केंद्र सरकारच्या ऊर्जा मंत्रालयांतर्गत कार्यरत असणाऱ्या नॅशनल पॉवर ट्रेनिंग इन्स्टिटय़ूट, नागपूर येथे उपलब्ध असणाऱ्या ट्रान्समिशन अ‍ॅण्ड डिस्ट्रिब्युशन देण्यासाठी खाली नमूद केल्याप्रमाणे पात्रताधारक विद्यार्थी-उमेदवारांकडून प्रवेश अर्ज मागविण्यात येत आहेत.
जागांची संख्या- अभ्यासक्रमासाठी उपलब्ध जागांची संख्या ६० असून यापैकी काही जागा सरकारी नियमांनुसार राखीव आहेत.
आवश्यक शैक्षणिक पात्रता- अर्जदार विद्यार्थ्यांनी इलेक्ट्रिकल, इलेक्ट्रॉनिक अ‍ॅण्ड इलेक्ट्रिकल अथवा इलेक्ट्रिकल पॉवर इंजिनीअरिंग यांसारख्या विषयांतील पदवी परीक्षा चांगल्या शैक्षणिक आलेखासह उत्तीर्ण केलेली असावी.
निवड पद्धती– अर्जदार विद्यार्थ्यांच्या संबंधित पदवी परीक्षेतील गुणांकाच्या आधारे त्यांना अभ्यासक्रमात प्रवेश देण्यात येईल.
अर्जासह पाठवायचे प्रवेश शुल्क- प्रवेश अर्जासह पाठवायचे प्रवेश शुल्क म्हणून उमेदवारांनी १००० रु.चा एनपीटीआय (वेस्टर्न रिजन) नागपूरच्या नावे असणारा व नागपूर येथे देय असलेला डिमांड ड्राफ्ट पाठविणे आवश्यक आहे.
अधिक माहिती व तपशिलासाठी संपर्क- अभ्यासक्रमाच्या संदर्भात अधिक माहिती व तपशिलासाठी एम्प्लॉयमेंट न्यूजच्या १६ ते २२ जुलै २०१६ च्या अंकात प्रकाशित झालेली नॅॅशनल पॉवर ट्रेनिंग इन्स्टिटय़ूट, नागपूरची जाहिरात पाहावी. एनटीपीआयच्या दूरध्वनी क्र. ०७१२-२२२६१७६ वर संपर्क साधावा अथवा इन्स्टिटय़ूटच्या http://www.nptinagpur.com या संकेतस्थळाला भेट द्यावी.
अर्ज पाठविण्याचा पत्ता व शेवटची तारीख- विहित नमुन्यातील संपूर्णपणे भरलेले व आवश्यक ते कागदपत्र आणि डिमांड ड्राफ्टसह असणारे प्रवेश अर्ज प्रिन्सिपॉल डायरेक्टर, नॅशनल पॉवर ट्रेनिंग इन्स्टिटय़ूट, दक्षिण अंबाझरी मार्ग, विश्वेश्वरैया नॅशनल इन्स्टिटय़ूट ऑफ टेक्नॉलॉजीसमोर, गोपाळनगर, नागपूर- ४४०००२२ या पत्त्यावर १९ ऑगस्ट २०१६ पर्यंत पोहोचतील अशा बेताने पाठवावेत.