नॅशनल पॉवर ट्रेनिंग इन्स्टिटय़ूट, बंगळुरू येथे उपलब्ध असणाऱ्या ट्रान्समिशन अ‍ॅण्ड डिस्ट्रिब्युशन सिस्टम या विषयातील ६ महिने कालावधीच्या विशेष अभ्यासक्रमासाठी खाली नमूद केल्याप्रमाणे प्रवेश अर्ज मागविण्यात येत आहेत.
उपलब्ध जागा- अभ्यासक्रमासाठी उपलब्ध जागांची संख्या ६० असून त्यापैकी काही जागा सरकारी नियमांनुसार राखीव आहेत.
आवश्यक शैक्षणिक पात्रता- उमेदवारांनी इलेक्ट्रिकल, इलेक्ट्रिकल, इलेक्ट्रॉनिक्स अथवा पॉवर इंजिनीअरिंगमधील पदवी परीक्षा चांगल्या शैक्षणिक आलेखासह उत्तीर्ण केलेली असावी.
निवड पद्धती- अर्जदारांची इंजिनीअरिंग पदवी परीक्षेतील गुणांची टक्केवारी व शैक्षणिक आलेखानुसार त्यांना अभ्यासक्रमामध्ये प्रवेश देण्यात येईल.
अर्जासह पाठवायचे शुल्क : अर्जदारांनी आपल्या अर्जासह पाठवायचे शुल्क म्हणून ५०० रु.चा पीएसटीआय बंगलोर यांच्या नावाने असणारा व बंगलोर येथे देय असलेला डिमांड ड्राफ्ट पाठविणे आवश्यक आहे.
अर्ज पाठविण्याचा पत्ता व शेवटची तारीख- संपूर्णपणे भरलेले व आवश्यक ते कागदपत्र आणि डिमांड ड्राफ्टसह असणारे प्रवेश अर्ज प्रिंसिपल डायरेक्टर, नॅशनल पॉवर ट्रेनिंग इन्स्टिटय़ूट, सुब्रमण्यमपुरा रोड, वनशंकरी २ स्टेज, बंगलोर- ५६००७० या पत्त्यावर २० जुलै २०१६ पर्यंत पोहोचतील अशा बेताने पाठविणे आवश्यक आहे.

अधिक माहिती व तपशील-
अभ्यासक्रमाच्या संदर्भात अधिक माहिती
व तपशिलासाठी एम्प्लॉयमेंट न्यूजच्या
१४ ते २० मे २०१६ च्या अंकात प्रकाशित झालेली नॅशनल पॉवर ट्रेनिंग इन्स्टिटय़ूट, बंगळुरूची जाहिरात पाहावी, इन्स्टिटय़ूटच्या दूरध्वनी क्र. ०८०- २६९३४३६३ वर संपर्क साधावा अथवा http://www.psti.kar.nic.in या संकेतस्थळाला भेट द्यावी.
तुमचे अभ्यासक्रम अथवा करिअरसंबंधीचे प्रश्न career.vruttant@expressindia.com या पत्त्यावर पाठवा.)