औषधनिर्माणशास्त्रातील शैक्षणिक अर्हतेनुसार उपलब्ध असलेल्या करिअरच्या नवनव्या संधींविषयी..
मागील लेखात औषधनिर्माणशास्त्रातील पदवी, पदविका आणि पदव्युत्तर अभ्यासक्रमांची ओळख करून घेतली. त्याचबरोबर या क्षेत्राशी निगडित काही करिअर संधीही जाणून घेतल्या. आज आपण औषधनिर्माणशास्त्रात वेगाने विस्तारणाऱ्या काही करिअर संधींचा मागोवा घेऊयात..
विक्री व विपणन : विक्री विभागात मेडिकल रिप्रेझेंटेटिव्ह म्हणून रुजू झाल्यानंतर विभागीय तसेच राष्ट्रीय पातळीवरील व्यवस्थापक या पदापर्यंत पोहोचण्याची उत्तम संधी असते. औषधाच्या एखाद्या उत्पादनाच्या मार्केटिंगसाठी स्ट्रॅटेजिक प्लॅिनग करणे, त्यासाठी टीम तयार करणे, विक्री वाढवणे, औषधाचे किरकोळ दुकानात आणि घाऊक दुकानात वितरण करणे, अथवा एखाद्या उत्पादनासाठी ग्रामीण व शहरी विभागात पुरवठा साखळी अथवा लॉजिस्टिकचा अभ्यास करणे, कोल्ड स्टोअरेजसंबंधी विशेष कार्यप्रणाली तयार करणे व योग्य वेळेत औषधे, डॉक्टर व रुग्ण यांच्यापर्यंत पोहोचतील याची दक्षता घेणे.
बीफार्म, एमफार्म पदवी प्राप्त केल्यानंतर सात ते दहा वर्षांच्या अनुभवानंतर ब्रॅन्ड मॅनेजमेंट, प्रॉडक्ट मॅनेजमेंट, मार्केटिंग मॅनेजमेंट, मार्केट रिसर्च, बिझनेस डेव्हलपमेंट या विभागात आपण तज्ज्ञ मार्गदर्शकाचे काम
करू शकता.
अध्यापन : अध्यापन क्षेत्रात करिअर घडविण्यासाठी फार्मसी साहाय्यक प्राध्यापक या पदावर रुजू होता येईल आणि अनुभवानंतर सहयोगी प्राध्यापक, प्राध्यापक तसेच प्राचार्य किंवा संचालक या पदापर्यंत बढती मिळू शकते. वैद्यकीय महाविद्यालयात फार्मसी डिपार्टमेन्ट तसेच औषधीशास्त्र विभागात- सादरीकरण अथवा अध्यापनाचेही काम करता येईल.
कॉर्पोरेट कम्युनिकेशन : प्रत्येक औषधी कंपन्यांमध्ये अलीकडे ‘कॉर्पोरेट कम्युनिकेशन’ हा विभाग असतो. बीफार्म करून पत्रकारितेसोबत जनसंपर्कची पदविका घेतली तर या विभागात ‘पीआरओ’ म्हणून नेमणूक होऊ शकते. पीआरओ हा त्या कंपनीचाच चेहरा असतो. स्वयंसेवी संस्था अथवा हेल्थेकअर संस्थेतदेखील ‘पीआरओ’ म्हणून काम करता येते.
संदर्भ ग्रंथालय : ‘ बीफार्म’नंतर लायब्ररी सायन्स अथवा पत्रकारितेसारखा अभ्यासक्रम पूर्ण केल्यानंतर आरोग्य आणि वैद्यकीय विषयातील टेक्निकल मेडिकल कंटेंट रायटिंग, र्पिोटर, एडिटर म्हणून काम करू शकता. वरील विषयातील शैक्षणिक संशोधनपर जर्नल्स, मासिके, वर्तमानपत्रे इतर डेटाबेस साहित्य तयार करण्यास मदत करणे, ऑनलाइन माहिती गोळा करणे, त्याचे संपादन करणे व संशोधन व विकास अथवा क्लिनिकल रिसर्च, क्लिनिकल ट्रायल अथवा मार्केटिंग विभागाला पाठवणे हे काम करता येते अथवा वर्तमानपत्रांच्या प्रसिद्धी विभागातही काम करता येते.
