बिर्ला इन्स्टिटय़ूट ऑफ टेक्नॉलॉजी, पिलानी येथे संगणक व माहिती तंत्रज्ञान, वाहन उद्योग, उत्पादन क्षेत्र, औषधी निर्मिती, रसायनशास्त्र व विश्लेषण क्षेत्रातील उद्योगात काम करणाऱ्या अनुभवी उमेदवारांसाठी पुढील अभ्यासक्रम उपलब्ध आहेत-
अर्जदारांनी पुढील अर्हता प्राप्त केलेली असावी-
* एमटेक : सॉफ्टवेअर सिव्हिल, मॅन्युफॅक्चरिंग मॅनेजमेंट व क्वालिटी मॅनेजमेंट:
अर्हता- अर्जदार बीई, बीएस, एमएस्सी, एमसीए, एएमआयई यांसारखे पात्रताधारक असावेत. त्यांना संबंधित क्षेत्रातील कामाचा किमान वर्षभराचा
अनुभव असावा.
* बीटेक- इंजिनीअरिंग टेक्नॉलॉजी :
अर्जदार बीएस्सी पदवीधर अथवा अभियांत्रिकीचा पदविकाधारक असावा. त्यांना संबंधित क्षेत्रातील कामाचा किमान २ वर्षांचा अनुभव असावा.
* एमएस्सी-बिझनेस अ‍ॅनालिसिस :
अर्जदार बीकॉम, बीएस्सी, बीई, एमसीए यांसारखी पात्रताधारक असावेत. त्यांना संबंधित क्षेत्रातील कामाचा किमान वर्षभराचा अनुभव असावा.
* एमबीए- क्वालिटी मॅनेजमेंट, कन्सल्टन्सी मॅनेजमेंट व मॅन्युफॅक्चरिंग मॅनेजमेंट :
अर्जदार बीई, बीटेक, एमएस्सी, एमसीए, एएमआयई यांसारखे पात्रताधारक असावेत. त्यांना संबंधित क्षेत्रातील कामाचा किमान वर्षभराचा अनुभव असावा.
अधिक माहिती : http://www.bits.ac.in/wilp अर्ज करण्याची मुदत : संगणकीय पद्धतीने वरील संकेतस्थळावर ११ जून २०१६ पर्यंत अर्ज करता येईल.