एलआयसी गोल्डन ज्युबिली फाउंडेशनतर्फे आर्थिकदृष्टय़ा मागासलेल्या गटातील विद्यार्थ्यांना देण्यात येणाऱ्या आयुर्विमा महामंडळाच्या सुवर्ण जयंती शिष्यवृत्ती योजनेअंतर्गत देण्यात येणाऱ्या शैक्षणिक शिष्यवृत्तीसाठी खाली नमूद केल्याप्रमाणे पात्रताधारक विद्यार्थ्यांकडून अर्ज मागविण्यात येत आहेत.

शिष्यवृत्तींची संख्या व तपशील :

Summer vacation has been announced for schools in the state When will the school start
राज्यातील शाळांना उन्हाळी सुटी जाहीर… शाळा सुरू कधी होणार? शिक्षण विभागाने दिली माहिती…
Admission Delayed, 500 Students of college of physican and surgeon, Maharashtra, 500 Students Still Awaiting Admission, physician students, surgeon students, admission awating physican students,
मान्यतेनंतरही सीपीएस अभ्यासक्रमाचे प्रवेश सुरू करण्यास मुहूर्त सापडेना, ५०० जागांवरील प्रवेशासाठी विद्यार्थी प्रतीक्षेत
Career MPSC exam Guidance UPSC job
प्रवेशाची तयारी: व्यवस्थापन शिक्षणासाठी राज्यस्तरीय सीईटी
Release of candidates
वेगवेगळ्या प्रवेश परीक्षांतून उमेदवारांची सुटका, आता एकाच परीक्षेतून प्रवेशाची संधी

या योजनेअंतर्गत देण्यात येणाऱ्या शैक्षणिक शिष्यवृत्तींची संख्या २० आहे. त्यापैकी १० शिष्यवृत्ती या विद्यार्थिनींना देण्यात येणार आहेत.

संबंधित विषय व अभ्यासक्रम :

शिष्यवृत्ती देण्यासाठी खालील विषय आणि अभ्यासक्रमांचा समावेश करण्यात आला आहे.

गट १ : वैद्यकशास्त्र, अभियांत्रिकी अथवा अन्य कुठल्याही विषयातील पदवी अथवा पदविका अभ्यासक्रम.

आवश्यक शैक्षणिक पात्रता :

उमेदवारांनी १०+२ शैक्षणिक अभ्यासक्रमांतर्गत बारावीची परीक्षा कमीतकमी ६०% गुणांसह उत्तीर्ण केलेली असावी व त्यांनी वर नमूद केलेल्या अभ्यासक्रमांना प्रवेश घेतलेला असावा.

गट २ : औद्योगिक प्रशिक्षण संस्थेतील पात्रता अभ्यासक्रमांसह विभिन्न कौशल्यविषयक अभ्यासक्रम:

आवश्यक शैक्षणिक पात्रता:

अर्जदार विद्यार्थ्यांनी २०१५-१६ या शैक्षणिक सत्रात शालान्त परीक्षा कमीतकमी ६०% गुणांसह उत्तीर्ण केलेली असावी व त्यांनी संबंधित अभ्यासक्रमात प्रवेश घेतला असावा.

विशेष सूचना :

अर्जदार विद्यार्थ्यांच्या पालकांचे वार्षिक एकत्रित उत्पन्न १ लाख रुपयांहून अधिक नसावे.

अधिक माहिती व तपशिलासाठी संपर्क:

योजनेसंदर्भात अधिक माहिती व तपशिलासाठी आयुर्विमा महामंडळाच्या शाखा, कार्यालये अथवा महामंडळाच्या www.licindia.in या संकेतस्थळाला भेट द्यावी.

अर्ज करण्याची पद्धत व शेवटची तारीख:

संगणकीय पद्धतीने वरील संकेतस्थळावर अर्ज करण्याची शेवटची तारीख

२३ सप्टेंबर २०१६ आहे.