सीआरओ : क्लिनिकल रिसर्च ऑर्गनायझेशनमध्ये औषधाच्या क्लिनिकल चाचणीचे काम चालते. जागतिक व्यापार संघटनेच्या पेटंट धोरणाशी भारत २००५ पासून बांधील आहे. नवे औषध बाजारात आणण्यापूर्वी त्याला अनेक सुरक्षाविषयक तसेच गुणकारकतेच्या चाचण्यांना सामोरे जावे लागते. क्लिनिकल रिसर्चमध्ये साध्या चाचण्यांपासून औषधी गुणांचा व कार्यक्षमतेचा तुलनात्मक अभ्यास, रोगनिदानातील, उपाययोजनेतील तसेच प्रतिबंधक उपायांची दरनिश्चिती, जोखीमेचे सर्वेक्षण करणे, औषधाच्या वापराबाबत नियम ठरवणे, आदी गोष्टींचा समावेश असतो. या चाचण्या प्रथम प्राण्यांवर व नंतर मानवावर केल्या जातात. नवीन औषधासाठी कराव्या लागणाऱ्या चाचण्या लवकर आणि अधिकवेळा करणे आवश्यक असते. पाश्चात्य देशांच्या तुलनेत भारतात या चाचण्यांना खर्च कमी येत असल्याने देशामध्ये क्लिनिकल रिसर्च सेंटरची संख्या वाढत आहे. रुग्णांची मोठी संख्या, उत्तम डॉक्टर, उत्तम वैद्यकीय सुविधा, आदी गोष्टींमुळे क्लिनिकल रिसर्च या क्षेत्रात आपल्याकडे मोठय़ा प्रमाणावर करिअर संधी उपलब्ध आहेत. त्या पुढीलप्रमाणे आहेत- संशोधक, नियंत्रक, निरीक्षक/क्लिनिकल रिसर्च असोसिएट, डेटा मॅनेजमेंट, साइट-को-ऑíडनेटर, ऑडिटिंग अँड इन्स्पेक्शन.
वैद्यकीय क्षेत्रात आता डॉक्टरांइतकेच व्यवस्थापनालाही महत्त्व प्राप्त झाले आहे. रुग्णालयात बिझनेस डेव्हलपमेंट, मनुष्यबळ विकास आणि आíथक व्यवस्था, दर निश्चिती, दर्जा नियमन, ग्राहकसेवा विभाग, स्टोअर विभाग, औषधांची खरेदी-विक्री व नोंदर्णी, सुरक्षा विभाग असे विविध विभाग असतात. क्लिनिकल, वैद्यक, औषधनिर्माण यांसारख्या वेगवेगळ्या विषयांवर जगभरात संशोधनाचे अहोरात्र काम सुरू असते. अशा विभागात बीफार्म, एमफार्म, पीएच.डी झालेल्या उमेदवारांना मोठय़ा संधी
मिळू शकतात.
कॉन्ट्रॅक्ट मॅन्युफॅक्चरिंग : अर्थात दुसऱ्या कंपनीत औषध तयार करून घेणे. त्याकरता औषध निर्मितीसाठीचे संबंधित प्रोटोकॉल तयार करणे, कायदेशीर करार करणे आणि कंपनीमधून दर्जेदार औषधे तयार करणे यांसारख्या कामांची जबाबदारी पार
पाडता येते.
