महाराष्ट्र शासनाच्या कॉमन एन्ट्रन्स टेस्ट सेल, या विभागातर्फे राज्यातील विविध महाविद्यालये व शिक्षण संस्थांमध्ये दोन वर्षे कालावधीच्या बीपीएड म्हणजेच शारीरिक शिक्षण पदवी अभ्यासक्रम उपलब्ध आहे. या अभ्यासक्रमामध्ये प्रवेश देण्यासाठी निवड परीक्षा घेण्यात येणार आहे. यासाठी खाली नमूद केल्याप्रमाणे पात्रताधारक उमेदवारांकडून प्रवेशअर्ज मागवण्यात येत आहेत.

*   आवश्यक शैक्षणिक पात्रता – अर्जदार कुठल्याही विषयातील पदवीधर व शारीरिकदृष्टय़ा सक्षम असायला हवेत.

*   निवड पद्धती – अर्जदारांपैकी पात्रताधारक उमेदवारांची निवड परीक्षा घेण्यात येईल. संगणकीय पद्धतीने घेण्यात येणारी ही राज्यस्तरीय परीक्षा २ जून २०१७ रोजी घेण्यात येईल.

निवड परीक्षेत निर्धारित गुणांक मिळवणाऱ्या उमेदवारांची शारीरिक चाचणी १२, १३ जून २०१७ ला निर्धारित केंद्रांवर घेण्यात येईल. त्याआधारे २० जून २०१७ ला अभ्यासक्रमासाठी अर्जदारांची अंतिम यादी जाहीर करण्यात येईल.

*   अधिक माहिती व तपशिलासाठी संपर्क -अभ्यासक्रमाच्या अधिक माहिती व तपशिलासाठी प्रमुख वृत्तपत्रांत प्रकाशित झालेली महाराष्ट्र शासनाच्या कॉमन एन्ट्रन्स टेस्ट सेलटी एमएएच-बीपीएड-सीईटी २०१७ची जाहिरात पाहावी. दूरध्वनी क्र.- ०२२२६४७३७१९वर संपर्क साधावा. अथवा महाराष्ट्र शासनाच्या http://www.mahacet.org  किंवा  www.dhepune.gov.in  या संकेतस्थळांना भेट द्यावी.

*   अर्ज करण्याची पद्धत आणि शेवटची तारीख – संगणकीय पद्धतीने वरील संकेतस्थळावर अर्ज करण्याची शेवटची तारीख २५ मे २०१७ आहे. राज्यातील ज्या पात्रताधारक पदवीधर उमेदवारांना शारीरिक शिक्षण विषयातील पदव्युत्तर पात्रतेसह पुढील करिअर करायचे असेल त्यांच्यासाठी हा अभ्यासक्रम उपयुक्त ठरतो.