३९, फील्ड  अ‍ॅम्युनिशन डेपो- ९०० ३०९ भरतपूर, राजस्थान येथे ‘ट्रेड्समन मेट’ आणि फायरमन पदांची भरती. रिक्त पदे – 

(१) ट्रेड्समन मेट एकूण ३१९(अजा- ५४, अज – ४३, इमाव -६३, यूआर – १५८) (राखीव पदे – विकलांग – ८, माजी सनिक – २९, खेळाडू -१६).

पात्रता – १०वी उत्तीर्ण. उमेदवार अ‍ॅम्युनिशन बॉक्सेस वाहून नेण्यासाठी बळकट असावा. हिंदी भाषा अवगत असावी.

वयोमर्यादा – १८ ते २८ वर्षे(इमाव – २८ वष्रे, अजा/अज -३० वष्रे, विकलांग – ३५/३८/४० वष्रे). शारीरिक क्षमता चाचणी – १.५ कि.मी. ६ मिनिटांत धावणे. ५० किलो वजन उचलून २०० मीटर अंतर १०० सेकंदांत पार करणे.

(२) फायरमन – ४ पदे (अजा – २, यूआर – २).

पात्रता – १०वी उत्तीर्ण. उंची – १६५ सें.मी. छाती – ८१.५ – ८५ सें.मी., वजन -५० किलो.

शारीरिक क्षमता चाचणी –  ६३.५ किलो वजनाचा माणूस उचलून १८३ मीटरचे अंतर ९६ सेकंदांत पार करणे.  २.७मीटर लांबीचे खंदक लांब उडी मारून दोन्ही पायांवर उतरणे. ३ मीटर उंचीच्या दोरावर चढणे (हात व पाय यांचा वापर करून). १.६ कि.मी. ६ मिनिटांत धावणे.

निवड पद्धती – लेखी परीक्षा १५० गुणांसाठी वेळ दोन तास (सामान्य बुद्धिमत्ता २५ गुण, न्युमरिकल अ‍ॅप्टिटय़ूड – २५ गुण, सामान्य इंग्लिश – ५० गुण, सामान्य ज्ञान – ५० गुण)  शारीरिक क्षमता चाचणी. विस्तृत जाहिरात एम्प्लॉयमेंट न्यूजच्या दि. २९ जुल २०१७ च्या अंकात पान क्र. ३७, ३८ वर पाहावी.

जाहिरातीत दिलेल्या विहित नमुन्यातील पूर्ण भरलेले अर्ज (पुढील प्रमाणपत्रांच्या साक्षांकित प्रतींसह – शैक्षणिक अर्हता प्रमाणपत्र,  जन्मतारखेचा दाखला,  जातीचा दाखला,  डिस्चार्ज सर्टििफकेट (माजी सनिकांसाठी) आणि  स्वत:चा पत्ता लिहिलेला लिफाफा ज्यावर रु. २५/-चे पोस्टाचे स्टँप लावलेले असावेत.) ‘३९, फील्ड  अ‍ॅम्युनिशन डेपो – ९०० ३०९, उ/  ५६ एपीओ’ या पत्त्यावर दि. १९ ऑगस्ट २०१७पर्यंत साध्या/रजिस्टर्ड किंवा स्पीड पोस्टाने पाठवावेत.

 

इंडो तिबेटन बॉर्डर पोलीस फोर्स (भारत सरकार, गृह मंत्रालय) मध्ये ‘कॉन्स्टेबल (ट्रेड्समन’ च्या २०३ पदांची भरती.

ल्ल कॉन्स्टेबल (टेलर) – पुरुष – १६ पदे, महिला – ३ पदे.  ल्ल गार्डनर (माळी) – ३८ पदे (पुरुष – ३२ पदे, महिला – ६ पदे).  ल्ल कॉब्लर – २७ पदे (पुरुष – २३ पदे, महिला – ४ पदे). ल्ल वॉटर कॅरिअर – ९५ पदे (पुरुष – ८१ पदे, महिला – १४ पदे). ल्ल सफाई कर्मचारी – ३३ पदे (पुरुष – २८ पदे, महिला – ५ पदे). ल्ल कुक – ५५ पदे (पुरुष – ४७  पदे, महिला – ८ पदे). ल्ल वॉशरमन – २५ पदे (पुरुष – २१ पदे, महिला – ४ पदे). ल्ल बार्बर – ११ पदे (पुरुष – ९ पदे, महिला – २ पदे).

पात्रता – कॉन्स्टेबल (टेलर/गार्डनर/कॉब्लर) साठी १० वी उत्तीर्ण २ वर्षांचा अनुभव किंवा आयटीआय  (१ वर्षांचा कोर्स)१ वर्षांचा अनुभव किंवा संबंधित ट्रेडमधील आयटीआयचा दोन वर्षे कालावधीचा कोर्स उत्तीर्ण. वयोमर्यादा – १८ ते २३ वष्रे.

इतर पदांसाठी पात्रता – १०वी उत्तीर्ण.

वयोमर्यादा – १८ ते २५ वर्षे . मागासवर्गीय उमेदवारांना कमाल वयोमर्यादेत सूट दिली जाते. विस्तृत जाहिरात एम्प्लॉयमेंट न्यूजच्या दि. २९ जुल २०१७ च्या अंकात पाहावी.

निवड पद्धती –  बायोमेट्रिक कॅप्चर पद्धतीने नोंद,  शारीरिक मापदंड (हाइट बार टेस्ट),  शारीरिक क्षमता चाचणी.

(अ) पुरुष – १.६ कि.मी. ७ मि. ३० सेकंदांत धावणे. (ब) महिला ८०० मीटर ४.४५ मिनिटांत धावणे.

लांब उडी – पुरुष – ११ फूट, महिला – ९ फूट,

उंच उडी – पुरुष – ३ १/२ फूट, महिला -३ फूट.

५० गुणांची ट्रेड टेस्ट. लेखी परीक्षा (ओएमआर बेस्ड) ५० गुणांसाठी (सामान्य ज्ञान १५ गुण, प्राथमिक गणित – १० गुण,  अ‍ॅनालिटिकल अ‍ॅप्टिटय़ूड – १५ गुण आणि हिंदी/इंग्रजी भाषा – १० गुण). वेळ – १ तास.

ऑनलाइन अर्ज http://www.recruitment.itbpolice.nic.in  या संकेतस्थळावर दि. ८ ऑगस्ट २०१७ ते दि. ७ सप्टेंबर २०१७ पर्यंत करावेत.