का? कुठे? कसे?

दिवाळीसाठी खरेदीची लगबग सुरू झालीच असेल. त्यानंतर लग्नसराईचा मौसमही सुरु होईल अशावेळी महाराष्ट्रात कुठे काय मिळते हे माहीत असणे तुमच्या फायद्याचे ठरेल.

Marathi paper viral
यवतमाळ : पाटणबोरीत मराठीचा पेपर भ्रमणध्वनीवरून सार्वत्रिक
Wardha Yavatmal Nanded first train service from Kalamba to Wardha started
१५ वर्षांची प्रतीक्षा संपली; कळंब– वर्धा मार्गावर धावली पहिली रेल्वे
imd predicted hailstorm in north central Maharashtra
उत्तर-मध्य महाराष्ट्र,मराठवाड्यात शुक्रवारी गारपीट… जाणून घ्या हवामान विभागाचा अंदाज
Water supply by tanker to 61 villages in Jat and Atpadi talukas of the district sangli
सांगली: सव्वा लाख लोकांची तहान टँकरच्या पाण्यावर

* येवला बाजारपेठ

नाशिकपासुन ३० किलोमीटर अंतरावर असलेली येवला हे ठिकाण तेथील पैठणींसाठी प्रसिध्द आहे. हातमागावर तयार केलेल्या पैठण्या, शालु, पितांबर येथे तुम्हाला मिळतील. सोन्याची व चांदीची जरी असलेली पैठणी घेण्यासाठी तुम्ही या बाजाराला नक्की भेट देऊ शकता.

*  कोल्हापूर बाजारपेठ

हाताने शिवून तयार केलेली कोल्हापूरी चप्पल जेवढी इंगा दाखवण्यासाठी प्रसिध्द तितकीच पारंपारिक फॅशनची खास ओळख असलेली. या चप्पलेसाठी कोल्हापूरचा बाजार अत्यंत प्रसिध्द आहे. कोल्हापूरमध्ये महाद्वार रस्ता, शिवाजी आणि भाऊसिंगची रस्त्यावर तुम्हाला या चपला हमखास मिळतील. तुम्हाला अगदी स्वस्तात कोल्हापुरी चप्पल हवी असल्यास शेटकारी बाजाराला भेट द्यायला हरकत नाही.

*  मंगलदास बाजारपेठ

मुंबईतील साधारण दीडशे वर्षांंपासून ‘कपडय़ांचे होलसेल मार्केट’ अशी ओळख असलेल्या मंगलदास बाजारपेठेत कॉटनपासून पॉलिस्टपर्यंत विविध प्रकारचे कापड मिळते. लग्नसराई व दिवाळीत या बाजारात प्रचंड गर्दी असते. पश्चिम रेल्वेच्या मरीनलाईन्स स्थानकावरून या बाजारपेठेत जाता येते. ही बाजारपेठ लोहार चाळी जवळ आहे.

*   तुळशीबाग बाजारपेठ

पुण्याच्या तुळशीबाग बाजारपेठेला भेट द्यायलाच हवी. स्वारगेटपासून ३ किमी अंतरावर असणाऱ्या या बाजारपेठेत तुम्हाला या दागिन्यांसोबतच कपडे व इतरही वस्तू मिळतील.