देशातील किंवा जगातील घटनांचा शास्त्रीय पद्धतीने आढावा घेणारी कला शाखा म्हणजे राज्यशास्त्र. चंद्रगुप्त मौर्य आणि आर्य चाणक्य यांच्या काळापासून भारतात राज्यशास्त्राचा अभ्यास होत आला आहे. आजही जगभरातील अनेक भू-राजकीय विचारवंत चाणक्याच्या ‘अर्थशास्त्र’ या ग्रंथाचा सखोल अभ्यास करतात. भारताप्रमाणेच चीनमधील त्सुन त्झु याचा ‘युद्ध कला’ हा ग्रंथही राजधर्मासाठी प्रमाण मानला जातो. चीनच्या आजच्या काळातील राजकीय प्रगतीला याच ग्रंथातील अनेक सिद्धांताचा आधार असल्याचे तज्ज्ञांचे म्हणणे आहे. युद्धकारण, राजकारण आणि अर्थकारण या तीन बाबतीत अग्रेसर असलेले राष्ट्र वेगाने प्रगती करू शकते, असा विश्वास अनेकांना वाटतो. म्हणूनच राज्यशास्त्राचा अभ्यास मोलाचा ठरतो.

राज्यशास्त्रातील करिअरच्या संधी 
स्पर्धा परीक्षा

A proposal that Chhagan Bhujbal should contest elections from Nashik from BJP
‘कमळ’वर लढण्याचा भुजबळ यांना प्रस्ताव? ओबीसी मतपेढीसाठी भाजप पक्षश्रेष्ठींची खेळी
mpsc mantra study current affairs State National International Level Events
mpsc मंत्र: चालू घडामोडी अभ्यासाचा ‘आधार’
readers reaction on loksatta editorial
लोकमानस : आता कोठे हरवली भाजपची नैतिकता?
Priyadarshni Rahul
हुंड्याविरोधात असाही लढा! लग्न मोडल्यानंतर तिने घडवली ‘अशी’ अद्दल, कायद्याचा अभ्यास अन् १४ वर्षे लढा!

राज्यशास्त्र या विषयाचा पदवी अभ्यासक्रम किंवा पदव्युत्तर अभ्यासक्रम शिकतानाच तुमची स्पर्धा परीक्षेची तयारी होऊन जाते. त्यामुळे या परीक्षा देण्यासाठी इच्छुक विद्यार्थी राज्यशास्त्राचा अभ्यास आवर्जून करतात. मास्टर्सच्या अभ्यासक्रमात आता आपल्या आवडीचे विषय निवडण्याची संधी विद्यार्थ्यांना मिळते.

राजकीय सल्लागार

वाढत्या स्पर्धेत टिकण्यासाठी राजकीय पक्षांना तसेच नेत्यांना वेळोवेळी राजकीय सल्ल्याची गरज भासते. संसदेत किंवा विधान मंडळात एखादा प्रश्न उपस्थित करायचा झाल्यास, एखादी समस्या मांडायची झाल्यास संविधानातील तरतुदींचा अभ्यास करूनच ती मांडावी लागते. एखाद्या समस्येवर शास्त्रीय पद्धतीने उपाय शोधण्यासाठी त्यातील जाणकार व्यक्तींचे ज्ञान मोलाचे ठरते. म्हणूनच अनेक नेते आजकाल राजकीय सल्लागारांची नियुक्ती करतात. सोशल मीडिया मार्केटिंगच्या जमान्यात अशा जाणकार व्यक्तींना सर्वच राजकीय पक्षांतून मोठय़ा प्रमाणात मागणी आहे.

स्वयंसेवी संस्था

भारतीय समाजाइतकीच गुंतागुंतीची आहे भारतीय व्यवस्था. त्यामुळेच येथील सामाजिक आणि राजकीय समस्यांवर काम करणाऱ्या स्वयंसेवी संस्थांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. राजकीय ज्ञान वाढवणे, जनता आणि नेते यांच्यात संवाद निर्माण करणे अशी अनेक कामे या संस्था करत असतात. राजकीय घडामोडीचे शास्त्रीय ज्ञान असणाऱ्या व्यक्ती या संस्थांना गरजेच्या असतात. अगदी ग्रामपंचायत, महापालिका ते थेट संसदीय पातळीवर अशा अनेक संस्था आज देशभर कार्यरत आहेत.

