केंद्र सरकारच्या विज्ञान व तंत्रज्ञान मंत्रालयांतर्गत कार्यरत असणाऱ्या डिपार्टमेंट ऑफ बायोटेक्नॉलॉजीच्या विशेष प्रशिक्षण कार्यक्रमाच्या २०१६-२०१७ या सत्रासाठी खालीलप्रमाणे प्रवेश उपलब्ध आहे.
आवश्यक शैक्षणिक पात्रता- अर्जदार विद्यार्थ्यांनी बायोइन्फरमॅटिक्स विषयातील बीई, बी.टेक, एमएस्सी, एमटेक या प्रगत पदव्युत्तर पदविका अभ्यासक्रम यांसारखी पात्रता २०१५ वा २०१६ या शैक्षणिक सत्रात व कमीत कमी ५५% गुणांसह उत्तीर्ण केलेली असावी व त्यांचा शैक्षणिक आलेख चांगला असायला हवा.
निवड पद्धती : अर्जदारांपैकी पात्रताधारक उमेदवारांना मुलाखतीसाठी बोलाविण्यात येऊन त्याआधारे त्यांची प्रशिक्षण कार्यक्रमासाठी निवड करण्यात येईल.
अभ्यासक्रमाचे स्वरूप व पाठय़वेतन- प्रशिक्षण अभ्यासक्रम हा संबंधित उद्योग क्षेत्रात व सरावासह प्रत्यक्ष कामावर आधारित असून योजनेअंतर्गत निवड झालेल्या उमेदवारांना त्यांच्या प्रशिक्षण काळात दरमहा १०००० रु. पाठय़वृत्ती देण्यात येईल.
अर्जासह पाठवायचे शुल्क- अर्जदारांनी आपल्या अर्जासह पाठवायचे शुल्क म्हणून २५० रु.चा बायोटेक कॉसर्टियम् इंडिया लिमिटेड’च्या नावे असणारा व नवी दिल्ली येथे देय असलेला डिमांड ड्राफ्ट पाठविणे आवश्यक आहे.
अधिक माहिती व तपशील- प्रशिक्षण कार्यक्रमाच्या संदर्भात अधिक माहिती व तपशिलासाठी http://www.bcit.nic.in/ biitp 2016-17/ indeb.asp या संकेतस्थळाला भेट द्यावी.
अर्ज करण्याची पद्धत व शेवटची तारीख- संगणकीय पद्धतीने वरील संकेतस्थळावर अर्ज करण्याची शेवटची तारीख २५ जुलै २०१५ आहे.