योजनेची माहिती

  • या योजनेच्या कार्यक्रमात शारीरिक क्षमता अजमावण्याकरिता निवडक कसोटय़ांचा समावेश केलेला असून पुरुष, स्त्रिया तसेच कनिष्ठ गट यांसाठी निरनिराळे निकष ठरविण्यात आले आहेत.
  • देशातील सर्व राज्यांत १९६२ मध्ये खास चाचणी केंद्रे स्थापन करण्यात आली असून चाचणी केंद्रांत प्रशिक्षण देण्याची व सराव करण्याची सोय उपलब्ध करण्यात आली आहे.
  • या मोहिमेचे सर्व व्यवस्थापन केंद्रीय शिक्षण मंत्रालयाने ग्वाल्हेर येथील लक्ष्मीबाई राष्ट्रीय शारीरिक शिक्षण महाविद्यालयाकडे सोपविले आहे.
  • मोहिमेचा प्रचार व प्रसार विस्तृत प्रमाणात व्हावा, म्हणून प्रतिवर्षी प्रत्येक राज्याच्या संबंधित अधिकाऱ्यांचे एक चर्चासत्र आयोजित करण्यात येते.
  • त्यांच्या सूचनेप्रमाणे वेळोवेळी चाचण्या, निकष आदींबाबत योग्य ते बदल केले जात असत.

कसोटय़ांचे गट

3334 children underwent heart surgery under the National Child Health Programme
राष्ट्रीय बाल स्वास्थ्य कार्यक्रमांतर्गत ३,३३४ मुलांवर हृदय शस्त्रक्रिया! दोन कोटी बालकांची आरोग्य तपासणी…
National Institute of Nutrition job post
ICMR Recruitment 2024 : राष्ट्रीय पोषण संस्थेमध्ये विविध पदांवर होणार भरती! ‘इतक्या’ हजारांपर्यंत मिळणार पगार
mpsc Mantra  Current Affairs Question Analysis
mpsc मंत्र : चालू घडामोडी प्रश्न विश्लेषण
wheat, farmers
केंद्राचा ‘हा’ निर्णय गहू उत्पादक शेतकऱ्यांच्या मुळावर?
  • कसोटय़ांचे ‘बॅटरी अ’ व ‘बॅटरी ब’ असे दोन गट आहेत.
  • ‘बॅटरी अ’ मध्ये १०० मीटर धावणे, लांब उडी, उंच उडी, गोळाफेक, ८०० मीटर धावणे, तसेच ग्रामीण भागांतील लोकांकरिता सोईचे होईल अशा दंड-बैठका, चालणे व धावणे, क्रिकेट, चेंडू फेकणे किंवा फुटबॉल फेकणे, सीट अप्स काढणे इत्यादी. प्रत्येक वयोगटात पहिल्या पाच क्रमांकाच्या व्यक्तींना खास बक्षिसे व शिष्यवृत्त्या देण्यात येतात. स्त्री व पुरुष यांचे वयोगट समान आहेत : (१) १-११ वर्षे, (२) १२-१३ वर्षे, (३) १४-१५ वर्षे, (४) १६-१७ वर्षे, (५) १८-२४ वर्षे, (६) २५-३४ वर्षे व (७) ३५ व त्यापुढील.

अधिक माहितीसाठी http://yas.nic.in/