राष्ट्रीय अंधत्व नियंत्रण कार्यक्रम १०० टक्के केंद्र पुरस्कृत योजना असून सन १९७६पासून सुरू करण्यात आली. त्या वर्षांत अंधत्वाचे प्रमाण १.४ टक्के होते. हे प्रमाण ०.३ पर्यंत आणावयाचे उद्दिष्ट आहे.

mpsc Mantra  Current Affairs Question Analysis
mpsc मंत्र : चालू घडामोडी प्रश्न विश्लेषण
toll plaza
विश्लेषण : भविष्यात टोलनाके बंद होणार? कशी असेल GPS आधारित नवी यंत्रणा?
Controversy over opting out in recruitment process of Maharashtra Public Service Commission
‘ऑप्टिंग आऊट’वरून पुन्हा वाद; या पर्यायामुळे आर्थिक गैरव्यवहार….
Office of ED and National Investigation Agency in BKC mumbai
ईडी आणि राष्ट्रीय तपास यंत्रणेचे बीकेसीत कार्यालय; बीकेसीतील २००० चौ. मी. चा भूखंड ईडीला

उद्दिष्टे

  • अंध व्यक्ती शोधून काढणे आणि उपचार करून अंधत्वाचे प्रमाण कमी करणे.
  • प्रत्येक जिल्ह्यात सर्वसमावेशक नेत्र सेवा सुविधा विकसित करणे.
  • नेत्रविषयक सेवा पुरविणाऱ्या साधनांची गुणवत्ता व मनुष्यबळ विकसित करणे.
  • अंधत्व नियंत्रण कार्यक्रमांतर्गत स्वयंसेवी संस्था/खाजगी व्यावसायिक यांना सहभागी करणे.
  • नेत्र सेवा कार्यक्रमांबाबत जागरूकता वाढविणे.

सेवा

  • मोतिबिंदू शस्त्रक्रियेमध्ये मुख्यत: कृत्रिम भिंगरोपण शस्त्रक्रिया करणे.
  • अशासकीय स्वयंसेवी संस्थांना डोळ्यांच्या आजारांवर उपचारासाठी आर्थिक सहायता देण्यात येते.
  • दृष्टिदोष शोधण्यासाठी शालेय विद्यार्थ्यांची नेत्र तपासणी करण्यात येते व दृष्टिदोष आढळलेल्या गरीब विद्यार्थ्यांना मोफत चष्मा दिला जातो.
  • बुब्बुळ प्रत्यारोपणासाठी मृत्युपश्चात दान केलेल्या डोळयांचे संकलन करणे
  • सार्वजनिक क्षेत्रातील नेत्रविषयक सेवांची क्षमता वाढविण्यासाठी रुग्णालयांना मदत प्रदान करणे
  • ग्रामीण लोकसंख्येसाठी नेत्र सेवा केंद्र बळकटीकरण व विस्तृतीकरणासाठी स्वयंसेवी संस्थाना विना आवर्ती मदत प्रदान करणे.
  • जिल्हा रुग्णालयात नेत्र शस्त्रक्रियागृह आणि नेत्रकक्षाचे बांधकाम करणे
  • अधिक माहितीसाठी – https://arogya.maharashtra.gov.in