भारत इलेक्ट्रॉनिक्स लिमिटेड एक्सपोर्ट मॅन्युफॅक्चिरग एसबीयू – बंगलोर, कॉम्प्लेक्स येथे ‘डेप्युटी इंजिनीअर’च्या १९२ पदांवर २ वर्षांच्या कालावधीसाठी कंत्राटी पद्धतीने भरती.

(१) इलेक्ट्रॉनिक्स – १८४ पदे, (२) मेकॅनिकल – एकूण ८ पदे. एकूण १९२ पदे – (६ जागा विकलांगांसाठी राखीव).

पात्रता – संबंधित विषयातील इंजिनीअरिंग पदवी प्रथम वर्गात उत्तीर्ण. (अजा/अज/विकलांग यांना गुणांची अट नाही.) १ वर्षांचा कामाचा अनुभव (इंडस्ट्रीमधील प्रोडक्शन/टेिस्टग/क्वालिटी अ‍ॅश्युरन्स).

वयोमर्यादा – दि. १ ऑक्टोबर, २०१७ रोजी २६ वर्षांपर्यंत (इमाव – २९ वर्षे, अजा/अज – ३१ वर्षेपर्यंत).

अर्जाचे शुल्क – रु. ५००/-  (अजा/अज/विकलांग यांना फी माफ).

निवड पद्धती – लेखी परीक्षा दि. २६ नोव्हेंबर, २०१७ रोजी होणार आहे. वस्तुनिष्ठ बहुपर्यायी स्वरूपाची बेसिक इंजिनीअरिंग आणि जनरल अ‍ॅप्टिट्यूड या विषयांवर आधारित मुलाखत.

परीक्षा केंद्र – मुंबई, बंगलोर, दिल्ली इ. वेतन – रु. ७.७ लाख प्रति वर्ष (सीटीसी).

ऑनलाइन अर्ज  www.bel-india.com    या संकेतस्थळावर दि. २५ ऑक्टोबर, २०१७ पर्यंत करावेत.

 सहाय्यक प्राध्यापक पदासाठी राज्यस्तरीय पात्रता परीक्षा (सेट)

सावित्रीबाई फुले, पुणे विद्यापीठ ३४ वी सेट परीक्षा दि. २८ जानेवारी,  २०१८ रोजी आयोजित करणार आहे. पात्रता – पदव्युत्तर पदवी किमान ५५% गुणांसह उत्तीर्ण. (अजा/अज/इमाव/ विकलांग यांना गुणांची अट ५०%). उमेदवार पदव्युत्तर पदवी ज्या विषयात घेतली आहे त्या विषयासाठीच सेट परीक्षा देवू शकतात.

पदव्युत्तर पदवीच्या अंतिम वर्षांचे उमेदवार परीक्षेस पात्र आहेत. सेट परीक्षा एकूण ३२ विषयांसाठी देता येते. (आर्ट्स, सायन्स, सोशल सायन्सेस, कॉमर्स, लॉ, मॅनेजमेंट, एज्युकेशन आणि फिजिकल एज्युकेशन इ.)

अर्जाचे शुल्क – रु.५५०/- (मागासवर्गीयांसाठी रु. ४५०/-).

ऑनलाईन अर्ज  http://setexam.unipune.ac.in/   या संकेतस्थळावर दि. २६ ऑक्टोबर, २०१७ पर्यंत करावेत.