जैव-तंत्रज्ञान संस्था : सध्या देशात जैव-तंत्रज्ञान शाखेत प्राणिशास्त्र, मानवी आरोग्य संबंधित संशोधन केले जाते. यांत दुर्धर आजारावर दर्जेदार आणि माफक दरात औषधे तयार करणे, रोगशास्त्राशी निगडित निदान पद्धती तयार करणे यांचा समावेश आहे. सेरि-कल्चर, पर्ल-कल्चर, अ‍ॅपी-कल्चर, जेनेटिक्स, वनस्पतीशास्त्र (बी, बियाणे, भाजीपाला व फळ-फुले यांच्या नवीन जाती व प्रजाती) विषयक संशोधन तसेच आधुनिक विश्लेषणाच्या पद्धतीचा अभ्यास केला जातो. नवीन उत्पादन निर्मिती क्षेत्रातही फार्मसीचे विद्यार्थी उत्तम काम करू शकतात.
औषधनिर्माण यंत्रसामग्री : या विषयात औषध निर्मितीसाठी वेगवेगळ्या यंत्रसामग्रीची आवश्यकता असते. त्या विभागातील तांत्रिक/अभियांत्रिकीचा अभ्यास करून विक्री अथवा निर्मिती विभागात कामाच्या संधी उपलब्ध आहेत.
एमबीए : बीफार्मनंतर एमबीए अथवा अ‍ॅडव्हान्स/ पी.जी. डिप्लोमा इन फार्मास्युटिकल बिझनेस मॅनेजमेंट हा ‘एमएसबीटीई’चा अल्पकालीन अभ्यासक्रम करून औषधनिर्मिती कंपनीच्या व्यवस्थापन विभागात विक्री, विपणन, वित्त, लॉजिस्टिक, मनुष्यबळ विकास आणि इतर विभागांत काम करता येते. व्यवस्थापन विषयक शिक्षण उद्योगधंद्याच्या वाढीस सहाय्यकारी ठरते. छोटय़ा-मोठय़ा औषध निर्मितीशी निगडित असलेले उद्योग, आयुर्वेद, होमियोपॅथी अथवा रुग्णालयातील कामे येथेही कामाच्या मोठय़ा संधी उपलब्ध आहेत.
रुग्णालय व्यवस्थापन : देशात सध्या पंचतारांकित रुग्णालये व नìसग होम्स विकसित होताना दिसतात. बी.फार्मनंतर हॉस्पिटल मॅनेजमेंटची पदविका अथवा पदवीनंतर पदवी घेऊन रुग्णालयाच्या फार्मसी, खरेदी तसेच इतर विभागांत कनिष्ठ व्यवस्थापकापासून मुख्य कार्यकारी अधिकारी पदापर्यंत कामाच्या अनेक संधी मिळू शकतात.
कायद्याचा अभ्यास : बी.फार्म.नंतर कायदे शिक्षणातील एलएलबी अथवा पी.जी. डिप्लोमा इन पेटंट अथवा लेबर लॉ करून औषध निर्मिती कंपनीमध्ये मनुष्यबळ विकास तसेच कायदा विभागात काम करता येईल तसेच प्रत्यक्षात मेडिको लीगल केससंबंधी कोर्टात केस लढता येईल.
बौद्धिक संपदा विभाग : वेगवेगळ्या मानकांनुसार माहिती गोळा करणे, ती सिद्ध करणे, त्याचा पेटंटविषयक दस्तावेज निर्माण करणे, विविध करार करणे, सल्लामसलत करणे यांसारख्या कामाच्या संधी
उपलब्ध आहेत.
