठी प्रमुख वृत्तपत्रात प्रकाशित झालेली एनटीपीसीची जाहिरात पाहावी अथवा एनटीपीसीच्या http://www.ntpccareers.net/ अथवा  http://gate.iitg.ac.in/ या संकेतस्थळाला भेट द्यावी. संगणकीय पद्धतीने वरील संकेतस्थळावर अर्ज करण्याची शेवटची तारीख ५ ऑक्टोबर २०१७.

*  ऑल इंडिया इन्स्टिटय़ूट ऑफ फिजिकल मेडिसीन अ‍ॅण्ड रिहॅबिलिटेशन, मुंबई येथे असिस्टंट ब्रास मेकर म्हणून संधी-

अर्जदार विज्ञान विषयांसह बारावी उत्तीर्ण व प्रोस्टोट्रिक आणि ऑर्थोटिक विषयातील पात्रताधारक असावेत व त्यांना संबंधित कामाचा २ वर्षांचा अनुभव असायला हवा. अर्जाचा नमुना व तपशिलासाठी एम्प्लॉयमेंट न्यूजच्या ९ ते १५ सप्टेंबर २०१७ च्या अंकातील केंद्रीय सेवायोजन विभागाची जाहिरात पाहावी. विहित नमुन्यातील संपूर्णपणे भरलेले अर्ज डायरेक्टर, ऑल इंडिया इन्स्टिटय़ूट ऑफ फिजिक्स मेडिसीन अ‍ॅण्ड रिहॅबिलिटेशन, हाजी अली, केशवराव खाडे मार्ग, महालक्ष्मी, मुंबई- ४०००३४ या पत्त्यावर पाठविण्याची शेवटची तारीख ६ ऑक्टोबर २०१७.

*  नॅशनल बोर्ड ऑफ एक्झामिनेशन्समध्ये कनिष्ठ साहाय्यकांच्या जागा-

अर्जदार कुठल्याही विषयातील पदवीधर असावेत. त्यांना संगणकाचे अद्ययावत ज्ञान असावे व ते इंग्रजी टंकलेखनातील ३० शब्द प्रतिमिनिट पात्रताधारक असायला हवेत. अनुभवी उमेदवारांना प्राधान्य.

वयोमर्यादा २७ वर्षे. अधिक माहिती व तपशिलासाठी एम्प्लॉयमेंट न्यूजच्या ८ ते १४ जुलै २०१७ च्या अंकातील नॅशनल बोर्ड ऑफ एक्झामिनेशन्सची जाहिरात पाहावी अथवा बोर्डाच्या http://www.natboard.edu.in या संकेतस्थळाला भेट द्यावी. संपूर्णपणे भरलेले अर्ज पाठविण्याची शेवटची तारीख ६ ऑक्टोबर २०१७.

*  भारत इलेक्ट्रॉनिक्समध्ये सीनिअर इंजिनीअर्सच्या ८ जागा-

अर्जदार इलेक्ट्रॉनिक्स, मेकॅनिकल वा कॉम्प्युटर इंजिनीअरिंगमधील पदवीधर असावेत व त्यांना संबंधित कामाचा किमान चार वर्षांचा अनुभव असायला हवा. वयोमर्यादा ३२ वर्षे. अधिक माहितीसाठी भारत इलेक्ट्रॉनिक्सच्या http://www.bel-india.com या संकेतस्थळाला भेट द्यावी. संगणकीय पद्धतीने वरील संकेतस्थळावर अर्ज करण्याची शेवटची तारीख ७ ऑक्टोबर २०१७.

*  भारतीय सेवा पूर्व प्रशिक्षण केंद्र, अमरावती येथे केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या नागरी सेवा परीक्षा- २०१८ च्या पूर्व प्रशिक्षणासाठी ६० जागा-

अर्जदार कुठल्याही विषयातील पदवीधर असावेत व त्यांचे वय ३२ वर्षांहून अधिक नसावे. अधिक माहितीसाठी भारतीय सेवा पूर्व प्रशिक्षण केंद्र, अमरावतीच्या दूरध्वनी क्र. ०७२१- २१९०४४२ वर संपर्क साधावा अथवा प्रशिक्षण केंद्राच्या http://www.preiasamt.in या संकेतस्थळाला भेट द्यावी. संगणकीय पद्धतीने वरील संकेतस्थळावर अर्ज करण्याची शेवटची तारीख १० ऑक्टोबर २०१७.