नॅशनल इन्स्टिटय़ूट ऑफ ओपन स्कूलिंग, नोएडा येथे सेक्शन ऑफिसरच्या ७ जागा –

अधिक माहिती व तपशिलासाठी एम्प्लॉयमेंट न्यूजच्या २३ ते २९ सप्टेंबर २०१७ च्या अंकातील नॅशनल इन्स्टिटय़ूट ऑफ ओपन स्कूलिंग, नोएडाची जाहिरात पाहावी अथवा इन्स्टिटय़ूटच्या http://www.nios.ac.in/ या संकेतस्थळाला भेट द्यावी.

संपूर्णपणे भरलेले अर्ज सेक्रेटरी, नॅशनल इन्स्टिटय़ूट ऑफ ओपन स्कूलिंग, ए- २४/२५, इन्स्टिटय़ूशनल एरिया, सेक्टर ६२, नोएडा (उप्र)- २०१३०९ या पत्त्यावर पाठविण्याची शेवटची तारीख २० ऑक्टोबर २०१७.

नौदलाच्या शैक्षणिक व लॉजिस्टिक विभागातील संधी –

अर्जदारांनी विज्ञान वा गणित विषयांसह एमएस्सी, इंग्रजी, इतिहास या विषयातील एमए अथवा बीई/ बीटेक यासारखी पात्रता पूर्ण केलेली असावी व ते शारीरिकदृष्टय़ा सक्षम असावेत. वयोमर्यादा २४ वर्षे.

अधिक माहिती व तपशिलासाठी एम्प्लॉयमेंट न्यूजच्या ३० सप्टेंबर ते ४ ऑक्टोबर २०१७ च्या अंकात प्रकाशित झालेली नौदलाची जाहिरात पाहावी अथवा नौदलाच्या http://www.joinindiannavy. gov.in या संकेतस्थळाला भेट द्यावी. संगणकीय पद्धतीने वरील संकेतस्थळावर अर्ज करण्याची शेवटची तारीख २० ऑक्टोबर २०१७.

संरक्षण मंत्रालयांतर्गत आर्मी बेस वर्कशॉप, पुणे येथे चार्जमनच्या ४ जागा –

अर्जदार इंजिनीअरिंगमधील पदविकाधारक असावेत अथवा त्यांनी फोरमनशिप/ मेंटेनन्स विषयातील पात्रता पूर्ण केलेली असावी. वयोमर्यादा २५ वर्षे. अर्जाचा नमुना व तपशिलासाठी एम्प्लॉयमेंट न्यूजच्या ३० सप्टेंबर ते ६ ऑक्टोबर २०१७ च्या अंकात प्रकाशित झालेली केंद्रीय सेवा योजन विभागाची जाहिरात पाहावी.

विहित नमुन्यातील संपूर्णपणे भरलेले अर्ज सुपरिटेंडिंग इंजिनीअर (एसजी), मिनिस्ट्री ऑफ डिफेन्स, डायरेक्टोरेट जनरल ऑफ ईएमई, मास्टर जनरल ऑफ ऑर्ड ब्रँच, इंटिग्रेटेड एचक्यू ऑफ आर्मी, डीएचक्यू, पीओ नवी दिल्ली- ११०००५ या पत्त्यावर पाठविण्याची शेवटची तारीख २१ ऑक्टोबर २०१७.

महाराष्ट्र लोकसेवा आयोगांतर्गत साहाय्यक संचालक, तंत्रशिक्षण/ उपसचिव महाराष्ट्र राज्य तंत्रशिक्षण मंडळ, महाराष्ट्र अभियांत्रिकी प्रशासकीय सेवा विभागात १० जागा –

अधिक माहिती व तपशिलासाठी प्रमुख वृत्तपत्रांत प्रकाशित झालेली महाराष्ट्र लोकसेवा आयोगाची जाहिरात पाहावी अथवा आयोगाच्या दूरध्वनी क्र. ०२२-२२७९५९०० अथवा २२६७०२१० वर संपर्क साधावा अथवा आयोगाच्या http://www.upsc.gov.in या संकेतस्थळाला भेट द्यावी. संगणकीय पद्धतीने वरील संकेतस्थळावर अर्ज करण्याची शेवटची तारीख २३ ऑक्टोबर २०१७.

सातारा जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेत चार्टर्ड अकाऊंटंट म्हणून संधी –

अर्जदार चार्टर्ड अकाऊंटंसीची पात्रताधारक असावेत व त्यांना संबंधित कामाचा २ ते ४ वर्षांचा अनुभव असायला हवा. एमबीए पात्रता व संगणकाचे ज्ञान असणाऱ्यांना प्राधान्य. वयोमर्यादा ४५ वर्षे. अधिक माहिती व तपशिलासाठी प्रमुख वृत्तपत्रात प्रकाशित झालेली सातारा जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेची जाहिरात पाहावी.

तपशीलवार भरलेले व आवश्यक त्या कागदपत्रांसह असणारे अर्ज मुख्याधिकारी, सातारा जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक, किसान भवन, जिल्हा परिषद, सदर बाजार, सातारा- ४१५००१ या पत्त्यावर पाठविण्या शेवटची तारीख १९ ऑक्टोबर २०१७.

केंद्र सरकारच्या कृषी, सहकार व किसान कल्याण मंत्रालयांतर्गत मुंबईसह विविध ठिकाणी स्टेनोग्राफर्सच्या ५ जागा –

अर्जाचा नमुना व तपशिलासाठी एम्प्लॉयमेंट न्यूजच्या २६ ऑगस्ट ते १ सप्टेंबर २०१७ च्या अंकातील कृषी, सहकार व किसान कल्याण विभागाची जाहिरात पाहावी अथवा विभागाच्या http://dmi.gov.in/ या संकेतस्थळाला भेट द्यावी. विहित नमुन्यातील संपूर्णपणे भरलेले अर्ज डायरेक्टर (अ‍ॅडमिन), मिनिस्ट्री ऑफ अ‍ॅग्रीकल्चरल अ‍ॅण्ड फार्मर्स वेल्फेअर, डायरेक्टोरेट ऑफ मार्केटिंग अ‍ॅण्ड इन्स्पेक्शन, ब्लॉक ए, सीजीओ कॉम्प्लेक्स, फरिदाबाद- १२१००१ या पत्त्यावर पाठविण्याची शेवटची तारीख २४ ऑक्टोबर २०१७.