नॅशनल इन्स्टिटय़ूट ऑफ न्यूट्रिशन हैद्राबाद येथे एमएस्सी (अप्लाईड न्यूट्रिशन)हा पदव्युत्तर अभ्यासक्रम चालतो. या अभ्यासक्रमाच्या २०१७- १९ या शैक्षणिक सत्रात प्रवेश देण्यासाठी घेण्यात येणाऱ्या प्रवेश पात्रता परीक्षेसाठी खाली नमूद केल्याप्रमाणे पात्रताधारक उमेदवारांकडून प्रवेश अर्ज मागविण्यात येत आहेत.

आवश्यक शैक्षणिक पात्रता- अर्जदारांनी एमबीबीएस, बीएस्सी (न्यूट्रिशन, होम सायन्स, नर्सिग) अथवा बीएस्सी (बायोकेमिस्ट्री, न्यूट्रिशन) यासारखी शैक्षणिक पात्रता चांगल्या शैक्षणिक आलेखासह उत्तीर्ण केलेली असावी.

निवड पद्धती- अर्जदारांपैकी पात्रताधारक उमेदवारांची लेखी निवड परीक्षा घेण्यात येईल. ही निवड परीक्षा नॅशनल इन्स्टिटय़ूट ऑफ न्यूट्रिशनतर्फे हैद्राबाद येथे २३ जुलै २०१७ रोजी घेण्यात येईल.

निवड परीक्षा निकाल १४ ऑगस्ट २०१७ रोजी घोषित करण्यात येईल व अर्जदारांची संबंधित पात्रता परीक्षेतील गुणांची टक्केवारी व निवड परीक्षेतील गुणांकाच्या आधारे त्यांची अभ्यासक्रमासाठी अंतिम निवड करण्यात येईल.

अर्जासह भरावयाचे शुल्क- अर्जासह भरावयाचे शुल्क म्हणून सर्वसाधारण गटाच्या अर्जदारांनी ३००० रु. चा (राखीव वर्गगटातील अर्जदारांनी २६०० रु. चा) दी डायरेक्टर, नॅशनल इन्स्टिटय़ूट ऑफ न्यूट्रिशनच्या नावे असणारा व हैद्राबाद येथे देय असलेला डिमांड ड्राफ्ट पाठविणे आवश्यक आहे.

जागांची संख्या व तपशील- अभ्यासक्रमासाठी उपलब्ध असणाऱ्या जागांची संख्या १६ असून यापैकी काही जागा सरकारी नियमांनुसार राखीव आहेत.

अधिक माहिती व तपशिलासाठी संपर्क- अभ्यासक्रमाच्या संदर्भात अधिक माहिती व तपशिलासाठी नॅशनल इन्स्टिटय़ूट ऑफ न्यूट्रिशन, हैद्राबादच्या www.ninindia.org अथवा www.knruhs.in या संकेतस्थळांना भेट द्यावी.

अर्ज पाठविण्याचा पत्ता व शेवटची तारीख- विहित नमुन्यातील संपूर्णपणे भरलेले व आवश्यक तो तपशील आणि कागदपत्र व डिमांड ड्राफ्टसह असणारे प्रवेश अर्ज हेड ऑफ दि डिपार्टमेंट, पब्लिकेशन्स, एक्स्टेंशन अ‍ॅण्ड ट्रेनिंग डिव्हिजन, नॅशनल इन्स्टिटय़ूट ऑफ न्यूट्रिशन, जामई-उस्मानिया पोस्ट ऑफिस, हैद्राबाद ५००००७ या पत्त्यावर २३ जून २०१७ पर्यंत पोहोचतील अशा बेताने पाठवावेत.