मागील अंकात आपण महाराष्ट्र कृषी सेवा मुख्य परीक्षेतील कृषी-विज्ञान या अनिवार्य पेपरविषयी माहिती घेतली. आज या परीक्षेतील वैकल्पिक विषय-कृषी व कृषी अभियांत्रिकी यांच्याविषयी आपण जाणून घेऊ या.

India to get above normal rain
दिलासा; यंदा उत्तम पावसाचा अंदाज
State Tax Inspector Exam Final Result declared by MPSC
राज्य कर निरीक्षक परीक्षेचा अंतिम निकाल एमपीएससीकडून जाहीर
Postponement of physical test of PSI by MPSC Pune print news
एमपीएससीकडून ‘पीएसआय’ची शारीरिक चाचणी लांबणीवर
mpsc MPSC declared the result of Civil Engineering Pune
एमपीएससीकडून ‘स्थापत्य अभियांत्रिकी’चा निकाल जाहीर

प्रश्नपत्रिकांची संख्या –

दोन (एक अनिवार्य व एक वैकल्पिक)
car03

*’   परीक्षार्थीना कृषी विज्ञान अनिवार्य विषयाबरोबर कृषी किंवा कृषी अभियांत्रिकी या दोन विषयांमधून एकाची वैकल्पिक विषय म्हणून निवड करावी लागते.

मुख्य परीक्षा वैकल्पिक विषयांचा अभ्यासक्रम

*  अभ्यासक्रमातील प्रमुख घटक येथे देत आहोत. संपूर्ण अभ्यासक्रमासाठी आयोगाच्या संकेतस्थळाला भेट द्यावी.

पेपर २ (वैकल्पिक)

कृषी

१) कृषी वनस्पतीशात्र

मॉफॉलॉजी, अ‍ॅनॉटॉमी, स्फायटोजेनेटिक्स, जेनेटिक्स

*   पीक पदास

भारतातील बियाणेविषयक कायदे, बियाणे उत्पादन तंत्रज्ञान, पीक पदासीची नवीन साधने उदा. टिश्यू कल्चर, फोटोप्लास्ट फ्यूजन

*  प्लॅन्ट फिजिऑलॉजी

पेशींचे ऑसमॅटिक गुण आणि परस्पर संबंध, दुष्काळ प्रतिकार क्षमता.

सामाजिक वनीकरण

औषधी आणि सुगंधी वनस्पती पर्यावरणीय विज्ञान आणि कृषी पर्यावरणशास्त्र

 वनस्पती जैव तंत्रज्ञान

२) पीक संरक्षण

*   कीटकशात्र (इन्टॉमॉलॉजी)

कीड व्यवस्थापन, कीड नियंत्रण पद्धती, कीटकनाशकांचा परिणाम

 *   प्लॅन्ट पॅथॉलॉजी 

विकास, रोग प्रतिकार, सिम्टॉमॉलॉजी, वनस्पती रोग व नियंत्रण

३) फलोत्पादन

फळे, भाज्या, फुले लागवड, काढणीपश्चात, व्यवस्थापण आणि प्रक्रिया

४) शेतीविषयक प्रसार 

ग्रामीण समाजशास्त्र, समुदाय विकास, शैक्षणिक प्रसार, प्रशासकीय प्रसार आणि कार्यक्रम मूल्यांकन

५) कृषी अर्थशात्र

भारतीय अर्थव्यवस्थेतील कृषीचे स्थान, समस्या, पंचवार्षकि योजना, नवीन कृषी धोरण, केंद्र आणि राज्य शासनाच्या योजना.

६) पशुसंवर्धन आणि दुग्धविकास

७) अन्न विज्ञान

कृषी अभियांत्रिकी

१) शेतीतील कार्यशक्ती आणि शेतकी यंत्रे शेतीतील कार्यशक्ती

मानवी, प्राणी आणि विद्युत शक्ती

कृषी ट्रॅक्टर्स

मशागत, लावणी आणि काढणी (हार्वेिस्टग) यंत्रणा.

