ओएनजीसी म्हणजेच ऑइल अ‍ॅण्ड नॅचरल गॅस कॉर्पोरेशनतर्फे अनुसूचित जाती-जमातीच्या हुशार विद्यार्थ्यांना अभियांत्रिकीसह निवडक विषयातील पदव्युत्तर अभ्यासक्रमांसाठी खालीलप्रमाणे शैक्षणिक शिष्यवृत्ती देण्यात येत आहेत.

  • शिष्यवृत्तींची संख्या व तपशील– योजनेअंतर्गत देण्यात येणाऱ्या शैक्षणिक शिष्यवृत्तींची संख्या ४९८ असून त्यापैकी १०० शिष्यवृत्ती महाराष्ट्रासह पश्चिम क्षेत्रातील राज्यातील पात्रताधारक विद्यार्थ्यांसाठी आहेत.
  • आवश्यक शैक्षणिक पात्रता– अर्जदार विद्यार्थी खालीलप्रमाणे पात्रताधारक असावेत.
  • अभियांत्रिकी व वैद्यकशास्त्र विषयातील चार वर्षीय पदवी अभ्यासक्रमांसाठी अर्जदार विद्यार्थ्यांनी संबंधित विषयांसह बारावीची परीक्षा कमीतकमी ६०% गुणांसह उत्तीर्ण केलेली असावी.
  • व्यवस्थापन क्षेत्रातील एमबीए अभ्यासक्रम- दोन वर्षे कालावधीच्या या पदव्युत्तर पदवी अभ्यासक्रमांसाठी अर्जदार विद्यार्थ्यांनी कुठल्याही विषयातील पदवी परीक्षा कमीतकमी ६०% गुणांसह उत्तीर्ण केलेली असावी.
  • जिओलॉजी व जिओफिजिक्स विषयातील पदव्युत्तर पदवी अभ्यासक्रम – दोन वर्षे कालावधीच्या या पदव्युत्तर पदवी अभ्यासक्रमांसाठी अर्जदार विद्यार्थ्यांनी संबंधित विषयातील पदवी परीक्षा कमीतकमी ६०% गुणांसह उत्तीर्ण केलेली असावी.
  • वयोमर्यादा- अर्जदार विद्यार्थ्यांचे वय १ ऑक्टोबर २०१६ रोजी ३० वर्षांहून अधिक नसावे.
  • विशेष सूचना- अर्जदार विद्यार्थ्यांचा शैक्षणिक आलेख चांगला असावा. त्यांचे वार्षिक कौटुंबिक उत्पन्न ४.५ लाख रुपयांहून अधिक नसावे व ते इतर कुठल्याही शिष्यवृत्ती योजनेचे लाभार्थी नसावेत.
  • निवड पद्धती- अर्जदार विद्यार्थ्यांपैकी पात्रताधारक अर्जदारांची पात्रता, शैक्षणिक आलेख व पात्रता परीक्षेतील गुणांच्या टक्केवारीच्या आधारे त्यांची शैक्षणिक शिष्यवृत्तीसाठी निवड करण्यात येईल.
  • शिष्यवृत्तीची रक्कम- योजनेअंतर्गत निवड झालेल्या विद्यार्थ्यांना त्यांच्या संबंधित अभ्यासक्रम कालावधीसाठी ऑइल अ‍ॅण्ड नॅचरल गॅस कॉर्पोरेशनतर्फे दरमहा ४००० रु.ची शैक्षणिक शिष्यवृत्ती देण्यात येईल.
  • अधिक माहिती व तपशिलासाठी संपर्क- शैक्षणिक शिष्यवृत्ती योजनेच्या संदर्भात अधिक माहिती व तपशिलासाठी ऑइल अ‍ॅण्ड नॅचरल गॅस कॉर्पोरेशनच्या दूरध्वनी क्र. ०१३५- २७९२६३० अथवा ०१३५- २७९२६५६ वर संपर्क साधावा अथवा कॉर्पोरेशनच्या ongcindia.com या संकेतस्थळाला भेट द्यावी.
  • अर्ज जमा करण्याची पद्धत व शेवटची तारीख- पात्रताधारक विद्यार्थ्यांनी विहित नमुन्यातील संपूर्णपणे भरलेले व आवश्यक तो तपशील आणि कागदपत्रांसह असणारे आपले अर्ज संबंधित संस्थाप्रमुख वा प्राचार्यामार्फत ओएनजीसीच्या निर्धारित कार्यालयात पाठविण्याची शेवटची तारीख २४ जानेवारी २०१७ आहे.