थिंक टँक (विचार गट)

राज्यशास्त्रात आंतरराष्ट्रीय संबंध ही एक महत्त्वाची शाखा मानली जाते. याच घडामोडींचा आणि संबंधांचा अभ्यास करणाऱ्या अनेक संस्था जगभरात काम करत असतात. पाश्चात्त्य राष्ट्रांत या संस्थांचे मोठे प्रस्थ आहे. यातील अनेक गट हे त्या त्या देशातील सरकारांना सल्ला देण्याचे काम करतात. संशोधन आणि योजना निर्मिती ही दोन मुख्य कामे या विचार गटांमध्ये केली जातात. मुंबईत किंवा महाराष्ट्रात तुलनेने या विचार गटांची संख्या आज तरी मर्यादित आहे. पण नवी दिल्लीत मात्र अनेक विचार गट आहेत ज्यात राज्यशास्त्रातील पदव्युत्तर अभ्यासक्रम केलेल्या किंवा पीएच.डी. मिळवलेल्या व्यक्तींना मोठय़ा प्रमाणात संधी उपलब्ध आहेत.

कॉर्पोरेट राजकीय विश्लेषक

आपल्यातील बऱ्याच जणांना कल्पना नसते की अनेक बहुराष्ट्रीय कंपन्यांनाही राजकीय विश्लेषकांची गरज असते. वाढत्या जागतिकीकरणाच्या आणि उदारीकरणाच्या काळात अनेक कॉर्पोरेट कंपन्या जगभर विस्तार करत आहेत. या काळात जगाच्या सर्व खंडांमध्ये करोडो डॉलर्सची गुंतवणूक त्यांना करावी लागते. यातील कोणते देश, राज्य आणि तेथील राजकीय परिस्थिती गुंतवणूक करण्यासाठी अनुकूल आहे, याचा अभ्यास या कंपन्या सतत करत असतात. त्यासाठी या बहुराष्ट्रीय कंपन्या राजकीय सल्लागार किंवा विश्लेषकांची नेमणूक करत असतात.

सेफॉलोजी (निवडणूक शास्त्र)

अंकशास्त्राची जोड देऊन निवडणुकांचा शास्त्रोक्त पद्धतीने अभ्यास करणाऱ्या  शास्त्राला सेफॉलोजी असे म्हणतात. निवडणूकपूर्व चाचण्या करणाऱ्या अनेक संस्था, त्यांचे निकाल, विश्लेषण आपण दूरदर्शनवर नेहमीच पाहतो. या संस्थांना मिळणाऱ्या निधीतही आजकाल बऱ्याच प्रमाणात वाढ झाल्याचे चित्र आहे. इतकेच नव्हे तर अनेक राजकीय पक्ष वेळोवेळी आपला प्रभाव तपासण्यासाठी अंतर्गत सर्वेक्षण करत असतात. यासाठी ते स्वत:च सेफिलॉजिस्टची नियुक्ती करतात. ग्रामीण निवडणुकांपासून ते संसदीय निवडणुकांचा अभ्यास, त्यातील धार्मिक, जातीय आणि वांशिक समीकरणांचा अभ्यासही ही मंडळी करतात. पण दुर्दैवाने भारतात हे शास्त्र शिकवणाऱ्या फारशा संस्था अस्तित्वात नाहीत.

राजकीय पत्रकारिता

पत्रकारांना एखाद्या विषयाचं सखोल ज्ञान असण्याची आवश्यकता असते. पत्रकारितेच्या विश्वात राजकीय पत्रकारांचे महत्त्व अनन्यसाधारण आहे. यातील बरेचसे पत्रकार हे राजकारणाचा अभ्यास केलेले असतात. घटनेतील तरतुदी आणि काही तांत्रिक बाबींचे मूलभूत ज्ञान असणे ही किमान आवश्यकता आहे. अनेक राजकीय पत्रकार नोकरी करता करताच दूरस्थ विभागातून या विषयातील पदवी अथवा पदव्युत्तर शिक्षण घेतात.

याशिवाय, अनेक राज्यांच्या मंत्रालयांत आणि विविध सरकारी विभागांत, मानवाधिकार आयोगात राज्यशास्त्राची पदवी असलेल्या पदवीधारकांना विविध पदांसाठी संधी मिळतात. धोरण आखणीच्या कामात या व्यक्ती फार महत्त्वाची भूमिका पार पाडतात.

शिक्षण संस्था

महाराष्ट्रात सावित्रीबाई फुले विद्यापीठ, पुणे, मुंबई विद्यापीठ यांचे राज्यशास्त्र विभाग नावाजलेले आहेत. तर राष्ट्रीय पातळीवर जवाहरलाल नेहरू विद्यापीठ, दिल्ली विद्यापीठ, हैदराबाद विद्यापीठ यांच्या राज्यशास्त्र विभागांत प्रवेशासाठी मोठी मागणी आहे.