*   इन्स्टिटय़ूट ऑफ बँकिंग पर्सोनेल सिलेक्शन (आयबीपीएस) अंतर्गत येणाऱ्या सहयोगी २० शेडय़ूल्ड बँकांमध्ये ‘प्रोबेशनरी ऑफिसर/मॅनेजमेंट ट्रेनी’ पदांच्या भरतीसाठी ऑनलाइन परीक्षा (पूर्व आणि मुख्य) (सीडब्ल्यूई – पीओ/ एमटी – ७ – २०१८-१९ च्या भरतीसाठी.)

पूर्व परीक्षा – ७/८/१०/१५ ऑक्टोबर २०१७.

मुख्य परीक्षा – २६ नोव्हेंबर २०१७.

मुलाखत – जानेवारी/फेब्रुवारी, २०१७.

प्रि-एक्झामिनेशन ट्रेनिंग अजा/अज/अल्पसंख्यांकमधील ठरावीक उमेदवारांना दि. २३ ते २९ सप्टेंबर, २०१७ दरम्यान मुंबई, पुणे, नागपूर, गोवा इ. केंद्रांवर देण्यात येईल. तसे उमेदवारांनी ऑनलाइन अर्ज भरताना नमूद करावे.

पात्रता – पदवी उत्तीर्ण.

वयोमर्यादा – दि. १ ऑगस्ट, २०१७ रोजी २१ ते ३० वर्षे. ऑनलाइन अर्ज http://www.ibps.in  या संकेतस्थळावर दि. ५ सप्टेंबर २०१७ पर्यंत करावेत.

*  बृहन्मुंबई महानगरपालिका कामगार विभाग शिकावू उमेदवारांची महानगरपालिकेतील खाते/विभाग/ रुग्णालयात आयटीआय प्रशिक्षणार्थीच्या एकूण ५०३ पदांसाठी भरती.

(जोडारी – ५८ पदे, नळ कारागीर – ६६ पदे, डिझेल मेकॅनिक – ८७ पदे, तारतंत्री – ३३ पदे, विजतंत्री – ४० पदे, मेकॅनिक मोटार – ३९ पदे, गवंडी – २८ पदे, सुतार – २० पदे, बुक बाइंडर – २० पदे, सांधता – १६ पदे, रंगारी – १३ पदे, स्वयंचलित विजतंत्री – ११ पदे इ.) (विकलांगांसाठी काही पदे आरक्षित असतील.)

पात्रता – महाराष्ट्र राज्यातून आयटीआय उत्तीर्ण. ऑनलाइन पद्धतीने  <http://www.apprenticeship.gov.in/&gt;  या संकेतस्थळावर नोंदणी करून बृहन्मुंबई महानगरपालिकेस अर्ज करावा. ऑनलाइन अर्ज केल्यानंतर त्याची प्रत जाहिरातीत दिलेल्या विहित नमुन्यातील अर्जासोबत जोडून ‘प्रमुख कामगार अधिकारी, ६ वा मजला, विस्तारित इमारत, बृहन्मुंबई महानगरपालिका मुख्यालय, मुंबई – ४००००१ या पत्त्यावर दि. ३१ ऑगस्ट २०१७ पर्यंत पोहोचतील असे पाठवावेत. विहित नमुन्यातील अर्ज http://www.mcgm.gov.in   (Path : Recruitment….. Chief Labour Officer….. Apprentice recruitment, 2017) या संकेतस्थळावर उपलब्ध आहे.

*   डॉ. बाबासाहेब आंबेडकर संशोधन व प्रशिक्षण संस्था, (बार्टी) पुणेमार्फत महाराष्ट्र राज्यातील अनुसूचित जातीच्या संघ लोकसेवा आयोग, नागरी सेवा पूर्व परीक्षा, २०१७ उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांकरिता मुख्य परीक्षा,

२०१७ साठी आर्थिक साहाय्य योजनेअंतर्गत रु. ५०,०००/- रोख रक्कम दिली जाईल.

बार्टीमार्फत संघ लोकसेवा आयोग नागरी सेवा परीक्षा, २०१६ च्या मुख्य परीक्षा सराव चाचणी योजनेचा लाभ घेतलेले विद्यार्थी या योजनेचा लाभ घेऊ शकणार नाहीत. बार्टीने http://barti.maharashtra.gov.in&gt;

NOTICE BOARD>BARTI-UPSC-Civil Services Main Examination 2017 Financial Assistance Scheme Online Application Form

या लिंकवर उपलब्ध करून दिलेला अर्ज डाऊनलोड करून अर्जासोबत जातीचा दाखला, जात वैधता प्रमाणपत्र, उमेदवाराचा बँक खाते क्रमांक (पासबुकच्या प्रथम पृष्ठाची प्रत) आणि यूपीएससी सिव्हिल सर्व्हिसेस (पूर्व) परीक्षा २०१७ चे प्रवेशपत्र (अ‍ॅडमिन कार्ड) ची प्रत इ. स्कॅन करून बार्टीच्या barticec16@gmail.com या ई-मेलवर दि. २८ ऑगस्ट २०१७ पर्यंत पाठवावेत.

संपर्क – फोन नंबर – ०२०-२६३४३६००/ २६३३३३३०.