भूगोलाचा पायाभूत अभ्यास कशा प्रकारे करायचा त्याची चर्चा यापूर्वी करण्यात आली. या लेखामध्ये पुढील घटकांचा अभ्यास करण्याची रणनीती पाहू.

पर्यावरणीय घटक

  • पर्यावरणीय भूगोलातील पर्यावरणाचा ऱ्हास, जागतिक तापमान वाढ, हरितगृह, परिणाम, जैवविविधतेचा व वनांचा ऱ्हास, कार्बन क्रेडिट या संकल्पना अत्यंत बारकाईने अभ्यासणे आवश्यक आहे. मूलद्रव्यांचे चक्र, अन्नसाखळी व अन्न जाळे या बाबी समजून घ्याव्यात. हा सगळा संकल्पनात्मक अभ्यास ठउएफळच्या पुस्तकातून करणे आवश्यक आहे.
  • पश्चिम घाटाची रचना, भौगोलिक वैशिष्टय़े, जैवविविधता, संवर्धनाबाबत समस्या, कारणे, उपाय, संबंधित राष्ट्रीय, आंतरराष्ट्रीय चालू घडामोडी असा परिपूर्ण अभ्यास महत्त्वाचा आहे.
  • पर्यावरणविषयक कायदे घटकाची पेपर २च्या विधीविषयक घटकातूनच तयारी करावी.

कृषीविषयक घटक

  • कृषीविषयक मूलभूत भौगोलिक व वैज्ञानिक संकल्पना आधी समजून घ्याव्यात. पीकवाढीसाठी आवश्यक पोषणतत्त्व, त्यांचे महत्त्व, त्याचे स्रोत, आभावामुळे होणारे रोग व अतिपुरवठय़ामुळे होणारे रोग तसेच इतर अनुषंगिक मुद्दय़ांच्या आधारे टेबल तयार करता येईल.
  • महाराष्ट्रातील कृषी-हवामान विभागांच्या आधारे महाराष्ट्रातील कृषीक्षेत्राचा संकल्पनात्मक आणि तथ्यात्मक अभ्यास एकाचवेळी करणे शक्य आहे. पर्जन्याचे स्वरूप, मृदेचा प्रकार, महत्त्वाची पिके, जलव्यवस्थापन, सिंचन पद्धती इत्यादींचा अभ्यास स्वरूप, समस्या, कारणे, उपाय या चार पलूंच्या आधारे करावा. समस्यांचा विचार करताना नसíगक स्थान, स्वरूपामुळे निर्माण होणाऱ्या, चुकीच्या पीक पद्धतीमुळे निर्माण होणाऱ्या, खतांच्या वापरामुळे, सिंचन पद्धतीमुळे, औद्योगिक व इतर प्रदूषकांमुळे निर्माण होणाऱ्या समस्यांचा समावेश करणे आवश्यक आहे.
  • प्रत्येक कृषी हवामान विभागाचा अभ्यास घटकांचे एकमेकांशी असलेले परस्परसंबंध समजून घेऊन अभ्यास करणे आवश्यक आहे. महाराष्ट्र शासनाचे दुष्काळ निवारण व इतर कृषी व ग्रामीण विकासासाठीचे उपक्रम, योजना इ. बाबी पेपर ४ मधील अर्थव्यवस्था घटकाशी संलग्न आहेत. त्यामुळे एकत्रित अभ्यास फायद्याचा ठरेल.
  • शाश्वत शेती, सेंद्रित शेती, जी. एम. बियाणी, सिंचनाचे प्रकार, शेती व पर्यावरण यांचा परस्पर संबंध समजावून घेणे व त्यांचा तर्कशुद्ध वापर करणे आवश्यक आहे.

महाराष्ट्राचा आíथक भूगोल

  • महाराष्ट्राचा आíथक भूगोल हा पूर्णत: तथ्यात्मक घटक आहे. यामध्ये खनिजे व ऊर्जास्रोत, महत्त्वाचे पायाभूत उद्योग, महत्त्वाची धरणे/प्रकल्प व महत्त्वाची पर्यटनस्थळे यांचा अभ्यास स्थान, वैशिष्टय़े, आíथक महत्त्व, वर्गीकरण, पर्यावरणीय मुद्दे, संबंधित समस्या, कारण, उपाय आणि चालू घडामोडी या मुद्दय़ांच्या आधारे अभ्यास करावा.
  • धार्मिक, वैद्यकीय, सांस्कृतिक पर्यटन, राखीव उद्याने इ. संकल्पना व्यवस्थित समजून घेणे आवश्यक आहे. महाराष्ट्रातील सर्व राष्ट्रीय उद्याने, वने माहीत असायला हवीत. भारतातील प्रसिद्ध वने, उद्याने व सद्य:स्थितीत चच्रेत असलेली स्थळे याची माहिती करून घ्यावी. संदर्भ साहित्यातील संबंधित सगळे टेबल पाठ करणे आवश्यक नाही, काही ऐतिहासिक महत्त्वाचे तेवढेच किल्ले लक्षात घ्यावेत.

चालू घडामोडी

  • पूर्णपणे भौगोलिक घटनांचा नकाशा समोर ठेवून अभ्यास करणे आवश्यक आहे. त्याच वेळी संबंधित मूलभूत संकल्पनाही समजून घ्यायला हव्यात. पर्यावरणसंबंधी चालू घडामोडींमध्ये त्यांचा भौगोलिक पलू महत्त्वाचा असतो.
  • कृषीविषयक चालू घडामोडींमध्ये जी एम बियाणी, नव्या पीक पद्धती, नवे वाण इत्यादींचा अभ्यास पेपर ४ शीही संबंधित आहे. त्यामुळे गांभीर्याने करणे आवश्यक आहे.
  • दूरसंवेदन क्षेत्रातील चालू घडामोडी इंडिया इयर बुक व इंटरनेटवरून पहाव्या लागतील.
  • पेपर ४ मधील आपत्ती व्यवस्थापन हा चालू घडामोडींचा भाग नसíगक आपत्तींच्या अनुषंगाने भूगोलाच्या अभ्यासात समाविष्ट करायला हवा.

मानवी व सामाजिक भूगोल

  • मानवी व सामाजिक भूगोलामध्ये वसाहती व स्थलांतर हे मुख्य मुद्दे आहेत. वसाहतींचे प्रकार, आकार, स्वरूप, ठिकाण व आíथक महत्त्व पाहायला हवेत.
  • स्थलांतराची कारणे, स्वरूप, समस्या, परिणाम व उपाय इ. दृष्टीने अभ्यास आवश्यक आहे. याबाबतीत ‘आकडेवारी’ हा मुद्दा महत्त्वाचा आहे. विशेषत: महाराष्ट्राच्या संदर्भातील स्थलांतराची आकडेवारी (म्हणजे टक्केवारी) आíथक पाहणी अहवालामधून अद्ययावत करून घ्यायला हवी.