इंडियन इन्स्टिटय़ूट ऑफ टेक्नॉलॉजी मुंबई व मोनॅश रिसर्च अकादमी मेलबोर्न, ऑस्ट्रेलिया यांच्या संयुक्त विद्यमाने डिसेंबर २०१७ पासून सुरू होणाऱ्या संसोधनपर पीएच.डी.साठी खाली नमूद केल्याप्रमाणे पात्रताधारक संशोधक उमेदवारांकडून प्रवेशिका मागविण्यात येत आहेत.

विषयांचा तपशील – या संशोधनपर पीएच.डी.साठी विज्ञान, तंत्रज्ञान, संगणक विज्ञान, माहिती तंत्रज्ञान, सामाजिक विज्ञान, गणित व आरेखन इ. विषयांचा समावेश करण्यात आला आहे.

आवश्यक शैक्षणिक पात्रता – अर्जदारांनी अभियांत्रिकी वा विज्ञान विषयातील पदवी व वरील विषयातील पदव्युत्तर पात्रता चांगल्या शैक्षणिक आलेखासह उत्तीर्ण केलेली असावी. याशिवाय त्यांना संबंधित विषयातील संशोधनपर कामात रुची असायला हवी.

विशेष सूचना – वरील शैक्षणिक पात्रतेशिवाय जीएटीई, जीआरई, सीएसआयआर- एचईटी, जेएएम यासारख्या पात्रताधारक उमेदवारांना प्राधान्य देण्यात येईल. निवड झालेल्या उमेदवारांना इंडियन इन्स्टिटय़ूट ऑफ टेक्नॉलॉजी- मुंबई व मोनॅश रिसर्च अकादमी, बेलबॉन या संशोधन संस्थांशिवाय भारत व ऑस्ट्रेलियातील प्रगत उद्योगातील तंत्रज्ञांसह संशोधनपर काम करण्याची व त्याद्वारे संबंधित विषयातील संशोधनपर पीएच.डी. करण्याची संधी मिळेल.

अधिक माहिती व तपशिलासाठी संपर्क – आंतरराष्ट्रीय स्तरावरील या संशोधनपर पीएच.डी.साठी प्रमुख वृत्तपत्रात प्रकाशित झालेली इंडियन इन्स्टिटय़ूट ऑफ टेक्नॉलॉजी मुंबई व मोनॅश रिसर्च अकादमी मेलबोर्नची जाहिरात पाहावी अथवा www.iitbmonash.org या संकेतस्थळाला भेट द्यावी.

अर्ज करण्याची पद्धत व शेवटची तारीख संगणकीय पद्धतीने वरील संकेतस्थळावर अर्ज करण्याची शेवटची तारीख ११ सप्टेंबर २०१७ आहे.