२) कृषी प्रक्रिया अभियांत्रिकी

कृषी सामुग्री हाताळणे, दुग्ध आणि अन्न अभियांत्रिकी

३) विद्युत आणि इतर ऊर्जा स्रोत 
वीज, सौरऊर्जा, पवन ऊर्जा, बायोगॅस एनर्जी

४) शेत संरचना

५) माती आणि जलसंवर्धन अभियांत्रिकी

६) सिंचन आणि निचरा (ड्रेनेज) अभियांत्रिकी

सिंचन पद्धती, कालवा सिंचन, जमिनीचा विकास

car02

वरील विश्लेषणावरून कृषी व कृषी अभियांत्रिकी या पेपर २ मधील प्रश्नांची घटकनिहाय गुणविभागणी आपल्याला दिसून येते. खाली दोन्ही विषयांतील अभ्यासाच्या दृष्टीने महत्त्वाच्या मुद्दय़ांचे विश्लेषण केलेले आहे.

१) कृषी – क्लोिनग, C3 C4  आणि CAM च पिकांची वैशिष्टय़े व उदाहरणे, पिकांच्या जाती, प्रकाश संश्लेषण प्रक्रिया सूक्ष्म पोषकद्रव्ये व अन्नधान्यातून मिळणारी जीवनसत्त्वे, जनुकीय नियमन, कृत्रिम वाण आणि संमिश्र वाण, वनस्पती पोषण,

कबरेदकांमध्ये चयापचय क्रिया, कृषी वनीकरण, प्रदूषण-प्रकार, वर्गीकरण, कारणे आणि उपाय, नसíगक संसाधने आणि त्यांचे संवर्धन, वनस्पती आणि रोग, कीटकनाशके, कीड प्रतिकारात जैवतंत्रज्ञानाची भूमिका, भाज्या, फुले व फळ भाजीपाला यांची लागवड व संरक्षण, त्यांच्या साठवणूक पद्धती, ग्रामीण समाज-संस्कृती व शिक्षण, कृषीतील आंतरराष्ट्रीय कल, गॅट परिणाम/wto शासकीय योजना व कार्यक्रम यांचा अभ्यास महत्त्वपूर्ण ठरतो.

२) कृषी अभियांत्रिकी  – या विषयात मानवी, प्राणी व यंत्राद्वारे केले जाणारे शेतीतील कार्य, कृषी टॅक्टर, पॉवर टिलर, हायड्रॉलिक प्रणाली, मशागतीची यंत्रणा, बियाणे आणि वनस्पतीच्या लावणी पद्धती, धान्य पेरण्याची यंत्रे, पीक काढणीच्या पद्धती, स्पेअर पंप, नॉझल आणि त्यांचे प्रकार, पिकांची वाळवणी, कृषी सामुग्री- पारंपरिक, यांत्रिक, फलोत्पादन प्रक्रिया, स्टोरेज संरचना, दुग्धजन्य पदार्थ व साठवणूक पद्धती, कोल्ड स्टोरेज, सौर ऊर्जा वापर, विद्युत मोटर्स काळजी व देखभाल, बायोगॅस प्लॅन्टच्या विविध पद्धती, माती आणि जलसंवर्धन, जमिनीची धूप नियंत्रण, पूर नियंत्रण, पाणलोट व्यवस्थापन, शेत तलाव, पाझर तलाव, पावसाच्या पाण्याची साठवण, ठिबक व उपसा सिंचन या घटकांवर परीक्षार्थीनी विशेष लक्ष द्यावे.

संदर्भ सूची –

१) कृषी

*   प्रिन्सिपल ऑफ अ‍ॅग्रॉनॉमी – रेड्डी

*   राज्य परीक्षा मंडळाची अ‍ॅग्रीकल्चर  आणि टेक्नॉलॉजीची ११ वी व १२वीची पुस्तके

*   पर्यावरण  – शंकर आयएएस अ‍ॅकॅडमी

*   टॉपर्स नोटस्- सुभाष यादव,  सचिन सूर्यवंशी

*   जनरल अ‍ॅग्रीकल्चर – मुनीरजी सिंग

*   अ कॉम्पेटिटिव्ह बुक ऑफ  अ‍ॅग्रीकल्चर – नेमराज सुंदा

*   भारतीय अर्थव्यवस्था – दत्त आणि सुंदरम

 

२) कृषी अभियांत्रिकी

*   अ‍ॅग्रीकल्चर इंजिनीअिरग – भाग १ व २ – मिशेल अ‍ॅॅण्ड ओझा

*   ऑब्जेक्टिव्ह ऑफ अ‍ॅग्रीकल्चर  इंजिनीअिरग – प्रीतम चंदा

*   लोकराज्य, योजना मासिके

*   करंट ग्राफ वार्षकिी

महेश कोगे