आजच्या लेखामध्ये ‘भूगोल’ या विषयातील ‘प्राकृतिक भूगोल’ या घटकाची परीक्षेच्या दृष्टीने तयारी कशी करावी याची महत्त्वाची माहिती घेणार आहोत. यामध्ये आपण या घटकाचे अभ्यासाच्या दृष्टीने नियोजन कशा प्रकारे करावे, याचबरोबर या घटकावर गेल्या चार मुख्य परीक्षांमध्ये (२०१३-२०१६) कशा स्वरूपाचे प्रश्न विचारण्यात आलेले होते इत्यादी बाबींचा एकत्रित विचार करून प्रस्तुत लेखामध्ये चर्चा करणार आहोत.

अभ्यासक्रमामध्ये ‘जगाचा भूगोल’ असे नमूद केलेले आहे म्हणून ‘प्राकृतिक भूगोला’ची तयारी करताना ‘जगाचा प्राकृतिक भूगोल’ आणि ‘भारताचा प्राकृतिक भूगोल’ अशी सर्वसाधारण विभागाणी करावी लागते. या विषयाचे परीक्षेच्या दृष्टीने अभ्यासाचे नियोजन करताना सर्वप्रथम या विषयामधील घटकाची माहिती असणे महत्त्वाचे असते. प्राकृतिक भूगोलामध्ये मुखत्वे भूरूपशास्त्र, हवामानशास्त्र, सागरशास्त्र, जैविक भूगोल आणि पर्यावरणीय भूगोल यासारख्या घटकांचा समावेश होतो. या सर्व घटकांचे मूलभूत अर्थात पारंपरिक ज्ञान सर्वप्रथम अभ्यासावे लागते. वर नमूद केलेल्या घटकांसंबंधी अभ्यासाव्या लागणाऱ्या संकल्पना, त्यांची वैशिष्टय़े, याची माहिती सर्वप्रथम प्राप्त करणे क्रमप्राप्त ठरते.

girl brother attempt to kidnapped midc police saved abducted youth life
कारमध्ये कोंबून प्रेयसीच्या भावाचे अपहरण….पण,  खुनाचा प्रयत्न करताच….
paris 2024 olympics olympic torch lit in greece
खराब हवामानातही ग्रीसमध्ये ऑलिम्पिक ज्योत प्रज्वलित!
Analysis on Environmental Component in Gazetted Civil Services Joint Pre Examination and State Services Pre Examination
Mpsc मंत्र: पर्यावरण घटक
Government decision not to increase read reckoner for elections
रेडीरेकनर वाढीला निवडणुकीची वेसण; घरांच्या किमती घटणार? रिअल इस्टेटमधील गुंतवणुकीवर काय परिणाम?

प्राकृतिक भूगोल या घटकावर २०१३ मध्ये चार, २०१४ मध्ये पाच, २०१५ मध्ये सहा आणि २०१६ मध्ये पाच प्रश्न विचारण्यात आलेले होते. आत्ता आपण या घटकांवर विचारण्यात आलेल्या काही प्रश्नांची थोडक्यात चर्चा करणार आहोत.

२०१३ मध्ये ‘भूखंड अपवहन सिद्धांतद्वारे तुम्हाला नेमके काय समजते? याच्या समर्थनार्थ प्रमुख पुराव्यानिशी चर्चा करा.’ असा प्रश्न विचारण्यात आलेला होता. या प्रश्नाचा मुख्य रोख हा ‘भूखंड अपवहन सिद्धांता’वर आहे आणि हा प्रश्न योग्य पद्धतीने समजून घेण्यासाठी हा सिद्धांत नेमका काय आहे, या सिद्धांताची मांडणी कोणी केली आणि यामध्ये नेमक्या कोणत्या प्राकृतिक घडामोडीची चर्चा करण्यात आलेली आहे, अशा विविधांगी पलूंचा विचार करणे आवश्यक आहे. त्यानंतरच या प्रश्नाचे उत्तर लिहिणे अपेक्षित आहे.

२०१४ मध्ये, ‘हिमालयातील हिमनद्यांमध्ये होणारी घट आणि भारतीय उपखंडामध्ये जागतिक तापमानवाढीच्या लक्षणाचा संबंध उघड करा.’ हा प्रश्न विचारण्यात आलेला होता. हिमनदी म्हणजे काय याची निर्मिती कशी झालेली आहे, अशा प्रकारच्या नद्या हिमालय पर्वतरांगामध्येच का आहेत? याची  मूलभूत माहिती या प्रश्नाचे आकलन होण्यासाठी लागते. मात्र या प्रश्नाचा मुख्य कल हा एका विशिष्ट प्रक्रियेशी म्हणजे जागतिक तापमानवाढीशी जोडण्यात आलेला आहे. जागतिक तापमानवाढीमुळे या हिमनद्यांमध्ये कशी घट होत आहे, याची पुराव्यानिशी चर्चा करून या प्रश्नाचे उत्तर आपणाला लिहावे लागते.

