स्टेट बँक ऑफ इंडिया डेप्युटी मॅनेजर (लॉ)च्या एकूण ४० पदांची भरती.

(सामान्य – २१, अजा – ६, अज – ३, इमाव – १०) (विकलांग ओएचसाठी एक पद राखीव)

पात्रता – कायदा विषयातील पदवी. ४ वर्षांचा अनुभव.

वेतन – रु. १५.१० लाख प्रतिवर्ष.

वयोमर्यादा – दि. १ सप्टेंबर, २०१७ रोजी २५ ते ३५ वष्रे. उच्चतम वयोमर्यादेत सूट. (इमाव – ३ वष्रे, अजा/अज – ५ वष्रे, विकलांग – १०/१३/१५ वष्रे)

निवड पद्धती – ऑनलाइन लेखी परीक्षा आणि मुलाखत.

लेखी परीक्षा दि. ११ नोव्हेंबर २०१७ रोजी

(१) टेस्ट ऑफ रिझिनग – ७० गुण.

(२) इंग्लिश लँग्वेज – ५० गुण.

वेळ – टेस्ट ऑफ रिझनिंग आणि इंग्लिश लँग्वेजसाठी ९० मिनिटे. यातील गुण फक्त पात्रता स्वरूपाचे जे अंतिम निवडीसाठी ग्राह्य़ धरले जाणार नाहीत.

(३) प्रोफेशनल नॉलेज – ५० प्रश्न, १०० गुण, वेळ ४५ मिनिटे.

अर्जाचे शुल्क – रु. ६००/- (रु. १००/- अजा/अज/ विकलांगांसाठी).

ऑनलाइन रजिस्ट्रेशन  https://sbicareers/ किंवा https://www.sbi.co.in/careers या संकेतस्थळावर करून त्याची िपट्रआऊट आवश्यक त्या कागदपत्रांसह एसबीआयच्या मुंबई येथील कार्यालयात १० ऑक्टोबर २०१७ पर्यंत पोहोचतील असे पाठवावेत.

महाराष्ट्र राज्य सुरक्षा महामंडळ (महाराष्ट्र शासनाचे वैधानिक महामंडळ), मुंबई येथे ५०० सुरक्षा रक्षकांची कंत्राटी पद्धतीवर नेमणूक.

पात्रता- १२ वी उत्तीर्ण.

वयोमर्यादा – दि. १ ऑक्टोबर, २०१७ रोजी १८ ते २८ वष्रे.

शारीरिक मापदंड – उंची – पुरुष – १७० सें.मी., (महिला) – १६० सें.मी.

वजन – पुरुष – ६२ कि., महिला – ४५ कि. छाती – पुरुष – ७९-८४ सें.मी.

शारीरिक चाचणी – पुरुष – १,६०० मी. धावणे (३० गुण), पुलअप्स (१० साठी २० गुण) (एकूण ५० गुण). महिला – ८०० मी. धावणे (५० गुण).

१२ वीच्या गुणांचे भार – ७०% पेक्षा जास्त – ५० गुण,

६० ते ७०% – ४० गुण,

५० ते ६०% – ३० गुण,

४० ते ५०% – १० गुण.

कंत्राटानुसार मोबदला – मासिक रु. १४,०००/-.

अर्जासोबत भरावयाचे प्रक्रिया शुल्क – रु. २००/- हे वेबिलकवर अर्ज भरण्यापूर्वी एनईएफटीद्वारे भरावे.

ऑनलाइन अर्ज  http://www.mahasecurity.gov.in/ या संकेतस्थळावर दि. १३ ऑक्टोबर २०१७ पर्यंत करावे. अधिक माहितीसाठी  http://www.mahasecurity.gov.in/images/msf/pdf/advertisement_27092017.pdf ही वेबलिंक पाहावी.

डिफेन्स रिसर्च अ‍ॅण्ड डेव्हलपमेंट ऑर्गनायझेशन (डीआरडीओ), डॉ. ए.पी.जे. अब्दुल कलाम काँप्लेक्स, आरसीआय, विज्ञान कांचा पोस्ट ऑफिस, हैद्राबाद – ४०० ०६९ येथे एकूण १८ ज्युनियर रिसर्च फेलोशिप पोस्टची भरती.

पात्रता – – इलेक्ट्रिकल अँड इलेक्ट्रॉनिक्स इंजिनीअरिंग, इलेक्ट्रॉनिक्स अँड कम्युनिकेशन इंजिनीअरिंग, कम्प्युटर सायन्स इंजिनीअरिंग, केमिकल इंजिनीअरिंग विषयांत बी.ई./बी.टेक्. प्रथम वर्गात उत्तीर्ण + जीएटीई स्कोअर.

-एम.एस्सी. (फिजिक्स/लेसर/अ‍ॅप्लाईड ऑप्टिक्स/केमिस्ट्री इ.) प्रथम वर्गात उत्तीर्ण + जीएटीई/एनईटी स्कोअर किंवा

-वरील विषयांतील एम.ई./एम.टेक.

प्रथम वर्गात उत्तीर्ण.

वयोमर्यादा – दि. ३१ ऑक्टोबर, २०१७ रोजी

२८ वष्रे (इमाव – ३१ वष्रे, अजा/अज -३३ वष्रे).

ऑनलाईन अर्ज https://rcilab.in/ या संकेतस्थळावर दि. १५ ऑक्टोबर, २०१७ पर्यंत करावेत.