वैद्यकीय पर्यटन : आपल्या देशात वैद्यकीय सोयीसुविधा दर्जेदार आणि किफायतशीर दरात उपलब्ध असल्याने वैद्यकीय उपचारासाठी परदेशांतून भारतात येणाऱ्यांचे प्रमाण मोठे आहे. या क्षेत्रात पासपोर्ट, व्हिसा, विमा कंपन्या (राष्ट्रीय/आंतरराष्ट्रीय), पर्यटन मंत्रालय, राज्य व केंद्र सरकारचे विभाग आणि बँका यांच्यासोबत काम करणे, परदेशी वकिलातींच्या संपर्कात राहणे आणि रुग्णालयातील रुग्णांची आणि त्यांच्यासोबत असणाऱ्या व्यक्तींची वरील कामे नियोजन पद्धतीने पार पडण्याकरता मोठय़ा मनुष्यबळाची आवश्यकता असते. याकरता बी.फार्म नंतर टुरिझम मॅनेजमेंटची पदविका अथवा पदवीनंतर पदवी घेऊन काम करता येईल. रुग्णालयातील आरक्षण तसेच प्रवासाचे आरक्षण, प्रेक्षणीय स्थळे पाहण्यासाठीचे नियोजन, इमिग्रेशन, कस्टम सेवा, टूर ऑपरेटर्स, एअरलाईन्स सेवा, हॉटेल उद्योग तसेच औषधाच्या संदर्भात प्रवासातील ट्रीटमेंट प्रोटोकॉल तयार करणे, मोबाइल फोनद्वारे अथवा इतर संवाद व्यवस्थेद्वारे रुग्णांशी संपर्क ठेवणे यांसारखी कामे करता येतात.
विमा क्षेत्र : विमा क्षेत्रात बी.फार्म झालेल्यांना उत्तम मागणी आहे. विक्री आणि विपणन विषयक नियोजन करणे, शहरी आणि ग्रामीण भागात आवश्यकतेनुसार अथवा त्यांच्या गरजांनुसार विमा विभागात विविध जबाबदाऱ्या सांभाळता येतील.
इन्व्हेंट मॅनेजमेंट : रुग्णालय, वैद्यकीय महाविद्यालये, विद्यापीठ, औषध तसेच आरोग्य क्षेत्रात विविध प्रशिक्षण उपक्रम राबवले जातात. वैद्यक परिषदा, कार्यशाळा, परिसंवाद अशा प्रकारच्याइव्हेंट्सच्या आयोजनाविषयीची सर्व कामे करण्याकरता योग्य व्यक्तींची आवश्यकता असते. बीफार्म पदवी प्राप्त विद्यार्थ्यांनी इव्हेंट मॅनेजमेंट अभ्यासक्रम पूर्ण करून आरोग्य क्षेत्रातील विविध उपक्रमाच्या आयोजनाची जबाबदारी त्यांना पार पाडता येईल.
परदेशातील करिअर संधी : परदेशात एमएस, पीएचडी, पोस्ट डॉक्टरेटदेखील करता येते. तेथील स्टेट कौन्सिलमध्ये कम्युनिटी अथवा हॉस्पिटल फार्मासिस्ट म्हणून काम करण्यासाठी ऑनलाइन परीक्षा उत्तीर्ण व्हावी लागते. प्रत्येक राज्यासाठी वेगवेगळ्या परीक्षा पद्धती अस्तित्वात असतात. अमेरिका, कॅनडा, इंग्लंड, फ्रान्स, जर्मनी, ऑस्ट्रेलिया, मलेशिया, सिंगापूर, जपान यांसारख्या देशांतील फार्मसी क्षेत्रांत मुबलक संधी उपलब्ध आहेत.
(उत्तरार्ध)
careershedge@gmail.com

mhaisal yojana marathi news, mhaisal project sangli marathi news, mhaisal sangli jat taluka water issue marathi news
जतमध्ये पाण्यावरून राजकीय श्रेयवाद उफाळून आला
Thieves stole AC from medical
यांचा काही नेम नाही! नागपुरातील मेडिकलच्या शल्यक्रिया गृहातून चोरट्यांनी एसी पळवले…
Index Sensex falls to 73 thousand level print eco news
नफावसुलीमुळे ‘सेन्सेक्स’ ३५२ अंश माघारी
UPSC Preparation Facing the Prelims Exam
यूपीएससीची तयारी: पूर्व परीक्षेला सामोरे जाताना..