देशांतर्गत विविध शिक्षण व संशोधन संस्थांमध्ये जीवशास्त्र व संबंधित विज्ञान विषयांतर्गत विविध स्तरांवरील अभ्यासक्रमांमध्ये प्रवेश घेण्यासाठी टाटा इन्स्टिटय़ूट ऑफ फंडामेंटल रिसर्च व नॅशनल सेंटर फॉर बायोलॉजिकल सायन्सेसद्वारा जॉइंट ग्रॅज्युएट एन्ट्रन्स एक्झामिनेशन इन बायोलॉजी अ‍ॅण्ड इंटरडिसिप्लिनरी लाइफ सायन्सेस  (जेजीईईबीआयएलएस) ही प्रवेश पात्रता परीक्षा घेण्यात येते. या परीक्षेसाठी विद्यार्थ्यांकडून प्रवेश अर्ज मागविण्यात येत आहेत. अभ्यासक्रमांसाठी प्रवेश उपलब्ध असणाऱ्या शैक्षणिक संशोधन संस्थांमध्ये महाराष्ट्रातील पुढील संस्थांचा समावेश असावा.

अ‍ॅडव्हान्स्ड सेंटर फॉर ट्रीटमेंट, रिसर्च अ‍ॅण्ड एज्युकेशन इन कॅन्सर, मुंबई www.actrec.gov.in

डिपार्टमेंट ऑफ बायोलॉजिकल सायन्सेस, टाटा मूलभूत संशोधन संस्था मुंबई – http://www.tifr.res.in/

नॅशनल सेंटर फॉर सेल सायन्स, पुणे- www.nccs.res.in

निवड पद्धती – अर्जदारांपैकी पात्रताधारक उमेदवारांना लेखी निवड परीक्षेसाठी बोलाविण्यात येईल. राष्ट्रीय स्तरावरील ही निवड परीक्षा १० डिसेंबर २०१७ रोजी घेण्यात येईल व त्यामध्ये महाराष्ट्रातील मुंबई, नागपूर पुणे या परीक्षा केंद्रांचा समावेश असेल. उमेदवारांची पात्रता परीक्षेतील गुणांची टक्केवारी व जेजीईईबीआयएलएस प्रवेश पात्रता परीक्षेतील गुणांकाच्या आधारे त्यांना संबंधित संस्थेच्या अभ्यासक्रमामध्ये प्रवेश देण्यात येईल.

अर्जासह भरावयाचे शुल्क- अर्जासह भरावयाचे प्रवेश शुल्क म्हणून ६०० रु. संगणकीय पद्धतीने अथवा ६५० रु.चा नॅशनल सेंटर फॉर बायोलॉजिकल सायन्सेसच्या नावे असणारा व स्टेट बँक ऑफ इंडिया, बंगलोर येथे देय असणारा डिमांड ड्राफ्ट प्रवेश अर्जासह पाठविणे आवश्यक आहे.

अधिक माहिती व तपशिलासाठी संदर्भ – अभ्यासक्रम व प्रवेश पात्रता परीक्षेच्या संदर्भात अधिक माहिती व तपशिलासाठी प्रमुख वृत्तपत्रात प्रकाशित झालेली नॅशनल सेंटर फॉर बायोलॉजिकल सायन्सेस, बंगलोरची जाहिरात पाहावी अथवा सेंटरच्या दूरध्वनी क्र. ०८०- २३६६६४०४ अथवा २३६६६२०१ या दूरध्वनी क्रमांकावर संपर्क साधावा अथवा सेंटरच्या phd@ncbs.res.in या ई-मेलवर संपर्क साधावा.

अर्ज पाठविण्याचा पत्ता व शेवटची तारीख व पत्ता – संपूर्णपणे भरलेले व आवश्यक ते कागदपत्र व डिमांड ड्राफ्टसह असणारे प्रवेश अर्ज अ‍ॅडमिशन्स सेक्शन, नॅशनल सेंटर फॉर बायोलॉजिकल सायन्सेस, टाटा इन्स्टिटय़ूट ऑफ फंडामेंटल रिसर्च, जीकेव्हीके, बेल्लारी रोड, बंगलोर, ५६००६५ या पत्त्यावर १२ ऑक्टोबर २०१७ पर्यंत पोहोचतील अशा बेताने पाठवावेत.