दारिद्रय़रेषेखालील पिवळे, अंत्योदय अन्न योजना, अन्नपूर्णा योजना शिधापत्रिकाधारक व दारिद्रय़रेषेवरील केशरी शिधापत्रिकाधारक, शासकीय आश्रम शाळेतील विद्यार्थी, महिला आश्रमातील महिला, अनाथालय, वृद्धाश्रमातील ज्येष्ठ नागरिक तसेच अधिस्वीकृतीधारक पत्रकार व त्यांच्यावर अवलंबून असणारे कुटुंब व अन्य लाभार्थी संबंधित प्रशासकीय विभागाकडून या लाभार्थी घटकांची अचूक आकडेवारी उपलब्ध करून घेऊन लाभार्थ्यांची संख्या निश्चित करण्यात येईल व या लाभार्थी घटकांना योजनेअंतर्गत विमा संरक्षण उपलब्ध करून दिले जाईल.

लाभार्थी ओळख

  • लाभार्थ्यांची ओळख राज्य शासनाने निश्चित केल्यानुसार योजनेअंतर्गत लाभार्थी कुटुंबास देण्यात येणारे आरोग्य ओळखपत्र किंवा असंघटित कामगार ओळखपत्र / स्मार्ट कार्ड किंवा राज्य शासन निर्धारित करील, अशा इतर कोणत्याही पुराव्याच्या आधारे पटवली जाईल.
  • खर्चाची मर्यादा
  • योजनेंतर्गत समाविष्ट उपचारपद्धतीवरील उपचारांसाठी कुटुंबातील एक किंवा सर्व सदस्यांसाठी वार्षिक विमा संरक्षण रक्कम प्रतिवर्ष प्रति कुटुंब रुपये दोन लाख एवढी असेल.
  • मूत्रपिंड प्रत्यारोपणासाठी सदर मर्यादा प्रति वर्ष / प्रति कुटुंब रुपये तीन लाख असेल. यामध्ये दात्याचा समावेश असेल.
  • या योजनेंतर्गत उपचार सुरू होण्यापूर्वी असलेल्या आजारांचा समावेश राहील.

योजनेतील अंगीकृत रुग्णालये

  • राज्यातील अधिकाधिक लाभार्थ्यांना योजनेचा लाभ देण्यासाठी अंगीकृत रुग्णालये संख्येची मर्यादा शिथिल करण्यात आली आहे. त्याचबरोबर ट्रॉमाकेअर, ऑन्कॉलॉजी इत्यादी विशेषज्ञ सेवांसाठी प्राधान्याने रुग्णालये अंगीकृत करण्यात येतील. आवश्यकता भासल्यास अपवादात्मक परिस्थितीत सीमावर्ती राज्यातील शासकीय रुग्णालयांना एका वर्षांसाठी अंगीकृत करण्यात येईल.