२०१५ मध्ये, ‘आíक्टक समुद्रामध्ये शोधण्यात आलेल्या खनिज तेलाचे आíथक महत्त्व काय आहे आणि याचे संभाव्य पर्यावरणीय परिणाम काय असू शकतात?’ असा प्रश्न विचारण्यात आलेला होता. आíक्टक समुद्राचे भौगोलिक स्थान काय आहे आणि याचा पृथ्वीच्या वातावरणावर नेमका काय परिणाम होतो याची सर्वप्रथम माहिती असणे गरजेचे आहे. याच्यानंतर आíक्टक समुद्रामधील खनिज तेलाचे आíथक महत्त्व कळायला हवे. सद्य:स्थितीत  विविध देशांची ऊर्जेची गरज भागवण्यासाठी ते महत्त्वाचे आहे. आíक्टक समुद्रावर आधिपत्य असणाऱ्या देशांना याचा होणारा आíथक लाभ लक्षात घ्यायला हवा. या खनिज तेलाचे उत्पादन करताना समुद्रात केले जाणारे उत्खनन आणि यामुळे येथील प्रदेशाच्या भौगोलिक रचनेत होणारा बदल, त्यांचा येथील पर्यावरणावर होणारा परिणाम अशा विविधांगी बाबींचा एकत्रित विचार केल्याशिवाय या प्रश्नाचे योग्य उत्तर लिहिता येऊ शकत नाही.

२०१६ मध्ये, ‘हिमालय पर्वतामधील दरडी कोसळण्याचे प्रमाण अधिक का आहे?,’ ‘परिणामकारकरीत्या केलेले जमीन आणि पाणी व्यवस्थापन हे मानवी विपत्ती कमी करू शकते,’ ‘दक्षिण चिनी समुद्राचे भूराजकीय महत्त्व,’ ‘भारतातील प्रमुख शहरांमधील पुरांची समस्या,’यासोबतच  ‘भारतातील अंतर्गत जल वाहतूक व समस्या’ इत्यादी मुद्दय़ांवर प्रश्न विचारण्यात आलेले होते.

उपरोक्त प्रश्नांचे विश्लेषण केल्यास असे दिसून येते की, पर्यावरण आणि हवामान संबंधित घटकांवर अधिक प्रश्न विचारले गेलेले आहेत. याचबरोबर प्रश्न विचारताना या विषयाचे पारंपरिक ज्ञान, यातील महत्त्वाच्या संकल्पना तसेच यासंबंधी घडणाऱ्या चालू घडामोडींचा एकत्रित वापर केलेला दिसून येतो. यातील बहुतांशी प्रश्न भारत व जगाच्या प्राकृतिक घडामोडीच्या पाश्र्वभूमीचा एकत्रित वापर करून विचारण्यात आलेले आहेत. म्हणून प्राकृतिक भूगोलाच्या र्सवकष तयारीबरोबरच चालू घडामोडींचा अभ्यास करावा लागतो. थोडक्यात अभ्यासक्रमामध्ये नमूद घटकाच्या आधारे या प्रश्नांची विभागणी   व अभ्यासाची दिशा निर्धारित करावी. याचबरोबर महत्त्वाची बाब म्हणजे प्रश्न विचारण्याचा कल हा केव्हाही बदलला जाऊ शकतो, त्यामुळे हा घटक र्सवकष आणि सखोल पद्धतीने अभ्यासणे अपरिहार्य ठरते.

या घटकाची मूलभूत माहिती सर्वप्रथम अभ्यासावी. यासाठी आपणाला एनसीईआरटीच्या Fundamentals of Physical Geography (XI), Indian Physical Environment (XI), या क्रमिक पुस्तकाचा आधार घेता येतो, ज्यामुळे या विषयाचे सरळ व सोप्या भाषेत आकलन करता येऊ शकते आणि या माहितीला विस्तृत करण्यासाठी  Certificate Physical and Human Geography(by Goe Cheng Leong), Fundamentals of Physical Geography (by Majid Husain), India – Comprehensive Geography( by D.R. Khullar), World Geography (by Majid Husain) या संदर्भग्रंथाचा आधार घेता येतो. या विषयाच्या स्वत:च्या नोट्स तयार कराव्यात. स्वत:च्या अभ्यासाची तयारी कितपत झालेली आहे यासाठी उत्तर लेखनाचा सराव करावा, त्याचे  मूल्यमापन करून घ्यावे. ज्यामुळे यातील उणिवा दूर करून अधिक नेमकेपणाने उत्तरे लिहिण्याचा सराव करता येतो. सोबतच चांगले गुणही प्राप्त करता येऊ शकतात. तसेच महत्त्वाची बाब म्हणजे हा घटक आपणाला सामान्य अध्ययनासाठी तयार करायचा आहे, याचे भान ठेवणे आवश्यक आहे. त्यामुळे नोट्स तयार करताना त्यातील समर्पकता आणि महत्त्वाच्या मुद्दय़ांचाच अंतर्भाव असणे अधिक श्रेयस्कर ठरते. यापुढील लेखामध्ये आपण ‘मानवी भूगोल’ या घटकाची चर्चा करणार आहोत.