नॅशनल एलिजिबिलिटी कम एंट्रन्स टेस्ट (नीट) ही राष्ट्रीय पातळीवरील वैद्यकीय प्रवेश परीक्षा  ७ मे २०१७ रोजी घेण्यात येणार आहे. आता शेवटच्या टप्प्यात या परीक्षेची तयारी कशी करावी, याविषयी..

design courses at iit bombay
डिझाईन रंग- अंतरंग : डिझाईन शिक्षण: विद्यार्थी, पालकांमधील सर्जनशीलता वाढवणारा दुवा
SSC CHSL 2024 Recruitment OTR and Application Module
SSC CHSL 2024 Recruitment: बारावीच्या विद्यार्थ्यांसाठी नोकरीची संधी! अर्ज करताना OTR आणि Live फोटो काढणे आवश्यक
mpsc mantra study current affairs State National International Level Events
mpsc मंत्र: चालू घडामोडी अभ्यासाचा ‘आधार’
Record Number of Students Register for MHTCET
अभियांत्रिकी, औषधनिर्माण प्रवेशासाठी स्पर्धा, सीईटीसाठी किती विद्यार्थ्यांची नोंदणी?

या वर्षीचे सर्व वैद्यकीय प्रवेश हे फक्त नीटच्या गुणांवर आधारित होणार आहेत. या परीक्षेच्या आधारे वैद्यकीय क्षेत्रातील एमबीबीएस, बीडीएस व्यतिरिक्त आयुर्वेद, होमियोपॅथी, पॅरा मेडिकल तसेच नर्सिग इ.चे प्रवेश पूर्णपणे नीटवर अवलंबून आहेत. या प्रवेश परीक्षेच्या गुणवत्तेच्या आधारे होणारे प्रवेश हे ८५% राज्य पातळीवरील व १५% राष्ट्रीय पातळीवरील असतील. या परीक्षेचा अभ्यासक्रम इ. ११ वी व १२ वी (NCERT) च्या पाठय़पुस्तकांवर आधारित आहे. या वर्षी या परीक्षेसाठी मुंबई व मुंबईव्यतिरिक्त जास्तीत जास्त परीक्षा केंद्रांना मान्यता देण्यात आली आहे. जेणेकरून विद्यार्थ्यांची गैरसोय टाळता येईल.

‘नीट’ ही वैद्यकीय विद्यार्थ्यांसाठी खूप महत्त्वाची व स्पर्धात्मक परीक्षा आहे. या अभ्यासक्रमाची व्याप्ती खूप असल्यामुळे विद्यार्थ्यांनी या परीक्षेसाठी सखोल तसेच नियोजनपूर्ण अभ्यास करणे खूपच गरजेचे आहे. या परीक्षेला विचारलेले प्रश्न हे ज्ञान, उपयोजन, कौशल्य व आकलन यावर आधारित असतात. या परीक्षेमध्ये गणितीय प्रश्न (Mathematical base) कमी विचारले जातात. या परीक्षेत एकूण १८० प्रश्न विचारले जातात व प्रत्येक प्रश्नाला ४ गुण असतात. एकूण प्रश्नांपैकी ४५ प्रश्न हे भौतिकशास्त्रावर ४५ प्रश्न रसायनशास्त्रावर तर ९० प्रश्न जीवशास्त्र (वनस्पतीशास्त्र आणि प्राणीशास्त्र) या विषयांवर विचारले जातात.

या परीक्षेची काठिण्यपातळी जास्त असते. तसेच ‘नकारात्मक गुणपद्धती’ मुळे गुण कमी होण्याची शक्यता असते. त्यामुळे विद्यार्थ्यांने शक्यतो अचूक उत्तर सोडविण्याचा प्रयत्न करावा. परीक्षा कालावधी ३ तासांचा असल्यामुळे मर्यादित वेळेचे भान ठेवून विचारपूर्वक प्रश्न सोडवावेत. सर्व प्रश्न हे Single Response Multiple Choice अशा स्वरूपाचे असतात.

