नॅशनल पॉवर ट्रेनिंग इन्स्टिटय़ूट, नागपूर येथे उपलब्ध असणाऱ्या सहा महिने कालावधीच्या ट्रान्समिशन अ‍ॅण्ड डिस्ट्रिब्युशन सिस्टीम विषयातील विशेष पदविका अभ्यासक्रमाखालीलप्रमाणे प्रवेश उपलब्ध आहेत.

जागांची संख्या व तपशील – अभ्यासक्रमासाठी उपलब्ध जागांची संख्या ६० असून यापैकी काही जागा सरकारी नियमांनुसार राखीव वर्गगटांतील उमेदवारांसाठी राखीव आहेत.

आवश्यक शैक्षणिक पात्रता – अर्जदार विद्यार्थ्यांनी इलेक्ट्रिकल, पॉवर इंजिनीअरिंग, इलेक्ट्रिकल अ‍ॅण्ड इलेक्ट्रॉनिक्स अ‍ॅण्ड पॉवर इंजिनीअरिंग यांसारख्या विषयातील पदवी परीक्षा चांगल्या शैक्षणिक आलेखासह उत्तीर्ण केलेली असावी.

निवड पद्धती – अर्जदारांची वरील पदवी, पात्रता परीक्षेतील गुणांची टक्केवारी व शैक्षणिक आलेखाच्या आधारे त्यांना अभ्यासक्रमात प्रवेश देण्यात येईल.

अर्जासह भरावयाचे शुल्क – अर्जासह भरावयाचे प्रवेश शुल्क म्हणून ५०० रु.चा एनपीटीआय (डब्ल्यूआर) नागपूर यांच्या नावे असणारा व नागपूर येथे देय असलेला डिमांड ड्राफ्ट पाठविणे आवश्यक आहे.

अधिक माहिती व तपशिलासाठी संपर्क- अभ्यासक्रमाच्या संदर्भात अधिक माहिती व तपशिलासाठी प्रमुख वृत्तपत्रात प्रकाशित झालेली नॅशनल पॉवर ट्रेनिंग इन्स्टिटय़ूट नागपूरची जाहिरात पाहावी. दूरध्वनी क्र. ०७१२-२२२६१७६ अथवा २२३६५४५ वर संपर्क साधावा अथवा इन्स्टिटय़ूटच्या  http://www.nptinagpur.com या संकेतस्थळाला भेट द्यावी.

अर्ज पाठविण्याचा पत्ता व शेवटची तारीख- संपूर्णपणे भरलेले व आवश्यक ते कागदपत्र आणि डिमांड ड्राफ्टसह असणारे प्रवेश अर्ज हेड ऑफ दी इन्स्टिटय़ूट, नॅशनल पॉवर ट्रेनिंग इन्स्टिटय़ूट, दक्षिण अंबाझरी मार्ग, गोपाळनगर, व्हीएनआयटीसमोर, नागपूर- ४४००२२ या पत्त्यावर १ नोव्हेंबर २०१७ पर्यंत पोहोचतील अशा बेताने पाठवावेत.

ज्या पदवीधर इंजिनीअर्सना ऊर्जा उद्योग क्षेत्रात विशेष पात्रतेसह आपले करिअर सुरू करायचे असेल अशांनी या अभ्यासक्रमाचा जरूर विचार करावा.