औषधनिर्माणशास्त्राच्या पदवीधर व पदव्युत्तर विद्यार्थ्यांना रोजगाराच्या पारंपरिक संधींसह आता नव्या संधीही उपलब्ध होत आहेत. त्यात फार्माकोव्हिजिलन्स या आव्हानात्मक क्षेत्राचा प्रामुख्याने उल्लेख करावा लागेल.
औषधसेवनानंतर त्वरित व कालांतराने उद्भवणाऱ्या दुष्परिणामाचा सखोल अभ्यास व प्रतिबंध म्हणजेच फार्माकोव्हिजिलन्स. जगभरातल्या औषध नियामक मंडळ व संस्थांनी औषध कंपन्यांना औषध बाजारात आल्यानंतर त्यामुळे उद्भवणाऱ्या दुष्परिणामांवर लक्ष ठेवणे, काही दुष्परिणाम निदर्शनास आल्यावर त्वरित विक्री थांबवणे व दुष्परिणामाचा सखोल अभ्यास करून सुरक्षित व परिणामकारक औषध रुग्णापर्यंत पोहोचवणे व या प्रकियेचा पूर्ण अहवाल सादर करण्याचे बंधन घातले आहे.
फार्माकोव्हिजिलन्समध्ये काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांवर पुढील जबाबदाऱ्या पार पडणेअपेक्षित असते- सर्व दुष्परिणामांवर बारकाईने लक्ष ठेवणे, सर्व स्रोतांतून आलेल्या घटनांचे व माहितीचे मूल्यांकन करणे, प्रतिकूल घटनांचा अहवाल तयार करून माहिती संगणकात साठवणे, मिळालेल्या माहितीला सुरक्षित संगणकीय सॉफ्टवेअरमध्ये नोंदवणे (safety database entry), अपायकारक लक्षणांना कोडिंग करणे, हानिकारक प्रसंगांना लेबिलग करून अभ्यास करणे व पूर्वी घडलेल्या हानिकारक नोंदीशी/घटनांशी तुलना करून सुरक्षित संग्रहित माहितीतून नवीन सुरक्षित उपायाचा अहवाल तयार करणे .
भारतातील केंद्रीय औषध गुणवत्ता नियंत्रण संस्थेने (CDSCO) औषधी उत्पादन करणाऱ्या कंपन्यांना फार्माकोव्हिजिलन्स विभाग स्थापित करून कार्यान्वित करणे बंधनकारक केले आहे. नियमितपणे औषधाचा सुरक्षा अहवाल पाठविण्यासाठीचे र्निबध घातले आहेत. फार्माकोव्हिजिलन्सची कार्यपद्धती मुख्यत: संगणक व सॉफ्टवेअरशी निगडित असल्याकारणाने सर्व औषध कंपन्या आयटी कंपन्यांना हे काम देतात (outsourcing). युरोपातील सर्वच बहुराष्ट्रीय औषध कंपन्या देशातील प्रमुख आयटी कंपन्यांना या कामात सहभागी करून घेतात. याचाच परिणाम म्हणजे देशातील औषधनिर्माणशास्त्र पदवीधर, पदव्युत्तर व फार्म डी. विद्यार्थ्यांना फार्माकोव्हिजिलन्स विभागात रोजगाराच्या भरपूर संधी उपलब्ध होत आहेत.
फार्माकोव्हिजिलन्सचा शिक्षण-प्रशिक्षण देणाऱ्या अनेक खासगी संस्था मुंबई, पुणे, दिल्ली बंगळुरू आदी शहरांत उपलब्ध आहेत. या अभ्यासक्रमांच्या प्रवेशप्रक्रियेत औषधनिर्माणशास्त्र पदवीधरांना प्राधान्य देण्याकडे कंपन्यांचा कल दिसून येतो, कारण पदवी अभ्यासक्रमात कामाच्या स्वरूपाशी निगडित असलेले ज्ञान व कौशल्य विद्यार्थ्यांना प्राप्त झालेले असते. आयटी कंपन्यांना सहऔषध कंपन्यांच्या क्लिनिकल ट्रायल्स विभागात, क्लिनिकल रीसर्च ऑर्गनायझेशन, सरकारी नियामक संस्था उदा. डीसीजीआय (ड्रग कंट्रोलर जनरल ऑफ इंडिया), वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय यासह अनेक कंपन्या व संस्थांमध्ये रोजगाराच्या उत्तम संधी आहेत.
फार्माकोव्हिजिलन्स क्षेत्रात डाटा कलेक्शन, डाटा प्रोसेसिंग, मेडिकल रिव्हीव्हअ‍ॅग्रीगेट रिपोर्ट व सिग्नलिंग अ‍ॅक्टिव्हिटीज आदी उपविभागांचे काम स्वतंत्रपणे चालते. प्रत्येक उपविभागात कुशल मनुष्यबळाची गरज आहे. फार्माकोव्हिजिलन्समधील करिअरची काही वैशिष्टय़े म्हणजे दीर्घ मुदतीचे करिअर व उत्तम भवितव्य, सातत्याने करिअरची वृद्धी व पदोन्नती, उत्तम
वेतन, आंतरराष्ट्रीय स्तरावर करिअरची संधी आणि रचनात्मक कार्यपद्धती.