ही परीक्षा लिखीत स्वरुपाची आणि ऑफलाइन असून ती १० भाषांमध्ये घेतली जाते. या परीक्षेमध्ये ११ वी व १२ वीच्या अभ्यासक्रमावर समान प्रमाणात प्रश्न विचारले जातात. या परीक्षेमध्ये २५% ते ३०% प्रश्न हे अधिक काठिण्यपातळीवरील विचारले जातात. कारण यातच विद्यार्थ्यांची क्षमता तसेच गुणवत्ता जोखली जाते.

विद्यार्थ्यांसाठी सूचना :

  • विद्यार्थ्यांनी परीक्षेच्या वेळेच्या किमान २ तास आधी परीक्षा केंद्रावर उपस्थित राहणे बंधनकारक आहे.
  • विद्यार्थ्यांनी cbseneet.nic.in या संकेतस्थळावर जाऊन स्वत:चा संकेतक्रमांक टाकून आपले प्रवेशपत्र डाऊनलोड करून त्याची प्रिंट आऊट घ्यावी. त्यात नमूद केलेल्या सर्व बाबी परीक्षा केंद्रावर घेऊन याव्यात.
  • आपल्यासोबत कोणत्याही स्वरूपातील प्रश्नपत्रिका, गणकयंत्र, लॉगचाळणी, गणक यंत्र असलेली घडय़ाळे, मोबाइल फोन नसल्याची खात्री करून मगच विद्यार्थ्यांनी परीक्षा कक्षात प्रवेश करावा.
  • प्रश्नपत्रिका (Test Booklet) मिळाल्यावर सर्व पृष्ठे असल्याची व योग्य स्वरूपात असल्याची खात्री करावी.
  • प्रश्नपत्रिकेवरील अनुक्रमांक आणि इतर बाबी (OMR Sheet) उत्तरपत्रिकेवरील अनुक्रमांक आणि इतर बाबींशी तपासून घ्याव्यात.
  • विद्यार्थ्यांनी OMR Sheet वरील वर्तुळे काळजीपूर्वक काळ्या बॉल पॉइंट पेनने त्यांनी त्यांचा परीक्षा क्रमांक व इतर बाबी अतिशय काळजीपूर्वक भराव्यात.
  • विद्यार्थ्यांनी ज्या विषयाबाबत सर्वात जास्त आत्मविश्वास वाटेल त्या विषयाची उत्तरे लिहिण्यास सर्वप्रथम सुरुवात करावी. आपला वेग आणि परिणामकारकता संपूर्ण परीक्षा होईपर्यंत टिकवण्याचा प्रयत्न करावा.
  • विद्यार्थ्यांनी परीक्षेपूर्वी कोणत्याही प्रकारचे दडपण मनावर आणू नये. मन शांत ठेवावे आणि अभ्यास केलेल्या धडय़ांचे मनन करावे.
  • परीक्षेसारख्या वातावरणात दिलेल्या अनेक मॉक टेस्टचा विद्यार्थ्यांना या परीक्षेसाठी नक्कीच उपयोग होऊ शकतो.

विद्यार्थ्यांनी संपूर्ण अभ्यासक्रमाचा आढावा घेऊन परीक्षेच्या तयारीची रणनीती आखावी. वेळेचे योग्य व्यवस्थापन केल्यास प्रत्येक विषयाचा अभ्यासक्रम अभ्यासणे विद्यार्थ्यांना नक्कीच शक्य होईल. शेवटच्या टप्प्यांतल्या तयारीसाठी भौतिकशास्त्र, रसायनशास्त्र आणि जीवशास्त्रासाठी खालील पुस्तके उपयोगी पडू शकतील.

  1. i) NCERTची ११वी आणि १२वीची क्रमिक पुस्तके
  2. ii) mtG fingertips for PCB

iii) CBSE Paper Solutions

प्रा. किशोर चव्हाण (रसायनशास्त्र विभाग, साठय़े महाविद्यालय)