*   भारतीय तटरक्षक दलात नाविक डोमेस्टिक ब्रँचमध्ये ‘कुक’ आणि ‘स्टुअर्ड’ पदांची भरती.

पात्रता – १० वी किमान ५०% गुणांसह उत्तीर्ण. (अजा/ अज/ राष्ट्रीय पातळीवरील खेळाडू यांना गुणांची अट ४५%)

वयोमर्यादा – १८ ते २२ वर्षे

(उमेदवाराचा जन्म १ एप्रिल १९९६ ते ३१ मार्च २००० दरम्यानचा असावा.)

(इमाव – २५ वर्षे, अजा/ अज – २७ वर्षेपर्यंत)

कामाचे स्वरूप –

कुक – मेन्यूनुसार (शाकाहारी व मांसाहारी)

अन्न तयार करणे, रेशनचे अकाऊंटिंग करणे आणि इतर कामे.  स्टुअर्ड – वेटर्स, हाऊसकीपिंग, निधीचे अकाऊंटिंग, वाइन आणि स्टोअर्स, मेन्यू तयार करणे इ. अधिकाऱ्यांच्या मेसमध्ये अन्नाची वाढणी करणे इ. गोवा, महाराष्ट्रातील उमेदवारांनी भारतीय तटरक्षक दलाच्या (पश्चिम) प्रदेश आणि मुंबई परीक्षा केंद्रासाठी ऑनलाइन अर्ज १६ ते २३ ऑक्टोबर, २०१७ पर्यंत (सायं. ५.०० पर्यंत) http://www.joinindiancoastguard.gov.in  या संकेतस्थळावर करावेत.

*   विक्रम साराभाई स्पेस सेंटर (डिपार्टमेंट ऑफ स्पेस, भारत सरकार) तिरुअनंतपुरम येथे पुढील पदांची भरती.

(जाहिरात क्र. ३०२)

रेडिओग्राफर – ए – (१ पद इमावसाठी).

पात्रता – रेडिओग्राफीमधील पदविका.

टेक्निशियन – बी

(१) इलेक्ट्रॉनिक्स मेकॅनिक – ११ पदे

(यूआर – ६, इमाव – ३, अजा – १,

अज – १, एचएच – १),

(२) फिटर – ५ पदे

(यूआर – २, इमाव – २, अजा – १),

(३) केमिकल ऑपरेटर (मेंटेनन्स मेकॅनिक) – ३ पदे (यूआर),

(४) केमिकल ऑपरेटर – २ पदे (यूआर),

(५) इलेक्ट्रिशियन – १ पद,

(६) टर्नर – १ पद.

पात्रता – १० वी, संबंधित ट्रेडमधील आयटीआय/ एनसीटी/ एनएसी उत्तीर्ण.

लेखी परीक्षा दि. १२ नोव्हेंबर २०१७ रोजी तिरुअनंतपुरम येथे होईल.

(जाहिरात क्र. ३०१)

टेक्निकल असिस्टंट –

(१) इलेक्ट्रॉनिक्स – १२ पदे (यूआर – ७, इमाव – ४, अजा – १, एचएच – १),

(२) मेकॅनिकल – ११ पदे

(यूआर – ७, इमाव – ३, अजा – १),

(३) केमिकल – २ पदे (यूआर – १, इमाव – १),

(४) सिव्हिल – १ पद (यूआर),

(५) कॉम्प्युटर सायन्स – १ पद (यूआर),

(६) इन्स्ट्रमेंटेशन – १ पद (यूआर).

पात्रता – संबंधित विषयातील अभियांत्रिकी पदविका प्रथम वर्गात उत्तीर्ण.

सायंटिफिक असिस्टंट केमिस्ट्री – ४ पदे

(यूआर – ३, इमाव – १).

पात्रता – बी.एस्सी. (केमिस्ट्री) प्रथम वर्गात उत्तीर्ण.

ज्युनियर हिंदी ट्रान्सलेटर – १ पद (यूआर).

पात्रता – हिंदी/ इंग्रजी विषयातील पदव्युत्तर पदवी इंग्रजी/ हिंदी विषयासह किंवा हिंदी/ इंग्रजी माध्यमातून इ.

(जाहिरात क्र. ३००) –

सायंटिस्ट/ इंजिनीअर – एससी

(१) एम.एस्सी. केमिस्ट्री/ अप्लाइड केमिस्ट्री – किमान ६५% गुण (६ पदे).

(२) बी.ई. केमिकल इंजिनीअर ६५% गुण

(९ पदे).

(३) एम.ई. (इंडस्ट्रियल सेफ्टी/ मेटॅलर्जकिल/ मायक्रो इलेक्ट्रॉनिक्स/ प्रोडक्शन/ सरफेस इंजिनीअर/ केमिकल इंजिनीअर (१० पदे)).

वयोमर्यादा – दि. २३ ऑक्टोबर २०१७ रोजी १८ ते ३५ वर्षे (इमाव – ३८ वर्षे, अजा – ४० वर्षे).

ऑनलाइन अर्ज http://www.vssc.gov.in या संकेतस्थळावर दि. २३ ऑक्टोबर २०१७ पर्यंत करावेत.