केंद्रीय लोकसेवा आयोगातर्फे संरक्षण दलाच्या विविध विभागांतर्गत अधिकारी पदावर थेट नेमणूक करण्यासाठी घेण्यात येणाऱ्या कंबाइन्ड डिफेन्स सव्‍‌र्हिसेस एक्झामिनेशन- २०१४ या निवड पात्रता परीक्षेसाठी खाली नमूद केल्याप्रमाणे पात्रताधारक उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहेत.
जागांची संख्या व तपशील : या निवड परीक्षेअंतर्गत उपलब्ध असणाऱ्या जागांची संख्या ४९९ असून त्यामध्ये इंडियन मिलिटरी अकादमी २५०, इंडियन नेव्हल अकादमी ४०, एअरफोर्स अकादमी ३२, ऑफिसर्स ट्रेनिंग अकादमी १७५ व महिला ऑफिसर्स ट्रेनिंग अकादमी १२ याप्रमाणे जागांचा समावेश आहे.
आवश्यक शैक्षणिक पात्रता : अर्जदार खालीलप्रमाणे पात्रताधारक असायला हवेत-
* इंडियन मिलिटरी अकादमी व ऑफिसर्स ट्रेनिंग अकादमी : अर्जदार कुठल्याही विषयातील पदवीधर असावेत.
* इंडियन नेव्हल अकादमी : अर्जदार अभियांत्रिकीमधील पदवीधर असावेत.
* एअरफोर्स अकादमी : अर्जदार गणित व भौतिकशास्त्र या विषयांसह बीएससी अथवा अभियांत्रिकीमधील पदवीधर असायला हवेत.
विशेष सूचना : वरील शैक्षणिक पात्रतेशिवाय अर्जदार शारीरिकदृष्टय़ा पात्र असायला हवेत.
वयोमर्यादा : अर्जदारांचा वयोगट व जन्मतारीख खालीलप्रमाणे असावी-
* इंडियन मिलिटरी अकादमी : अर्जदारांचा जन्म २ जानेवारी १९९१ ते १ जानेवारी १९९६ च्या दरम्यान झालेला असावा.
* इंडियन नेव्हल अकादमी : अर्जदारांचा जन्म २ जानेवारी १९९१ ते १ जानेवारी १९९६ च्या दरम्यान झालेला असावा.
* एअरफोर्स अकादमी : अर्जदारांचा जन्म २ जानेवारी १९९२ ते १ जानेवारी १९९६ च्या दरम्यान झालेला असावा.
* ऑफिसर्स ट्रेनिंग अकादमी : अर्जदारांचा जन्म २ जानेवारी १९९० ते १ जानेवारी १९९६च्या दरम्यान झालेला असावा.
निवड पद्धती : अर्जदारांपैकी पात्रताधारक उमेदवारांना केंद्रीय लोकसेवा आयोगातर्फे निवड परीक्षेसाठी घेण्यात येईल. राष्ट्रीय स्तरावर घेण्यात येणारी ही निवड परीक्षा देशांतर्गत विविध शहरांमध्ये ९ फेब्रुवारी २०१४ रोजी घेण्यात येईल व त्यामध्ये महाराष्ट्रातील मुंबई व नागपूर या शहरांचा समावेश असेल.
लेखी निवड परीक्षेत निर्धारित गुणांक मिळविणाऱ्या उमेदवारांना समूह चर्चा, शारीरिक क्षमता चाचणी व मुलाखतीसाठी बोलावण्यात येऊन त्याआधारे त्यांची अंतिम निवड करण्यात येईल.
अर्जासह भरावयाचे शुल्क : अर्जासह भरावयाचे शुल्क म्हणून २०० रु. रोखीने स्टेट बँक ऑफ इंडियाच्या कुठल्याही शाखेत रोखीने भरणे आवश्यक आहे.
अधिक माहिती व तपशील : अधिक माहिती व तपशिलासाठी ‘एम्लॉयमेंट न्यूज’च्या २ ते ८ नोव्हेंबर २०१३ च्या अंकात प्रकाशित झालेली केंद्रीय लोकसेवा आयोगाची जाहिरात पाहावी अथवा आयोगाच्या http://www.upsconline.nic.in  या संकेतस्थळावर अर्ज करण्याची शेवटची तारीख २ डिसेंबर २०१३.
ज्या पदवीधर विद्यार्थ्यांना सैन्यदलात अधिकारी म्हणून आपले करिअर सुरू करायचे असेल अशांसाठी ही स्पर्धा परीक्षा उपयुक्त ठरू शकते.