फार्माकोव्हिजिलन्स करिअरमध्ये प्रवेश केल्यावर ड्रग सेफ्टी असोसिएट या पदावर काम करायला मिळते. दोन ते तीन वर्षांच्या अनुभवानंतर मेडिकल कोिडग, सायंटिफिक रायटिंग पदावर बढती मिळू शकते. आकलन, लिखाण आदी कौशल्ये विकसित झाल्यानंतर ड्रग सेफ्टी सायंटिस्ट म्हणून पदोन्नती मिळते. अनुभव व कौशल्य विकसित होईल त्याप्रमाणे पुढे अ‍ॅग्रीगेट रिपोर्ट सायंटिस्ट, सात ते दहा वर्षांच्या अनुभवानंतर टीम लीडर/टीम मॅनेजर अशी महत्त्वाची पदे मिळतात व पदानुसार वेतनही वाढत जाते. या क्षेत्रात करिअर करण्याची इच्छा व आवड असणाऱ्या विद्यार्थ्यांना पदवी अभ्यासक्रमाचे सखोल ज्ञान, संगणकाशी निगडित तंत्रज्ञान कौशल्य, तसेच इंग्रजी भाषेवर प्रभुत्व-
लेखन व संवादकौशल्य असणे आवश्यक आहे.
सध्या औषधनिर्मितीत भारताचा जगात चौथा क्रमांक आहे, तसेच सहा हजारांपेक्षा जास्त परवानाधारक उत्पादन कंपन्या व ६० हजारांपेक्षा जास्त ब्रँडेड औषधे बाजारात उपलब्ध आहेत व यातील प्रत्येक औषधाच्या अपायकारक व हितकारक परिणामावर लक्ष ठेवण्याचे काम फार्माकोव्हिजिलन्स क्षेत्राचे आहे.
एफडीए, डीसीजीआय, ईएमईए इ. औषध नियंत्रण मंडळांनी प्रत्येक कंपनीला सुरक्षा अहवाल सादर करण्याचे बंधन घातल्यामुळे, प्रत्येक कंपनीला स्वत:चा फार्माकोव्हिजिलन्स विभाग उभारणे अनिवार्य ठरले आहे. प्रत्येक रुग्णापर्यंत जास्तीत जास्त सुरक्षित औषधे पोहोचवणे हे केंद्र सरकारने सुरू केलेल्या राष्ट्रीय फार्माकोव्हिजिलन्स कार्यक्रमाचे उद्दिष्ट आहे.
फार्माकोव्हिजिलन्सची कार्यपद्धती मुख्यत: संगणक व सॉफ्टवेअरशी निगडित असल्याकारणाने सर्व औषध कंपन्या आयटी कंपन्यांना हे काम देतात (outsourcing) युरोपातील सर्वच बहुराष्ट्रीय औषध कंपन्या भारतातील प्रमुख आयटी कंपन्यांना या कामात सहभागी करून घेतात. याचाच परिणाम म्हणजे भारतातील औषधनिर्माणशास्त्र पदवीधर व पदव्युत्तर व फार्म डी. विद्यार्थ्यांना फार्माकोव्हिजिलन्स विभागात रोजगाराच्या भरपूर संधी उपलब्ध होत आहेत.
बदलते हवामान, जीवनशैली, नवनवे रोग यामुळे रुग्णांचे प्रमाण वाढत आहे व तेवढय़ाच प्रमाणात औषधांची निर्मितीही होत आहे. औषध मानवी चाचणीदरम्यान व बाजारपेठेत आल्यानंतर त्याचे दुष्परिणाम ओळखून नियंत्रित करणे बंधनकारक ठरते.
आगामी काळात फार्माकोव्हिजिलन्स क्षेत्राची व्याप्ती व स्वरूप विस्तारेल आणि या क्षेत्रात मोठय़ा प्रमाणात रोजगाराच्या संधी निर्माण होतील, हे नक्की!

फार्माकोव्हिजिलन्स विषयाच्या प्रमाणपत्र व पदविका अभ्यासक्रमाच्या प्रवेशासाठी औषधनिर्माणशास्त्र, जैवतंत्रज्ञान, वैद्यक पदवीधर विद्यार्थी पात्र ठरतात. फार्माकोव्हिजिलन्स क्षेत्राचे काम औषधे व त्याचे दुष्परिणाम या मूलभूत तत्त्वावर चालते, म्हणूनच बीफार्म, एमफार्म व फार्मडी विद्यार्थ्यांना इतर विद्यार्थ्यांच्या तुलनेत अभ्यासक्रमाच्या प्रवेशाच्या वेळेस तसेच या क्षेत्रातील नोकरभरतीतही प्राधान्य दिले जाते.
चंद्रशेखर बोबडे – chandrashekhar.bobade@mippune.edu.in

Paris Olympics Opening ceremony faces major changes
ऑलिम्पिक सोहळा पुन्हा स्टेडियममध्ये? सुरक्षेचा धोका असल्याची फ्रान्सच्या अध्यक्षांना भीती
Dead ants found in samosas
किळसवाणा प्रकार! कुरकुरीत समोस्यामध्ये आढळल्या मेलेल्या मुंग्या; दिल्ली विद्यापीठाच्या कॅन्टीनमधील Video Viral
Viral Video of Mother's Phone Addiction
बापरे! मोबाईलच्या नादात महिलेने चिमुकल्याला फ्रिजमध्ये ठेवले? व्हायरल व्हिडीओ पाहून येईल अंगावर काटा
Hardik Pandya Reacts To Defeat
IPL 2024 : हैदराबादकडून पराभूत झाल्यानंतर हार्दिक पंड्याने दिली प्रतिक्रिया, सांगितले मुंबईच्या पराभवाचे सर्वात मोठे कारण