इंदिरा गांधी राष्ट्रीय मुक्त विद्यापीठामध्ये दूरस्थ शिक्षण पद्धतीने अनेक अभ्यासक्रम करता येतात. त्यातीलच  विविध अभ्यासक्रमांमध्ये खालीलप्रमाणे प्रवेश उपलब्ध आहेत-

*   पदव्युत्तर अभ्यासक्रम- तत्त्वज्ञान, गांधी विचार अभ्यास, विस्तारित विकास, शिक्षणशास्त्र, सामाजिक कार्य, दूरस्थ शिक्षण, अर्थशास्त्र, इंग्रजी, हिंदी, इतिहास, राज्यशास्त्र, मानसशास्त्र, लोक- प्रशासन, ग्रामीण विकास, समाजशास्त्र, प्रौढ शिक्षण, महिला शिक्षण, पर्यटन व आदरातिथ्य, वाणिज्य, संगणकशास्त्र, वाचनालय विज्ञान, आहार शास्त्र, अनुवाद शास्त्र यांसारख्या विषयातील पदव्युत्तर पदवी अभ्यासक्रम.

ugc new decision direct admission to phd after graduation
आता पदवीनंतर पीएच.डी.ला मिळणार थेट प्रवेश! काय आहे युजीसीचा नवा निर्णय? युजीसीचे अध्यक्ष प्रा. एम. जगदेशकुमार यांची माहिती 
CUET PG exam result announced by NTA pune
‘सीयूईटी-पीजी’ परीक्षेचा निकाल ‘एनटीए’कडून जाहीर, यंदा किती विद्यार्थ्यांनी दिली परीक्षा?
Kendriya Vidyalaya
केंद्रीय विद्यालयांतील प्रवेश प्रक्रिया सुरू, कधीपर्यंत भरता येणार अर्ज?
Release of candidates
वेगवेगळ्या प्रवेश परीक्षांतून उमेदवारांची सुटका, आता एकाच परीक्षेतून प्रवेशाची संधी

*   पदविका अभ्यासक्रम- वाचनालय शास्त्र व तंत्रज्ञान, अ‍ॅनालॅटिकल केमिस्ट्री, श्रवण कार्यक्रम, न्यायशास्त्र, आपत्काल नियंत्रण, शैक्षणिक व्यवस्थापन व प्रशासन, शिक्षण तंत्र, पर्यावरण संरक्षण व स्थायी विकास, विकास व्यवस्थापन, सांस्कृतिक अभ्यसाक्रम, गांधी विचार, उच्च शिक्षण, माहिती संरक्षण, बुद्धिमत्ता अधिकार, आंतरराष्ट्रीय व्यवसाय व्यवस्थापन, पत्रकारिता, औषध विक्री व्यवस्थापन, ग्रामीण विकास, प्राथमिक शिक्षण, शालेय नेतृत्व-व्यवस्थापन, भाषांतर शास्त्र, शहरी नियोजन, प्रौढ शिक्षण, वृक्ष व्यवस्थापन, ग्रंथ प्रकाशन, अन्न प्रक्रिया व संरक्षण, गुणवत्ता नियंत्रण, कृषी विज्ञान, बीपीओ व्यवस्थापन, लेखा- प्रक्रिया, इंग्रजी लिखाण, शिशू संगोपन, कुटुंब कल्याण व शिक्षण, पर्यटन, उर्दू भाषा, सकस आहार व प्रक्रिया, पंचायत स्तरीय प्रशासन व विकास, महिला सशक्तीकरण, दुग्धव्यवसाय, जलसंवर्धन, मत्सोत्पादन व तंत्रज्ञान यांसारख्या विषयातील पदविका अभ्यासक्रम.

*   पदवी अभ्यासक्रम- बीएस्सी, बीए, बीए (टुरिझम) बी.कॉम, बीसीए, बॅचलर ऑफ लायब्ररी सायन्स, बॅचरल ऑफ सोशल नेटवर्क यांसारख्या विषयातील पदवी अभ्यासक्रम.

*   अधिक माहिती व तपशिलासाठी संपर्क- अभ्यासक्रमांच्या संदर्भात अधिक माहिती, तपशील व आवश्यक शैक्षणिक पात्रता इ. जाणून घेण्यासाठी इंदिरा गांधी राष्ट्रीय मुक्त विद्यापीठ- दिल्लीच्या http://onlineadmission. ignou.ac.in/ admission या संकेतस्थळाला भेट द्यावी.

*   अर्ज व माहितीपत्रक- अभ्यासक्रमाचे माहितीपत्रक व प्रवेश अर्ज घरपोच हवे असल्यास ८०० रु. शुल्क पाठविणे आवश्यक आहे.

*   अर्ज पाठविण्याचा पत्ता व शेवटची तारीख- संपूर्णपणे भरलेले व आवश्यक त्या कागदपत्रांसह असणारे प्रवेश अर्ज रजिस्ट्रार- स्टुडंटस् रजिस्ट्रेशन डिव्हिजन, इंदिरा गांधी राष्ट्रीय मुक्त विद्यापीठ, मैदानगढी, नवी दिल्ली- ११० ०६८ या पत्त्यावर ३१ जुलै २०१७ पर्यंत पोहोचतील अशा बेताने पाठवावेत.