* नॅशनल इनोव्हेशन फाउंडेशन – इंडिया (एनआयएफ ) (भारत सरकारच्या सायन्स अँड टेक्नॉलॉजी विभागाअंतर्गत स्वायत्त संस्था) (जाहिरात क्र. ०४-२०१७) मध्ये भरती.

(१) इनोव्हेशन असोसिएट्स/इनोव्हेशन फेलोज – ७५ पदे.

पात्रता – अ‍ॅग्रिकल्चर, लाइफ सायन्सेस, मेडिकल सायन्स, व्हेटर्नरी सायन्स, मास कम्युनिकेशन, जर्नालिझम, इंजिनीअरिंग (मेकॅनिकल/कृषी/इलेक्ट्रॉनिक्स/प्रोडक्शन), इंटेलेक्चुअल प्रॉपर्टी राइट्समधील पदव्युत्तर पदवी,

३ वर्षांचा संबंधित कामाचा अनुभव.

वेतन – दरमहा रु. ६०,०००/-.

(२) फायनान्स अँड अ‍ॅडमिनिस्ट्रेशन मॅनेजर्स/फायनान्स अँड अ‍ॅडमिनिस्ट्रेशन असोसिएट्स – ६ पदे.

पात्रता – कॉमर्स, अकाउंट्स अँड फायनान्स, एचआरएम, इ.मधील पदव्युत्तर पदवी/ सीए/आयसीडब्ल्यूए/सीएफए ३ वर्षांचा मॅनेजर पदावर अ‍ॅडमिनिस्ट्रेशन, फायनान्स, स्टोअर अँड पच्रेस, इ. कामाचा अनुभव.

वेतन – दरमहा रु. ५०,०००/- (मॅनेजर पदासाठी). रु. ३०,०००/- (फायनान्स अँड अ‍ॅडमिनिस्ट्रेटिव्ह आणि इनोव्हेशन असोसिएट्स पदांसाठी).

वयोमर्यादा – ३५ वर्षेपर्यंत (इमाव – ३८ वर्षे, अजा/अज – ४० वर्षे,

विकलांग – ४५/४८/ ५० वर्षे).

सर्व पदे सुरुवातीला ३ वर्षांसाठी कंत्राटी पद्धतीवर असतील.

अधिक माहितीसाठी (http://www.nif.org.in/join_us) या संकेतस्थळावरुन माहिती घ्यावी. विहित नमुन्यातील अर्ज दोन रेफरन्स लेटर्स आणि अर्ज केलेल्या पोस्टसाठी मी कसा लायक आहे याबद्दलचे टिपण ‘दि डायरेक्टर, नॅशनल इनोव्हेशन फाउंडेशन-इंडिया, ग्रामभारती, अम्रापूर, गांधीनगर माहूदी रोड, गांधीनगर, गुजरात – ३८२ ६५०’ या पत्त्यावर स्पीड/रजिस्टर्ड पोस्टाने दि. १५ ऑक्टोबर २०१७ पर्यंत पोहोचतील असे पाठवावेत.

* सेंट्रल ग्राउंड वॉटर बोर्ड, पश्चिम मध्य विभाग, अहमदाबाद (वॉटर रिसोस्रेस गंगा रिज्युवेलेशन अँड रिव्हर डेव्हलपमेंट) ‘स्टाफ कार ड्रायव्हर’ (ऑíडनरी ग्रेड) च्या एकूण ३३ पदांची भरती.

(यूआर – १७, अजा – ४, अज – २, इमाव – १०)

पात्रता – दहावी उत्तीर्ण,  अवजड वाहन ड्रायिव्हग परवाना, अवजड वाहन चालविण्याचा ३ वर्षांचा अनुभव,  मोटार मेकॅनिझमची माहिती,  इंग्रजी/हिंदी लिहिता-वाचता येणे आवश्यक.

वयोमर्यादा – दि. ९ ऑक्टोबर, २०१७ रोजी १८ ते २७ वर्षे. (इमाव – ३० वर्षे, अजा/अज – ३२ वर्षे)

वेतन – स्केल लेव्हल – २ (७ व्या वेतन आयोगाप्रमाणे) सुमारे रु. २७,५००/-. विस्तृत जाहिरात एम्प्लॉयमेंट न्यूजच्या दि. ९ सप्टेंबर २०१७ च्या अंकात (पान क्र. ४३) वर पाहावी. विहित नमुन्यातील अर्ज आवश्यक त्या प्रमाणपत्रांच्या प्रतींसह ‘दि रिजनल डायरेक्टर, सेंट्रल ग्राउंड वॉटर बोर्ड, वेस्ट सेंट्रल रिजन, स्वामी नारायण कॉलेज बिल्डिंग, गीता मंदिर रोड, शाह आलम टोलनाका, अहमदाबाद’ या पत्त्यावर दि. ९ ऑक्टोबर २०१७ पर्यंत पोहोचतील असे पाठवावेत.

*   राष्ट्रीय केमिकल्स अँड फर्टलिायझर्स लिमिटेड (भारत सरकारचा अंगीकृत उपक्रम), मुंबई ‘ऑफिसर (फायनान्स) ई-१ ग्रेड’च्या एकूण १४ पदांची भरती.

(अजा – २, अज – १, इमाव – ३, खुला – ८)

(३ जागा विकलांगांसाठी राखीव, २ ओएच आणि १ एचएच कॅटेगरी).

पात्रता – बीकॉम पूर्ण वेळ एमबीए / एमएमएस दोन्ही डिग्रींच्या अंतिम वर्षांत सरासरी ६०% गुण किंवा सीए/सीएमए उत्तीर्ण.

कमाल वयोमर्यादा – दि. १ सप्टेंबर २०१७ रोजी खुला गट – ३५ वर्षे, इमाव – ३८ वर्षे, अजा/अज – ४० वर्षे (विकलांग खुला गट – ४५ वर्षे  इमाव – ४८ वर्षे  अजा – ५० वर्षे). वेतन – दरमहा रु. ४८,०००/- अंदाजे.

निवड पद्धती – ऑनलाइन टेस्ट  मुलाखत. अर्जाचे शुल्क – रु. ७००/- (अजा/अज/विकलांग यांना फी माफ) ऑनलाइन अर्ज http://www.rcfltd.com या संकेतस्थळावर दि. १३ ऑक्टोबर २०१७ पर्यंत करावेत.