वैद्यकीय क्षेत्रात डॉक्टरांइतकेच महत्त्व असते रुग्णांच्या शुश्रूषेला. पॅरामेडिकल स्टाफ यामध्ये काम करतो. त्यामुळे आरोग्य क्षेत्राचा हा कणाच म्हणायला हवा. या मनुष्यबळाला तंत्रशुद्ध प्रशिक्षण देण्यासाठी राज्य सरकारने पॅरामेडिकल अभ्यासक्रम सुरू केला आहे.

सध्या पॅरामेडिकल अभ्यासक्रमाच्या विविध केंद्रांत कार्डियोलॉजी, ब्लड ट्रान्सफ्युजन, ऑप्टोमेटरी, प्लास्टर, परफ्युजनिस्ट, ऑपरेशन थिएटर, एन्डोस्कोपी, कम्युनिटी मेडिसिन, हेल्थ इन्स्पेक्टर, रेडिओग्राफी, रेडिओथेरपी, फॉरेन्सिक मेडिसिन आदी अभ्यासक्रम चालविण्यात येतात. रुग्णांच्या आजारांचे निदान, त्यावरील उपचार आणि रुग्णांना आजाराशी सामना करण्यासाठी मानसिक आधार देण्याचे काम हा पॅरामेडिकल स्टाफ करतो आणि ते आरोग्यसेवा (हेल्थ केअर) या क्षेत्रात मोडते. अधिक माहितीसाठी संकेतस्थळ – www.dmer.org.

lighting on trees for decoration, lighting on trees thane marathi news
ठाणे, कल्याण- डोंबिवली, मिरा भाईंदरमध्ये वृक्षांचा गळा घोटण्याचे कार्य सुरूच, उच्च न्यायालयाच्या नोटीस नंतरही शहरात वृक्षांवर विद्युत रोषणाई
Vidya Prabodhini students from Kolhapur top in the UPSC final result
युपीएससीमध्ये कोल्हापूरचा झेंडा; विद्या प्रबोधिनीच्या विद्यार्थांची अंतिम निकालात बाजी
Tungareshwar Protected Forest is in danger
तुंगारेश्वरचे संरक्षित वन धोक्यात, पर्यावरणदृष्ट्या संवेदनशील क्षेत्रात प्रदूषणकारी कारखाने व अतिक्रमण
mumbai IIT
मुंबई आयआयटीचे ३६ टक्के विद्यार्थी ‘कॅम्पस प्लेसमेंट’च्या प्रतीक्षेत

वैद्यकीय सरकारी रुग्णालये, वैद्यकीय शासकीय आणि खासगी वैद्यकीय महाविद्यालये आणि रिसर्च सेंटरमध्ये २ वर्षे पदविका आणि ३ वर्षे पदवी अभ्यासक्रम शिकविले जातात.

पॅरामेडिकल तंत्रज्ञ बनण्यासाठी आवश्यक कौशल्ये –

वेळेचे योग्य नियोजन आणि निरनिराळ्या परिस्थितीत काम करण्याची तयारी.

संधी – प्रोस्थेटिक थेरपिस्ट, ऑक्युपेशनल थेरपिस्ट, लॅब टेक्निशिअन, स्पीच थेरपिस्ट, रेडिओग्राफी, फिजिओथेरपिस्ट म्हणून सरकारी आणि खासगी रुग्णालय, इ. ठिकाणी नोकरीची संधी.

 

  • काही अभ्यासक्रम

अनेक वैद्यकीय महाविद्यालयांमध्ये, पॅरामेडिकलचे वेगवेगळे अभ्यासक्रम शिकवले जातात. ते प्रमाणपत्र, पदवी, पदविका आणि प्रगत पदविका प्रकारचे आहेत. विज्ञान शाखेतून बारावी केल्यानंतर पूर्णवेळ आणि बीएस्सीचे शिक्षण घेता घेता अर्धवेळ स्वरूपात करता येतात.

पोस्ट ग्रॅज्युएट प्रोग्रॅम इन हॉस्पिटल अ‍ॅण्ड  हेल्थ केअर मॅनेजमेंट

शैक्षणिक अर्हता – १२ वी सायन्स फिजिक्स, केमिस्ट्री आणि बायोलॉजी या विषयांसह उत्तीर्ण, कालावधी – १ वर्ष.

डिप्लोमा इन मेडिकल अ‍ॅनेस्थेशिया अ‍ॅण्ड क्रिटिकल केअर टेक्नॉलॉजी 

शैक्षणिक अर्हता – १२ वी सायन्स फिजिक्स, केमिस्ट्री आणि बायोलॉजी या विषयांसह उत्तीर्ण, कालावधी – २ वर्षे (पूर्णवेळ)

डिप्लोमा इन मेडिकल इमेजिंग टेक्नॉलॉजी

शैक्षणिक अर्हता –  १२ वी सायन्स

फिजिक्स, केमिस्ट्री आणि बायोलॉजी या विषयांसह उत्तीर्ण,

कालावधी – २ वर्षे

डिप्लोमा इन रेनल डायलिसिस

शैक्षणिक अर्हता – १२ वी सायन्स फिजिक्स, केमिस्ट्री आणि बायोलॉजी या विषयांसह उत्तीर्ण, कालावधी – २ वर्षे

डिप्लोमा इन मेडिकल लॅब टेक्नॉलॉजी

शैक्षणिक अर्हता – अर्हता – १२ वी सायन्स फिजिक्स, केमिस्ट्री आणि बायोलॉजी या विषयांसह उत्तीर्ण.

कालावधी – २ वर्षे

डिप्लोमा इन मेडिकल इमर्जन्सी सव्‍‌र्हिसेस

शैक्षणिक अर्हता – १२ वी सायन्स फिजिक्स, केमिस्ट्री आणि बायोलॉजी या विषयांसह उत्तीर्ण, कालावधी – २ वर्षे

 

  • प्रशिक्षण देणाऱ्या संस्था

ग्रँट मेडिकल सायन्स आणि जे जे ग्रुप ऑफ हॉस्पिटल्स –

जे. जे. मार्ग, नागपाडा, मुंबई सेंट्रल, मुंबई- ४००००८.

संकेतस्थळ  – http://www.gmcjjh.org

जी एस मेडिकल कॉलेज (के ई एम हॉस्पिटल)-

जेरबाई वाडिया रोड, आचार्य धोंडे मार्ग, परळ, मुंबई – ४०० ०१२

संकेतस्थळ – http://www.kem.edu/

कोहिनूर कॉलेज ऑफ पॅरामेडिकल सायन्स –

कोहिनूर एज्युकेशन कॉम्प्लेक्स, कोहिनूर सिटी, किरोळ रोड, एल बी एस मार्ग, कुर्ला (पश्चिम), मुंबई ४०००७०.

संकेतस्थळ –  http://kcps.ac.in

आम्र्ड फोर्स मेडिकल कॉलेज –

आम्र्ड फोर्स मेडिकल कॉलेज, पुणे -४११०४०.

संकेतस्थळ – afmc.nic.in